वैदिक उपचार केंद्र

नवनाथ परंपरेतील नाथशक्तिपीठ हे एक अध्यात्मिक अनुभूतींचे केंद्र आहे. नवनाथांच्या अखंड गुरूपरंपरेतील 15 वे, गुरू, प. पू. योगाभ्यानंद व्यंकटनाथांच्या प्रेरणा व संकेताप्रमाणे, त्यांचे उत्तराधिकारी प पू श्री नरेंद्रनाथ महराजांनी नाथशक्तिपीठाची अकोला येथे स्थापना केली.

मानवी मूल्यांचा र्‍हास, भोगवादाने गाठलेला कळस, नकारात्मक विचारसरणी, चहूकडे माजलेले अवडंबर, अर्थहीन झालेले शब्द आणि व्यवहार, ह्यामुळे सत्शील माणूस एका बाजूने भरडल्या जात आहे, तर दुसर्‍या बाजूने व्यक्तिपरत्वे असणारे प्रारब्ध, पिंड दोष, जंन्मकुंडलितील ग्रह दोष, पितृ दोष, शत्रू पीडा, असाध्य रोग तसेच त्रिवीध तापाने हा सत्प्रवृत्त माणूस होरपळला जात आहे. ज्या मुळे ना त्याची भौतिक उन्न्नती वा भरभराट होत ना त्याची अध्यात्मिक प्रगती.

नाथशक्तिपीठातून प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपा मार्गदर्शनामुळे “वेदमंत्रांच्या माध्यमातून भाग्याचे पुनरुजीवन केल्या जाते”. नाथशक्तिपीठाची या बाबतीतील, ही एकमेवाद्वितीय कर्म उपचार पद्धती आहे. या वैदिक उपचार पद्धती च्या माध्यमातून व्यक्ति हा भौतिक स्तरावर पूर्वी पेक्षा अधिक सुखीसंपन्न तर होतोच, परंतु उपासना व अनुग्रहाने त्याच्या आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग मोकळा होत असल्याचा त्याला अनुभव येतो.

नाथ शक्तिपीठाच्या कार्याचा एक भाग म्हणून नाथ शक्ति पीठात नरेंद्रनाथ महाराजांनी अनेक विधानांची ( procedure ) निर्मिति केली आहे. ठराविक विधानांचे आचरण त्यांच्या नियमांनुसार केल्यास अविश्वसनीय गोष्टी घड़तांना येथे नेहमीच पहायला मिळतात व त्यांची तेथे सांख्यिकी पद्धतीने नोंद ही ठेवण्यात येते. या विधानांचा उपयोग धर्म, जात-पात यासारख्या कोणत्याहि मानवनिर्मित बंधनांचा विचार न करता करण्यात येतो.

या विधानांच्या आचरणा मुळे आज रोजी कित्येक जणांना आपले मन: स्वास्थ परत लाभले आहे. नैराश्येमुळे जीवाचा अंत करु पाहणारे अनेक लोक आज स्वत: च्या पायावर समर्थपणे उभे राहून इतरांनाही मार्गदर्शन करत असताना दिसतात. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढणे, नैराश्य जाणे, कृरता जाणे, कर्तव्यतत्पर व जवाबदार होणे, इत्यादि फरक झाल्याचे लगेचच जाणउ लागते.

सृष्टीचा हा नियमच आहे की आपण जसे कर्म करतो तसेच फळ मिळते. नाथ शक्तिपीठातुन होणाऱ्या कार्याला याचेही पाठबळ लाभले आहे व म्हणूनच येथून होणाऱ्या प्रयोगांमधे यशोप्राप्ति गुणोत्तर हे नव्वद टक्के पेक्षा अधिक दिसून येते.

य़ेथुन खालिल प्रकारच्या दोषांवर उपचार करण्यात येतात.

जन्मतः येणारे दोष

अपमृत्यू तथा शत्रुंपासून संरक्षण

पितृ दोष तथा जीवनातल सर्वोंन्नती

भाग्याचे परिर्वतन करण्यासाठी उपाय

कर्म उपासना

 

mrMarathi