वैदिक उपचार कार्य

आजच्या युगात प्रत्येक माणूस हा काही ना काही समस्येने ग्रासलेलाच आहे. जीवनातील सर्व समस्य संबंधीची कार्य कारण मीमांसा ही सर्व सामान्य लोकांना समजत नाही व त्यामुळे त्यावर उपाय पण सापडत नाहीत. अशा परिस्थितीत मनुष्य निरनिराळे प्रयत्न करीत वण वण भटकत राहतो तरीही त्यात त्याला यश येत नाही. मूलत: समस्यांकडे पहाण्याचा दृष्टिकोन चूकत असल्यामुळेचे मनुष्य एका दुष्ट चक्रात अडकतो.

‘करावे तसे भरावे’ ,या कर्म सिद्धांताचा प्रत्येकाच्या जीवनात येणार्‍या समस्येशी थेट संबंध असतो परंतु त्याचे आकलन आध्यात्मिक ऊन्नती शिवाय होत नाही.

मनुष्याच्या जीवनातील समस्यांसंबंधीची कार्य कारण मीमांसा समजून, त्यावरील उपाय शोधुन त्या उपायांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करुन प्रत्येकास पीडामुक्त करण्यासाठी येथून प्रयत्न केले जातात.

जीवनाकडे शोध बोध बुध्दीने पाहणे

संपूर्ण सृष्टीचा आधार असलेल्या वेदमंत्राच्या माध्यमातून जीवनात व भाग्यात बदल करणे शक्य आहे. प्रभावी उपासना, यज्ञयागादी कर्माच्या, व वेदमंत्रांच्या उपासनेतून भाग्याचे पुनरुज्जीवन करणे शक्य आहे, ह्याचा शोध पूर्ण अभ्यास नाथशक्तिपीठ अकोला येथून गेल्या २२ वर्षांपासून सुरु आहे. हे ज्ञान लोकांना देणे व दोष घालविण्याचे मार्गदर्शन करणे, हे कार्य येथून होते.

नाथपंथ हा अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी असून प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी निर्मिलेले हे उपचार मानव जातीतील कोणत्याही मानवासाठी केल्या जाऊ शकतात.

mrMarathi