राशींप्रमाणे उपासना व उपाययोजना

सृष्टीवरील सर्व मानवजात ही बारा राशींत विभागली आहे. ह्या बारा राशी चार तत्त्वांमध्ये कशा विभाजल्या आहेत, हे आपण पाहिले आहे. म्हणजे भूमितत्त्वात वृषभ, मकर व कन्या ह्या राशी, जलतत्त्वात मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशी, अग्नितत्त्वात मेष, सिंह व धनू ह्या राशी व वायुतत्त्वात मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश होतो, असे आपण ह्यापूर्वीच पाहिले आहे.आता ह्या प्रत्येक महातत्त्वामध्ये मोडणार्या राशींच्या लोकांनी काय व कशी उपासना करावी, हे आपण पाहू. म्हणजे वृषभ, मकर व कन्या; मीन, वृश्चिक व कर्क; मेष, सिंह व धनू व मिथुन, तूळ व कुंभ अशा चार प्रकारांचे गट पद्धतीने विवेचन करू.

सत्ययुगामध्ये प्रभावी असलेल्या भूमितत्त्वाचे निजगुण सत्य असलेल्या वृषभ-कन्या-मकर राशी

वृषभ, कन्या व मकर राशी भूमितत्त्वाच्या आहेत. सत्ययुगामध्ये भूमितत्त्व प्रभावी होते. ह्या भूमितत्त्वाचा निजगुण सत्य आहे. ह्या तीनही राशींत मोडणार्याक विविध लोकांनी आपली उपासना ही पूर्व दिशेकडे तोंड करून करावी. जीवनातील सर्वच महत्त्वाचे काम हे पूर्व दिशेपासूनच सुरू करावे. ह्या लोकांच्या जीवनातील भरभराटीची दिशा म्हणजे पूर्व. सर्व प्रकारचा अभ्यास, ज्ञानसाधना ही पूर्वेकडूनच सुरू करावी. सर्व प्रकारचे प्रयत्न हे पूर्व दिशेकडूनच करावेत. भूमीचे जे निजतत्त्व सत्य त्याची सिद्धता प्राप्त करणे, हे पूर्व दिशेकडूनच सुलभ आहे. ब्रह्मांडाशी भूमितत्त्वाचा जो काही संबंध आहे त्याप्रमाणे वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांचा जो काही ब्रह्मांडाशी संबंध आहे, त्या तत्त्वानुसार उपासनेला पूर्व दिशेकडून मिळणारी ऊर्जा ही जास्त प्रभावी आहे, तसेच ती जास्त फलदायी आहे. ह्या राशींच्या लोकांना महिन्याचे पहिले पंधरा दिवस म्हणजे पंचांगातील शुद्ध पक्ष हा उत्तम फळ देणारा आहे. प्रत्येक महिन्याचा शुद्ध पंधरवडा हा ह्या लोकांच्या उपासनेला चांगला असतो. वद्य पंधरवडा हा त्यामानाने कमी फलदायी असतो. शुद्ध पंधरवड्यात सर्व प्रकारची फलदायी, तसेच महत्त्वाची कामे करून घेणे योग्य राहील. उपासना ही नित्यनियमाने बाराही महिने अखंड चालू राहिली पाहिजे.

दिवसाचे चार प्रहर असतात. सूर्योदयापासून माध्यान्हापर्यंत पहिला प्रहर, माध्यान्हापासून सूर्यास्तापर्यंत दुसरा प्रहर, सूर्यास्तापासून मध्यरात्रीपर्यंत तिसरा प्रहर तर मध्यरात्रीपासून सूर्योदयापर्यंत चौथा प्रहर असतो.

ब्रह्मांडातील पाचही तत्त्वे ही वेगवेगळी असली तरी त्या प्रत्येकाचा एकमेकांवर फार मोठा अंमल असतो. ह्या पंचमहाभूतांच्या तत्त्वांचा, सूर्यमंडळाच्या भ्रमणाचा, नक्षत्र तारांगणाच्या भ्रमणाचा सर्वांवरच सतत परिणाम होत असतो. ह्या भ्रमणाचा विचार केला तर असे लक्षात येते, की वृषभ-कन्या-मकर या राशीच्या लोकांसाठी ह्या भ्रमण संक्रमणाचा तिसर्याा आणि चौथ्या प्रहरात होणार्या भ्रमणकाळातील रात्री १०.३० ते पहाटे २ वाजेपर्यंतच्या कालावधीत जी काही उपासना केली जाईल, त्या उपासनेला फलदायी परिणाम राहतील. ह्याच कालावधीत केलेल्या विविध योजना ह्या चांगल्या प्रकारे होऊ शकतील. शक्य झाल्यास कामाची नवीन सुरवात ह्या कालावधीत करावी. ती लाभदायी ठरेल. आपल्या जन्मनक्षत्र मंत्राचा जप रोज ह्या वेळेत करावा.

