फलदायी उपासना
तीन प्रकारची उपासना केल्यास माणसाच्या भौतिक जीवनात आमूलाग्र फरक पडतो .
(१) श्री विष्णूची उपासना (२) नव ग्रहांची उपासना (३) यज्ञ संस्कार
श्री विष्णूची उपासना
जन्मदत्त, अनुवंशिक, दीर्घकालीन, अकारण उद्भवलेल्या प्राकृतिक दोषांचे निराकरण करण्याकरीता, तसेच वंश परंपरागत आलेल्या रोगांसाठी, गंभीर रोगांसाठी, प्रकृती अस्वास्थ्यासाठी, गतजन्मीच्या कुयोगामुळे, सद्यजीवनामध्ये, शरीरस्वास्थ्याला होणारा त्रास दूर करण्यासाठी या उपचाराचे प्रयोजन केलेले आहे. जे अनुवंशिक रोग आहेत, दीर्घकाळ टिकणारे रोग आहेत, काहीही कारण नसतांना आपल्या पाठीमागे लागलेले रोग आहेत, त्यासाठी ही योजना श्रीनाथशक्तिपीठाने केलेली आहे. जन्मतःच शरीरामध्ये निर्माण झालेली व्याधी, तसेच कर्माच्या अभावी निर्माण झालेले व्यंग वा दोष, जीवनातील अनुत्साह, तसेच नकारात्मक विचार काढण्यासाठी या उपचारांचे प्रयोजन आहे.
बुध्दिमत्तेचा विकास कमी असणे, मनामध्ये निरुत्साह असणे, शिक्षणामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येणे, ऐन परीक्षेच्या वेळी आजारी पडणे, झोप जास्त येणे आणि त्याच्यावर नियंत्रण नसणे, तसेच अयोग्य पध्दतीने निर्माण होणार्या शारीरिक पीडा, तसेच अन्य प्रश्न याच पूजेच्या माध्यमातून हाताळले जातात. चिडचिडा स्वभाव, स्वभावाची अस्थिरता, मनाची अशांतता घालविण्यासाठी हे उपचार श्रीनाथशक्तिपीठात होतात. करणी, बाधा आदी प्रकारांनी त्रस्त असलेल्या जीवासाठी नाथशक्तिपीठाने विशेष योजना केली आहे. या पूजेचा परिणाम सर्वांगिण विकासासाठी आहे.
आजच्या चढाओढीच्या युगामध्ये विविध स्पर्धांमध्ये टिकून राहण्यासाठी किंवा अग्रेसर राहण्यासाठी देखील हे उपचार केले जातात. आर्थिक विवंचना, ॠण आदी संबधीचे प्रश्न, अकारण असलेले वैमनस्य या उपचारांनी दूर केल्या जातात. जीवनातील अनेक प्रकारचे कुयोग ज्यामुळे दैनंदिन जीवन अशांत होउन दिशाहीन झालेले आहे, बहुतांश दिवसाचा वेळ हा विवंचनेत किंवा निराश मानसिक अवस्थेत जात आहे, अश्या वेळी देखील ही योजना केली जाते.
ह्या उपचारांमुळे परयंत्र, परमंत्र, परतंत्र आदी गोष्टींमुळे, भूतप्रेताच्या भय आदी व्यथा नष्ट होउन जारण मारण विघ्नांपासून संरक्षण मिळते.
हा प्रयोग प्रातिनिधिक स्वरुपाने करता येत नाही. याची योजना ज्याचेवर उपचार करावयाचे आहेत त्याच्यासाठीच आहे. याचा प्रत्यक्ष परिणाम हे कर्म करणार्यावरच होतो व इतर कोणालाही ह्याचा प्रत्यक्ष फायदा होत नाही.
तीथी, वार, नक्षत्र यांचा परस्परयोग तथा अग्नीचा या सर्वांशी कसा योग आहे. हे पाहूनच विशिष्ट नक्षत्राला हा उपचार केला जातो. जीवनातील विविध अडसर दूर करण्यासाठी हा उपाय आहे. ज्या कर्म दोषांनी जीवनामध्ये अतिशय धक्कादायक किंवा क्लेशदायक घटना घडतात, ते कर्मदोष दूर करण्यासाठी ह्या उपचाराची गरज आहे. हा उपचार धर्म, जाती निरपेक्ष असून कोणत्याही धर्म किंवा जातीतल्या व्यक्तिला हा उपचार करता येईल. कर्मदोषांचा संबध हा धर्म किंवा जातीशी, भोवतालच्या परिस्थितीशी, सामाजिक पध्दतीशी, संबधीत नसून तो केवळ त्याच्या पिंडाशी, कर्माशी, व स्थितीशी संबधीत आहे त्यामुळे हा उपचार मानव जातीतील कोणत्याही धर्माच्या मानवासाठी केल्या जाऊ शकतो.
या उपचारानंतर मनातील उत्साह प्रचंड वाढलेला असतो. आपले सर्व तर्हेचे योग बदलु लागले आहेत असे आंतरिक मन सांगु लागते, तशी अनुभूती येउ लागते व भाग्यात परिवर्तन घडु लागते.
यज्ञ संस्कार
व्यक्तिगत व कौटुंबिक समस्यांसाठी हा संस्कार करतात. याचा संकल्प हा ज्याचा त्यानेच करावा लागतो. परंतु ज्या ठिकाणी आई वडील हेच अज्ञान पाल्याचे पालनकर्ते असतात, तेथे पाल्याच्या वतीने तेही उपचार करु शकतात. मात्र फळ संकल्पाप्रमाणे ज्याचे त्यालाच मिळते. जेथे कुटुंब सहभागी होते, तेथे ते फळ उपचार करणार्याला व कुटुंबातील सर्वांना मिळू शकते.
हा कार्यक्रम यजमानाच्या घरी, अथवा त्याच्या इच्छेनुरुप इतरत्र कोठेही किंवा श्रीनाथशक्तीपीठ येथेच केला जातो. हा संपूर्ण कार्यक्रम यजमानातर्फे व यजमानाच्या इच्छेप्रमाणे होतो. यजमानाच्या ज्या समस्स्या, असाध्य प्रश्न, किंवा इच्छा असतील किंवा ज्यांचा त्याला किंवा त्याच्या कुटुंबाला विशेष त्रास होतो अशा कोणत्याही कारणासाठी हा उपचार केला जातो. घरात अस्थिरता व अशांतता असेल, पती पत्नीमध्ये अती वाद-विवाद होत असतील, पतीपत्नीमध्ये विकोपाचे मतमतांतर असतील, जीवनात दुःख अस्थीरता व एकमेकांबद्दलचा कलुषितपणा वाढत असेल तर तो घालविण्यासाठी ही योजना केली जाते.
या उपाय योजनेनंतर ज्या संकल्पाने हा उपचार करण्यात आला होता त्याची पूर्तता होऊ लागल्याची जाणीव यजमानास होतेव. अडचणींचा डोंगर हलका होऊ लागतो. सुसंवाद वाढू लागतो व शांतता व स्थिरतेचा अनुभव येउ लागतो.