माणसाचे योग व भोग

ब्रह्मांडातील सातवा घटक म्हणजे जगातील सर्व माणसे व त्यांचे योग, भोग हे फक्त बारा प्रकारातच म्हणजे राशींतच आता १२ राशींचे विभाजन ह्या चार महातत्त्वांमध्ये केले आहे.

भूमितत्त्वात: वृषभ, मकर व कन्या ह्या राशींचा समावेश आहे.

जलतत्त्वात: मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशींचा समावेश आहे.

अग्नितत्त्वात: मेष, सिंह व धनू ह्या राशींचा समावेश आहे.

वायुतत्त्वात: मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश आहे.

भौगोलिक दृष्टीने विचार केला तर असे लक्षात येते, की भारतामध्ये ह्या पाच तत्त्वांची शिवलिंगे निरनिराळ्या ठिकाणी आहेत. कांचीपूरमचे लिंग हे पृथ्वीतत्त्वाचे आहे, तर आपतत्त्वाचे शिवलिंग तिरुवाणैकावल (त्रिचनापल्ली) येथे आहे.तिरुअण्णामलाई येथील लिंग हे तेजतत्त्वाचे असून, आंध्रमधील कालाहस्ती (तिरुपतीजवळ) येथे वायुतत्त्वाचे शिवलिंग आहे. तामिळनाडूतील चिदंबरम येथे आकाशतत्त्वाचे लिंग आहे.

अशाप्रमाणे भूतलावरच्या सर्व व्यक्तींवर पंचमहाभूतांचा खोलवर परिणाम झाला असून, सर्व लोकांचे वर्गीकरण हे पंचमहाभूतांच्या तत्त्वांनुसार १२ राशींत केले आहे. राशी म्हणजे त्या त्या महातत्त्वाचे जे निजतत्त्व, जे निजगुण (पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे) तेच त्या त्या राशींच्या लोकांमध्ये राहतील. म्हणजे प्रामुख्याने तेच स्वभाव त्या त्या लोकांचे राहतील. म्हणजे त्या त्या लोकांची वासनादेखील त्यांच्या राशीप्रमाणेच राहणार.

मेष: अग्नितत्व

अश्‍विनी, भरणी, कृत्तीका नक्षत्रे मिळून ही रास होते. कार्तिक महिना, १, ६,११, या तिथी व रविवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. दक्षिण दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. भगवान दत्तात्रेय व प्रभूरामचंद्रांची उपासना करावी.

वृषभ: भूमितत्त्व

कृत्तिका, रोहिणी व मृग नक्षत्रे मिळून ही रास होते. मार्गशिर्ष महिना, ५, १०,१५ या तिथी व शनिवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पूर्व दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. देवीची उपासना करावी.

मिथुन: वायुतत्त्व

मृग, आर्द्रा, पुनर्वसू नक्षत्रे मिळून ही रास होते. आषाढ महिना, २, ७,१२ या तिथी व सोमवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. उत्तर दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. शंकर व वीर हनुमानाची उपासना करावी.

कर्क: जलतत्त्व

पुनर्वसू, पुष्य, आश्‍लेषा नक्षत्रे मिळून ही रास होते. पौष महिना, २, ७, १२ या तिथी व बुधवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पश्‍चिम दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. विष्णू व गणपतीची उपासना करावी.

सिंह: अग्नितत्व

मघा, पूर्वाङ्गाल्गुनी, उत्तराङ्गाल्गुनी नक्षत्रे मिळून ही रास होते. ज्येष्ठ महिना, ३, ८,१३, या तिथी व शनिवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. दक्षिण दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. भगवान दत्तात्रेय व प्रभूरामचंद्रांची उपासना करावी.

कन्या: भूमीतत्त्व

उत्तराङ्गाल्गुनी, हस्त व चित्रा नक्षत्रे मिळून ही रास होते. भाद्रपद महिना, ५, १०,१५ या तिथी व शनिवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पूर्व दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्रनाडीवर महत्त्वाची कामे करावीत. देवीची उपासना करावी.

तूला: वायुतत्त्व

चित्रा, स्वाती, विशाखा नक्षत्रे मिळून ही रास होते. माघ महिना, ४, ९, १४ या तिथी व गुरुवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगलेफळ देतो. उत्तर दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. शंकर व वीर हनुमानाची उपासना करावी.

वृश्चिक: जलतत्त्व

विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा नक्षत्रे मिळून ही रास होते. अश्‍विन महिना, १, ६, ११ या तिथी व शुक्रवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पश्‍चिम दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. विष्णू व गणपतीची उपासना करावी.

धनू: अग्नितत्व

मूळ पूर्वाषाढा, उत्तराषाढा नक्षत्रे मिळून ही रास होते. श्रावण महिना, ३, ८,१३, या तिथी व शुक्रवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. दक्षिण दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. भगवान दत्तात्रेय व प्रभूरामचंद्रांची उपासना करावी.

मकर: भूमितत्व

उत्तराषाडा, श्रवण व धनिष्ठा नक्षत्रे मिळून ही रास होते. वैषाख महिना, ४, ९,१४ या तिथी व मंगळवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पूर्व दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. देवीची उपासना करावी.

कुंभ: वायुतत्त्व

धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा नक्षत्रे मिळून ही रास होते. चैत्र महिना, ३, ८, १३ या तिथी व गुरुवार हे घातक असतात. वद्यपक्ष चांगले फळ देतो. उत्तर दिशा उत्कर्षाशाची असते. सूर्य नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. शंकर व वीर हनुमानाची उपासना करावी.

मीन: जलतत्त्व

पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती नक्षत्रे मिळून ही रास होते. ङ्गाल्गुन महिना, ५, १०, १५ या तिथी व शुक्रवार हे घातक असतात. शुद्धपक्ष चांगले फळ देतो. पश्‍चिम दिशा उत्कर्षाशाची असते. चंद्र नाडीवर महत्त्वाची कामे करावीत. विष्णू व गणपतीची उपासना करावी.

बारा राशी आणि त्या राशींच्या लोकांची स्वभाववैशिष्ट्ये

हे स्वभाव ठोकळमानाने दिले आहेत. इतर ग्रह, त्यांची युती व पत्रिकेतील घर ह्याप्रमाणे स्वभावात बदल होऊ शकतो.

रास       राशीत मोडणार्‍या लोकांचे ठळकमानाने स्वभाव

मेष        तापट, उतावळा, महत्त्वाकांक्षी व धाडसी

वृषभ       अभिमानी, हटवादी, स्वार्थी आणि रसिक

मिथुन      विवेकी, समजदार, न्यायी व लोकप्रिय

कर्क        निष्काळजी, निरुपद्रवी, दानी व अहंकारी

सिंह        निश्चयी, पराक्रमी, चतुर व उदार

कन्या       मतलबी, विद्याव्यासंगी, व्यवहारी व तर्कट

तूला        शौकीन, ताठर, सरळमार्गी व शिस्तप्रिय

वृश्चिक          कोपी, अभिमानी, धाडसी व हेकेखोर

धनू        सत्कर्मी, विश्वासू, दिलदार व प्रामाणिक

मकर       नाटकी, लहरी, हेकट व चतुर

कुंभ        हट्टी, सुस्वभावी, विद्वान व सूडी

मीन        उद्योगी, स्वार्थी, दिलदार व भेकड

mrMarathi