जन्मतःच गर्भाशय नाही तरी मूल देतो – व्यंकटनाथ महाराज

श्रीसमर्थ योगाभ्यानद व्यंकटनाथ महाराजांनी आपल्या कार्यकाळात म्हणजे १९३६ ते १९९३च्या काळांत अकोल्याच्या भक्ताला दिलेला प्रसाद पंथाच्या अशाच सिध्दतेची साक्ष देतो. दर्शनार्थी आलेल्या जोडप्याला मूल-बाळ होत नव्हते आणि होणारही नव्हते. डॉक्टरांच्या अनेकविध तपासणीतून हे लक्षांत आले होत की त्या स्त्रीला जन्मतःच गर्भाशय नसल्यामुळे या जन्मात गर्भधारणा होणे शक्य नाही. परंतु नाथमहाराजांचा तो निर्णय. त्यांनी त्या महिलेला विभूती लावून नारळ दिल आणि दोन वर्षात पाळणा हलेल असे सांगितले. दोन वर्षाची मुदत कां असे म्हटल्यावर ते म्हणाले जो भाग शरीरात जन्मतःयायला हवा तो आला नाही. तो निर्माण करून त्याची योग्य ती वाढ झाल्यावरच पुढचा भाग घडेल आणि खरोखरीच घडले देखील तसेच. दोन वर्षानंतर तिला मुलगी झाली एवढेच नाही तर त्या नंतर तिला एक मुलगा देखील झाला. हीच तर या पंथाची विशेषता आहे. जे विज्ञानाला शक्य नाही ते नाथ महाराजांनी सहज लिलया करून दाखविले. नाथपंथ आजही आपल्या सिध्दतेने कार्यरत आहे नाथपंथियांशी आपला संपर्क आला नाही त्यामुळे पंथाचे कार्य आज देखील तसेच चालू आहे हे कळत नाही.

मच्छिंद्रनाथाने गोरक्षास गुरू उपदेश केला व त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. पुढे त्याला आपल्या बरोबर घेवून यात्रेस निघाला. केवढे अचाट सामर्थ्य हे. अयोनी संबंधातून हाडामासाचा १२ वर्षाची वाढ झालेला मुलगा उकिर्ड्यातून सर्वांसमोर बाहेर येतो. केवळ मंत्रून दिलेल्या विभूतीतून हा प्रकार घडावा, हे तर प्रचलीत विज्ञानाला देखील अशक्य आहे.

म्हणे महाराजा योगद्रुमा | सांडिला ठाव दावित्यें तुम्हां | पुढें चाले मागें उगमा | नाथ जातसे सवें सवें 69 तंव तो उकिरडाकेर उद्दाम | गोवर पडिला पर्वतासमान | तेंथे जाऊनि सुमधुम | नाथाप्रती सांगतसे 70 हे महाराजा तपोजेठी | येथें सांडिली भस्मचिमुटी | ऐसें ऐकोनि नाथ होटीं | हांक मारी बालकातें 71 हे हरिनारायण प्रतापवंता | मित्रवर्या सूर्यसुता | जरी अससील या गोंवरांत | नीघ त्वरित या समयीं 72 या गोंवरगिरींत नरदेहजन्म | मिरवला असे तूतें उत्तम | तरी गोरक्ष ऐसें तूतें नाम | सुढाळपणीं मज वाटे 73 द्वादश वर्षेंपर्यंत बैसलासी गोंवररक्षणांत | म्हणूनि गोरक्षक नाम तूतें | पाचारितों स्वच्छंदें 74 तरी आतां लावीं उशीर | हे गोरक्षनाथा निघें बाहेर | ऐसें वदतां नाथ मच्छिंद्र | बाळशब्द उदेला 75  म्हणे महाराजा गुरुवर्या | गोरक्ष असें मी या ठाया | परी गोवरनगानें गुंफित काया | भार मौळीं विराजला 76 तेणेंकरूनि शरीरवेष्टण | झालें आहे दडपण | तरी गौरयातें विदारून | बाहेर काढीं महाराजा 77 ऐसें ऐकूनि बाळउत्तर | लौकरी आणूनि लोहपत्र | मही विदारूनि नगगौर | बाळतनू काढिली 78  काढिली परी ती तनुलता | बालार्ककिरणीं दिसे समता | कीं धनमांदुसी विद्युल्लता | चमक दावी आगळी 79 कीं पूर्ण चंद्रप्रकाश पौर्णिमेचा | दिशा उजळे समयीं निशीच्या | तेवीं तनुगर्भ मदनाचा | जनामाजी मिरवला 80 कीं दुसरा ईश तो चक्रधर | त्यजोनि आतां मूर्तिसार | वीट मानूनि क्षीरसागर | म्हणूनि येथें आला असे 81

