सुवर्ण महोत्सव

सर्व नाथ भक्तांना विनंती

माझे समर्थ सद्गुरु श्री योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराज हे माझ्या घरी १९७२ साली प्रथम आले होते | तेव्हापासून ते नेहमीच माझ्याकडे येत असत व राहत असत. तेव्हापासूनच त्यांच्या आज्ञे वरून गुरुवारच्या भजनाला सुरुवात झाली.  येत्या जुलै २०२२ मध्ये या घटनेला पन्नास वर्ष होत आहेत. 1972 सालापासून समाधि घेईपर्यंत महाराज माझ्या घरी अखंडपणे येत होते व तेव्हापासूनच दर गुरुवारी भजन अखंडपणे आजही सुरू आहे |

पन्नास वर्षाचा हा कालावधी लोटल्यावर आपण सर्वांनी मिळून भजनाचा सोहळा उत्साहाने एकत्र राहून साजरा करावा अशी माझी इच्छा आहे | जुलै किंवा ऑगस्ट 2022 मध्ये हा कार्यक्रम माझ्या घरी महाराजांच्या गादीच्या सानिध्यात करण्याचा माझा वानस आहे।  माधवनाथ महाराज, व्यंकटनाथ महाराज तसेच नाथपंथातील सत्पुरुषांचे भक्त आणि ज्यांना कुणाला या विषयांमध्ये गोडी आहे त्या सर्वांनी या कार्यक्रमाला यावं ही माझी तळमळ आहे |

खूप मोठ्या प्रमाणावर गुरुबंधू नाथभक्त व नाथप्रेमी लोक एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे | सर्वांची सर्व व्यवस्था राहण खाणं-पीणं नाश्ता चहापाणी वगैरे करावयाचे आहे | प्रत्येकाला व्यक्तिगत निमंत्रण देण्याचीही माझी इच्छा आहे।  याकरता गुरु बंधूंनी, नाथ भक्तांनी आपला फोन नंबर, व्हाट्सअप नंबर, ई-मेल आयडी, जर माझ्याकडे पाठवला तर मी व्यक्तिगत निमंत्रण व कार्यक्रम पत्रिका या माध्यमातून अवश्य पाठवीन | सगळ्या नाथभक्तांचा हा मेळावा या निमित्ताने व्हावा हा प्रयत्न आहे।  आपण सर्वांनी खुल्या मनाने सहकार्य केले तरच हे शक्य होईल कार्यक्रम तीन दिवसाचा करून त्यात भजन, पुजन, नाथ संकीर्तन, व्यंकटनाथ महाराजांची जीवन कथा, नाथपंथाचा उगम व त्याचे आजपर्यंतचे कार्य या विषयांवर तीन दिवसाचा अध्यात्मिक कार्यक्रम करण्याचा मानस आहे।  याशिवाय जे लोक प्रत्यक्ष हजर राहतील त्या सर्वांच्या व्यक्तिगत समस्या कोणत्याही असोत त्याच्यावर उपायोजना व त्याचा व्यक्तिगत ऊहापोह करण्याचा प्रयत्न राहील। 

तीन दिवसाचा हा कार्यक्रम पूर्णतः निशुल्क राहील शिवाय भोजन आदि व्यवस्था ही माझ्याकडूनच राहील कोणाकडूनही कोणत्याही प्रकारच्या आर्थिक सहाय्याची अपेक्षा नाही। 

आपणास मनःपूर्वक विनंती की आपण खालील फॉर्म भरून सहकार्य करावे।

आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत

नरेंद्र चौधरी

(उर्फ नरेन्द्रनाथ महाराज )
अकोला

mrMarathi