माणसाला दोन नाकपुड्या असतात. डाव्या नाकपुडीतून जो श्वास चालतो त्याला चंद्रनाडी म्हणतात व उजव्या नाकपुडीतून जो श्वास चालतो त्याला सूर्यनाडी म्हणतात. शरीरातून होणारा श्वासोच्छ्‌वास हा आपसूक नाडी बदलतो. ही नाडी केव्हाही आपोआप बदलते. श्वासोच्छ्‌वासाचा आणि शरीरातील ग्रहांचा, पिंडाचा आणि संपूर्ण ब्रह्मांडाचा सततच संबंध असतो. भूमितत्त्वाच्या लोकांचा म्हणजेच वृषभ, कन्या व मकर राशीच्या लोकांचा जो काही ब्रह्मांडाशी संबंध आहे त्यानुसार चंद्रनाडी ज्या वेळी सुरू असेल त्या वेळी ह्या लोकांच्या शरीराशी, मनाशी, ग्रहांशी, वातावरणाशी जो संबंध असतो त्या वेळी ह्यांच्याकडून जो काही व्यवहार होईल तो त्यांच्या हिताचा असेल. चंद्रनाडी सुरू असताना साधना करावी, अभ्यास करावा, नियोजन करावे, सर्व महत्त्वाची कामे करावी. जर चंद्रनाडी सुरू नसेल तर ती सुरू करण्याचा प्रयत्न करून कामे केली तरी चालतात. याकरिता उजवी नाकपूडी बंद करावी आणि डावी नाकपूडी सुरू करण्याचा प्रयत्न करावा. काम सुरू करताना जरी डावी नाकपूडी सुरू असेल तरी अशा वेळी चालू शकते.

या तिन्ही राशींच्या लोकांची वासना ही अन्नात व त्याच्या स्वादात आणि रसनेत, जिभेत असते. जन्ममरणाच्या भोगांची तीव्रता कमी करण्यासाठी ही वासना नियंत्रित करणे जरूर आहे. ह्या लोकांनी अन्नदान करीत राहावे. आपण आता प्रत्येक राशीचा स्वतंत्र विचार करू. जन्मनक्षत्र मंत्र रोज वेळेत म्हणावा.

ह्या तिन्ही राशींच्या लोकांनी जगन्मातेची उपासना ‘ॐ ऐं र्‍हिं क्लिं चामुंडायै विच्चे’ रोज १०८ वेळा करीत राहणे जरूर आहे. तसेच जगन्नाथपूरी ह्या धामाची यात्रा जीवनामध्ये निदान एकदा तरी करणे फायद्याचे राहील. भारतामध्ये जी निरनिराळी धामे आहेत त्या सर्वांचे महत्त्व आहे. परंतु हे महत्त्व राशींपरत्वे पाहिले तर ते करणे योग्य ठरेल. ही यात्रा केल्यावर चित्त स्थिर होऊ लागते, मन शांत होऊ लागते व एकंदरीत उत्साह वाढतो.

ज्ञानदेव महाराज हे युगपूरुष होऊन गेले. ते स्वत:, त्यांचे कार्य,त्यांच्या कार्याचे परिणाम हे सर्व भूमितत्त्वाचे होते. युगपूरुषाचे महत्त्व हे केवळ त्या युगापूरते राहत नाही तर ते युगानुयुगे प्रभावी असते. ज्ञानदेवीचे नित्य वाचन करीत असावे.

भूमीचा संबंध हा जीवनोपयोगी वस्तूंशी आहे. ह्या लोकांचा व्यावहारिक भाव हा वाढता असतो. ह्यांना व्यावसायिक उलाढाल ही सहजरीत्या साध्य होते. राजकारणात देशाचे उत्पन्न वाढविण्यात, अन्नधान्यांचे उत्पन्न वाढविण्यात,जमीन सुधारण्यात व दुसर्‍यांवर छाप पाडण्यात यांना यश येते. या राशींचे निजतत्त्व सत्यहे आहे. खोटे बोलणे वा खोटे बोलून व्यवहार केल्यास यांचीच फसगत व नुकसान होते.