तेथून ते उभयता जगन्नाथपुरीकडे जाण्यास निघाले वाटेत त्यांना कनकगिरी गांव लागले. नुकताच जन्मलेला गोरक्ष म्हणजे १२ वर्षे वयाच्या गोरक्षाची परिक्षा घेण्याचा विचार मच्छिंद्रनाथांच्या मनांत आला. ते म्हणाले बाळ गोरक्षा मला आता भूक लागली आहे. तेंव्हा तू गांवात जाऊन भिक्षा मागून आण म्हणजे आपण दोघेही जेवण करू. भिक्षेसाठी गांवात हिंडता हिंडता तो एका ब्राह्मणाच्याघरी गेला. त्या ब्राह्मणाकडे त्या दिवशी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते. गोरक्षाने ‘अलख’ उच्चारताच घरातून एक स्त्री आली. गोरक्षाला पाहताच, त्याचे तेजस्वी, भव्य दिव्य रूप पाहताच तिने त्याला ताटभर सर्वप्रकारचे अन्न भिक्षा म्हणून वाढले. अनेक पक्वान्ने भरलेले ताट पाहून गोरक्षाने ते लगेचच आपल्या गुरूकडे नेले. गुरूने देखील ते अन्न पाहून जेवणास सुरवात केली व यथेच्च जेवण केले. परंतु वडे पाहून गोरक्षाला म्हणाले बाळ वडे खूपच चांगले झाले आहेत अजून घेवून ये. ते ऐकून गोरक्ष देखील आनंदाने पुन्हा त्याच घरी गेला व पुन्हा भिक्षा मागितली. त्याला परत आलेला पाहून त्या बाईला त्याच्यबद्दल अनेक शंका आल्या व हा आपण समजतो तसा दिव्य सत्पुरूष नसून हा साधा भीकारी आहे असे समजून त्या बाईने खूप तोंडसुख घेतले. मी ही भिक्षा माझ्यासाठी मागत नसून माझ्या गुरू साठी मागत आहे असे त्याने सांगितले. त्यावरही विेशास न बसल्यामुळे तिने त्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले आणि तुझा डोळा देशील तर मी वडे देते असे उगाच म्हणाली. गोरक्षाने लगेचे आपले बोट डोळ्याच्या बाजूने आत घातले व डोळा बाहेर काढून त्या बाईच्या हतावर ठेवला. हा सर्व प्रकार पाहून ती बाई घाबरली व मला डोळा नको असे म्हणत आंत गेली व थोडे वडे घेवून ती लगेचे बाहेर आली. त्याला वड्याची भिक्षा घालून क्षमायाचना केली.

गोरक्षनाथ ती भिक्षा घेवून गुरूकडे आले गोरक्षाने आपला डोळा न दाखविण्याचा खूप प्रयत्न केला परंतु गुरूंच्या ते ताबडतोब लक्षांत आले.मुळांत त्यांनी हे सर्व गोरक्षाची परिक्षा पाहण्यासाठीच केले होते. त्याची गुरूभक्ती व त्याला दिलेल्या विद्येचा तो कसा उपयोग करतो हे त्यांना पहावयाचे होते. मच्छिंद्रनाथांनी तो डोळा पुन्हा जसाच्या तसा त्याला लावून दिला.

आज आपल्याला हे सर्वच अविश्वसनीय,अतर्क्य व अशक्य वाटते.डोळयाच्या डॉक्टर शिवाय, हॉस्पिटल शिवाय हे केवळ अशक्य आहे हेच आपल्याला वाटते. परंतु प्राचिन विद्या, योग विद्या हे सहजतेने करू शकतात हे लक्षांत घेण्यासारखे आहे.

एकदा व्यंकटनाथ महाराजांना विचारले की पुस्तकांमधून गोरक्षासन दिले आहे हे अतीशयोक्ति पूर्ण वाटते. त्यावर त्यांनी विचारले की पुस्तकांमध्ये ते कसे दाखविले आहे?. पद्मासन घातलेली मांडी दाखविली होती. पद्मासन घातल्यावर दोन्ही पायांची पाऊले, जे सर्वांचेच सहाजीकपणेच सरळपायाचे अंगठे एर्‍हवी जसे पायी चालतांना असतात त्याच दिशेने असतात, तसे नसून फोटो मध्ये पायाचे अंगठे स्वतःच्याच पोटाकडे, म्हणजे उलटे पाय, ज्याला आपण समजतो की भुताचे उलटे पाय असतात तसे करून शिवाय,दोन्ही हात मागे नेऊन घातलेल्या मांडीचा उजवा पायाचा अंगठा उजव्या हाताने धरावयाचा आणि डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा धरून पद्मासना मध्ये ताठ बसून ध्यान करावायचे, असे दाखविले होते. त्यावर महाराज म्हणाले हे गोरक्षासन आम्ही रोजच घालीत होतो. अलिकडे घालीत नाही. हे ऐकून आश्चर्य वाटले व त्यांना विचारले की तुम्ही हे कधीतरी घातले होते कां ? त्यावर ते म्हणाले तुला शंका कां येते. म्हणून त्यांना विनंती केली की तुम्ही हे घालून दाखवू शकता कां ? त्यावर ते म्हणाले. अलिकडे ते घातले नाही, पण तुझी इच्छा असेल तर तुला घालून दाखवू शकतो, थोडा वेळ लागेल एवढेच ते काय. किती वेळ लागेल म्हणून विचारले तर म्हणाले अर्धा ते एक मिनीट लागेल. त्यांचे ८० वर्षाचे वय होते. वेळ पहाटेचे ३.३० वाजले होते.त्यांनी ते एक मिनीटाच्या आंतच करून दाखविले. केवळ अशक्य वाटणारी गोष्ट त्यांनी पाहता पाहता, बोलता बोलता सहजतेने आमच्यासमोर करून दाखविली.टाचेचा भाग समोर व अंगठ्याचा भाग आंतून होवूच शकत नाही. डॉक्टरांना देखील ते शक्य आहे अशी कल्पना करवत नाही. हे जे अविश्‍वासनीय, अतर्क्य वाटणारे आहे ते हे योगी लोक सहजतेने करून दाखवितात. गोरक्षनाथांनी आपलेच बोट घालून बुभूळ काढून हातावर दिले हे या गोष्टींमुळे अशक्य वाटत नाही.

[button link=”http://www.nathshaktipeeth.org/contact-page/” size=”large” color=”red”]संपर्क करा [/button]

[box style=”note”]भ्रमणध्वनी: श्रीकांतशास्त्री गदाधर, 98 22 36 19 31; रवीशास्त्री आसोलेकर, 98 22 77 89 31; अनिरुद्ध चौधरी, 99 22 96 19 31[/box]

[box style=”alert”]आमचा पत्ता: नाथ शक्तीपीठ, खरप रोड, न्यू तापडिया नगर, अकोला, महाराष्ट्र, इंडिया, Google Map[/box]

mrMarathi