वेद ही सृष्टीची जननी
मुळात सृष्टीची उत्पत्तीच वेदांमधुन झाली आहे. उत्पत्ती, स्थिती, लय या तीन्ही अवस्थामधून ब्रह्मांडातील प्रत्येक सजीव व निर्जीवास जावेच लागते, ह्या सर्व स्वयंचलीत कार्यप्रणालीवर वेदाचेच नियंत्रण आहे.
आदिशक्तीच्या मुखातून वेदांची उत्पत्ती झाली आहे. याच वेदांच्या तत्वानुसार या संपूर्ण सृष्टीची रचना ब्रह्मदेवाने केली. असे हे वेद सर्व व्यापी व सर्व चराचरात भिनलेले आहेत. यातील प्रत्येक मंत्र हजारो वर्षांच्या अभ्यासाने आपल्या पूर्वजांनी परीक्षण सिद्ध केला असून त्यातील प्रत्येक प्रयोगाची फलश्रुती निश्चित स्वरूपाने विषद केलेली आहे.
आजच्या या कलीयुगात कलीच्या प्राबल्याने धर्म, वेदशास्त्रे यांची अवहेलना होत आहे. वेदाच्या संग्रहणाचे व संक्रमणाचे कार्य अत्यंत क्षीण झाले आहे. समाजात पाखंड, बुध्दीभेद व अवडंबर वाढल्याने वेदांवरचा मानवाचा विश्वास कमी होउ लागला आहे.
वेदांमधील तत्त्वांचा, ज्ञानाचा संशोधनात्मक अभ्यास करून त्यातून मानवी जीवनावर त्याचा काय व कसा परीणाम होऊ शकतो, मानवी मनात व जीवनात कसे स्थित्यंतर घडवल्या जाउ शकते, हे समाजा पर्यत सहज सोप्या पद्धतीने पोहचवणे हे वैदिक प्रचार प्रसाराचे महत्त्वाचे कार्य ओम शिक्षण मंडळा अंतर्गत केल्या जाते.
मनुष्याचे प्रारब्ध, पिंड, जन्म – मृत्यू व सर्व सृष्टीवरील सर्व जीव सृष्टीचे संपूर्ण मूलतत्त्वे वेदात आहेत. वेद हे मूलभूत विज्ञान (basic science) आहेत. याच मूलतत्त्वांच्या आधारे अनाकलनीय, चमत्कार सदृश्य घटना अनुभवी, ज्ञानी लोक घडवु शकतात. परंतु अशा प्रत्येक उदाहरणा मागे काही ना काही मूलतत्त्वे कार्यरत असतातच.
वेदांचे स्वरुप, वेदांचा मानवी जीवनात उपयोग, वेद-विज्ञान, वैदिक संशोधनातील फलीत, वैदिक प्रचार प्रसार पध्दती, वैदिक शिक्षण पध्दती, वैदिक अपारंपरिक शिक्षण पध्दती, वैदिक शिक्षणाचे महत्त्व व वेद हेच सर्व ज्ञानाचे व मानवी जीवनाचे उगम स्रोत आहेत. ह्या बद्द्ल समाजात जागृती आणण्यासाठी प. पू. नरेंद्रनाथ महाराजांनी Om Education Society या नावाची धर्मदाय संस्था १९८८ मध्ये अकोला येथे स्थापन केली.
याच वेदांच्या प्रचार प्रसारासाचे व वेदांच्या माध्यमातून मानवाला त्याचे जीवन कसे सुखकर व समृद्ध करता येईल या संबधीचे कार्य संस्थे मार्फत सतत सुरु आहे.
वेदांचे स्वरुप
वेद हे अपौरुषेय आहेत. अर्थात त्याचा जनक मनुष्य नाही. सृष्टी रचनेच्या अनादी काळ आधीपासून असलेल्या आदिशक्तिच्या निद्रितावस्थेतील श्वासोच्छासाच्या लयीतून बाहेर पडलेला नाद म्हणजेच ‘वेद’ होत.
आदिशक्तीने ब्रम्हदेवाला सोपवलेल्या सृष्टी निर्मितीच्या कार्याकरीता ब्रम्हदेवाने १२००० वर्षे प्रणवाची तपश्चर्या करुन वेदांच्या आधारे सृष्टीची निर्मिती केली.अशा या वेदांचे जतन अनादी काळापासून गुरुकुल परंपरेने, मौखिक पध्दतीने मानव करत आला आहे.
वेद हे पूर्णज्ञान स्वरुपी असून त्याच्या प्रत्येक अक्षराच्या भावार्थात दडलेल्या ज्ञानाचे आजच्या प्रगत विज्ञानालाही आकलन झालेले नाही. वेद हेच सृष्टीचा व सृष्टीवरील जीवांचा आधार आहेत. परंतु आजच्या विज्ञानाच्या पलीकडे ज्ञानाचे अस्तित्व नाही असे म्हणता येणार नाही. जसे की जगविख्यात भौतिक शास्त्रज्ञ स्टिफन हॉकींग्ज यांनी ब्रह्मांडाच्या उत्पत्तीचा मांडलेला वैज्ञानिक सिध्दांत हा वेदांमध्ये नासदीय सूक्तामधे (ऋगवेद १०/१२९-२) अनादी काळापासून आधीच अस्तित्वात आहे. वेदांच्या या अनाकलनीय ज्ञानामुळे समाजामध्ये वेदांना सर्व सामान्य धार्मिक ग्रंथाचा दर्जा दिला गेला. खरे तर यावर संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे.