श्रीनाथशक्तिपीठ

श्रीनाथशक्तिपीठ हे नवनाथ परंपरेचे आध्यात्मिक अनुभूतिचे केन्द्र आहे. हा ­नाथपंथ फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे. ­नव­नाथांनी आपल्या कार्यकाळात सर्व अहितकारी, अकल्याणकारी, विघातक शक्तींचा ­बिमोड करु­न त्यांच्याकडून सर्व सत्, व कल्याणकारी शक्तिंकडून, समाजोत्था­नासाठी ­नाथपंथी गुरु जे काही करतील त्याला साहाय्यभूत राहू असे वरदा­न घेतले आहे व त्याची प्रचिती आजही मिळते. चैतन्य श्री मच्छीँद्रनाथांपासून सुरु झालेल्या अखंड गुरू परंपरेतील प. पू. श्री व्यंकटनाथ महाराज हे पंधरावे नाथ आहेत. त्यांच्या प्रेरणेने व संकेतानुसार त्यांचे उत्तराधिकारी प. पू. श्री नरेन्द्रनाथ महाराज यांनी अकोला यॆथे नाथशक्तिपीठाची स्थापना केली आहे.

संपूर्ण सृष्टीवर व सृष्टीतत्वावर, नवनाथांच प्रभूत्व आहे. नवनाथांच्या परंपरेचा, त्यांनी केलेल्या कार्याचा व त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार हा येथूनच केल्या जातो. नवनाथांची पारंपरिक कृपा व गुरु उपासना याचे केन्द्रस्थान म्हणजेच नाथशक्तिपीठ आहे. नवनाथांच्या आध्यात्मिक तत्वांना विशेष महत्त्व आहे. स्वतः नवनाथांनी जीवनभर आध्यात्मिक उपसाना केली आहे. ह्या आध्यत्मिक उपासनेचा व तत्वांचा लाभ, श्रीनाथशक्तिपीठातून, आज कोणीही घेउ शकतो.

या सृष्टीवर, मनुष्य, जेथे कोठे असेल, तेथे त्याच्या जात-पात-धर्म याचा विचार न करता, तो ह्या मार्गातला असो वा नसो, शिष्य असो वा नसो, भक्त असो किंवा नसो, त्याला अध्यात्माचे महत्त्व सांगून अध्यात्माकडे वळवण्याचा प्रयत्न येथून सतत होतो. व्यक्तीपरत्वे प्रत्येकाचे प्रारब्ध, पिंड व वर्तमान स्थिती यांचा विचार करुन त्याने काय उपासना करावी, प्रत्यक्ष आचरण कसे करावे व त्यातून प्रत्यक्षानुभूती कशी घ्यावी व जीवनाचा विकास कसा साधावा याचे मार्गदर्शन श्रीनाथशक्तिपीठातून केल्या जातो. नाथपंथाच्या अखंड गुरु परंपरेचे कृपाआशीर्वाद प्राप्त झालेले असल्यामुळे, गुरुशिष्य परंपरेतील महत्त्वाचे अंग असलेला नवनाथ परंपरेतील ‘अनुग्रह’ दीक्षा प. पू. श्री नरेन्द्रनाथ महाराज श्रीनाथशक्तिपीठातून देतात.

आजच्या युगात मानवी मूल्यांचा र्‍हास होउन भोगवादी विचारसारणी वाढीला लागली आहे . विश्वास, प्रेम, कर्तव्य निष्ठा हे शब्द अर्थहीन झाले आहेत. त्यामुळे सत्प्रवृत्त व सत्शील माणसांमध्ये भय निर्माण झाले आहे व तो मानसिक शांती हरवून बसला आहे.

या परिस्थितीत बदल आणण्यासाठी अध्यात्मिक जीवन पद्धतीची नितांत गरज आहे. आध्यात्म म्हणजे देव-देव करणे, पुजा-पाठ करणे, असे अवडंबर नसून मनुष्याला चित्त, वृत्ती, प्रवृत्तीने सज्जन करणे, मानवधर्माची रुजवणूक करुन कर्तव्यतत्पर, निर्भय, बलशाली, अन विवेकी व्यक्तिमत्व घडवणे हीच नाथशक्तिपीठाधीश प. पू. श्री नरेन्द्रनाथ महाराज यांची संकल्पना आहे. ते हे कार्य गेल्या 22 वर्षांपासून अविरत करीत आहेत.

सर्व प्रकारचे जीवन व्यवहार सांभाळून, जीवनातील सर्व तर्‍हेचे कर्तव्य सांभाळून, दैनंदिन जीवन, दैनंदिन कार्य, व्यावहारिक कार्य, असे सर्व सांभाळून उपासना कशी करावी, अध्यात्म कसे अंगिकारावे, आपले चारित्र्य कसे घडवावे याचे मार्गदर्शन या नाथशक्तिपीठातून दिले जाते, हेच येथील वैशिष्ट्य आहे.

mrMarathi