व्यापक दृष्टी होण्यासाठी मंत्रसाधना, देवपूजन, पारायणे, यज्ञयाग, तसेच दानादी कर्मे करावीत. ही माणसे रजोगुणी असून वातूळ प्रकृतीची असतात. वातूळ पदार्थाचे सेवन वर्ज्य करावे. ह्या तीनही राशींचे लोक हे वैश्य वर्णाचे असतात. आता प्रत्येक राशीचा स्वतंत्र विचार करू.

वृषभ रास :-या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राचे चैतन्यस्वरूप पिंपळाच्या वृक्षात आहे. पिंपळाच्या वृक्षावर सर्व देवदेवता, यक्ष, किन्नर,पितर, ब्रह्मा, विष्णू, महेश आदी सर्वच शक्तींची वस्ती आहे. भूमितत्त्वाचे जे निजतत्त्व, सत्य या राशीच्या लोकांचे निजतत्त्व या वृक्षामध्ये आहे. ह्या वृक्षाच्या खाली केव्हाही उपासना केली तर ती चांगलीच आहे. तथापि वृषभ राशीच्या लोकांनी ह्या वृक्षाखाली पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान उत्तरेकडे तोंड करून खालील जप अवश्य करावा. हे सर्व मंत्र रोज कमीत कमी १०८ वेळा म्हणावेत.

मंत्रांबद्दल अधिक माहिती वाचण्यासाठी पुढील पोस्ट पहा…

12 टिप्पण्या

  1. श्री महाराजांच्‍या चरणी दंडवत. माझी अनेक दिवसां पासून आपले दर्शन घेण्‍याची ईच्‍छा आहे. मी सध्‍या नागपूर येथे राहत आहे. मी आकोला येथे श्री नाथशक्‍तीपिठास भेट दिली परंतु भेट झाली नाही. माझा मुलगा चि.वल्‍लभ याची जन्‍मतारीख 24 मार्च, 1998 असून जन्‍मवेळ सायंकाळ 06 वाजून 18 मिनिट आहे व जन्‍मस्‍थळ नागपूर आहे. तसेच मुलगी कु.वैष्‍णवी हीची जन्‍मातारीख 28 सप्‍टेंबर, 1994 जन्‍मवेळ सकाळी 08 वाजून 40 मिनीटे जन्‍मस्‍थळ नागपूर आहे. दोघांची स्‍वतंत्र कालसर्प पुजा केलेली आहे व मी नागनारायणबली पूजा केलेली आहे. मला माझे मुलाचे भविष्‍या बद्दल सतत चिंता वाटते कृपया मार्गदर्शन करण्‍यास श्रीमहाराजांचे चरण नम्र प्रार्थना आहे. माझा भ्रमणध्‍वनी क्रं 9372622358 असा आहे. श्री गुरुदेव दत्‍त. श्रीनवनाथ महाराज की जय.

  2. नमस्कार मी हेमंत चव्हाण औरंगाबाद ,सर मी नाव्नाताथ भक्ती सार ग्रंथ१०वर्शपुर्वि वाचलाहोतातेंव्हा माजे वय २३ होते मला कोणतेच मार्गदर्शन नव्हते .मी ग्रंथ पूर्ण केला पण उद्यापन केले नाही व जेवू सुदाः घातले नाही .नवनाथ भक्तिसार मध्ये ३ आध्याय मारुतीचा आहे ३ आध्याय नियमित वाचल्याने मारुतीची कृपा होते व मारुती आपल्या पाठीशी उभे राहतात आशी फलश्रुती आहे .मी ३ आध्याय नियमित पने १ वर्ष वाचला होता पण मला काही आनिभूती आली नाही आसे का , मी हनुमान भक्त आहे महणून मी ३ आद्याय १ वर्ष वाचला होता .मला तुमचे मार्गदर्शन पाहिजे मला नवनाथ पारायण करायचे आहे . मी इंतार्नेत वर जास्त काम करतो आपली वेब साइड पहिली मी साइड वरच ४० आध्याय

    वाचणार आहे चाले का मला चांगला अनुभव येईल का . कृपया कलावे हेमंत चव्हाण -९६७३५०२०९७ hemant_chavanin2001@yahoo.co.in

प्रतिक्रिया द्या

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

mrMarathi