आत्मोन्नती साधना- लेख ३८ .

"सद्गुरू सार्वभौम सत्ताधीश आहेत. ते जीवाचे पूर्वसंचित जाणोनी उचित असे मार्गदर्शन करतात. योग्य कर्म , उपासना करवून घेतात."

“इह जन्मीचे कर्म केवळ , पुढील जन्मीची दिशा ठरवी । गुरू करतील मार्गदर्शन । जाणोनी जीवाचे पूर्व संचित ।।”

श्री सद्गुरू आपल्याला घडविण्याच ब्रीद सांभाळतातच ! मग आपण का घडत नाही ? यात दोष आपलाच आहे. आपल कुठे चूकत , याचा विचार करावा. विचार करता लक्षात येत की , आपला निर्धार कमी पडतो. या संदर्भात समर्थ रामदास स्वामींच वचन सुप्रसिध्द आहे. ” बहू नाही वाडाचार , आता एकचि निर्धार ” अशी मनःस्थिती जोवर होत नाही तोवर आम्ही घडणार कसे.

श्रीगुरूंनी दिलेल नाम , त्यांनी दिलेली साधना , उपासना यालाच धरून राहणे हाच आमचा निर्धार झाला पाहिजे.

विषयांच ध्यान तुटावे म्हणून श्रीगुरूंकडे जावे.
” गुरू सारिखा असता पाठीराखा , इतरांचा लेखा कोण करी ” , या संत वचनावर पक्की श्रध्दा ठेवावी.

आपण हरएक उद्योग करित राहतो. त्यातून काहीही साधले जात नाही. उलट खुप सार्‍या चिंता मात्र वाढतात. अनेक विषयांमध्ये आपण लक्ष घालतो. त्यामुळे समाधान गमावून बसतो.

श्री गुरूंचे सामर्थ्यवर अवघा भरवसा असावा. श्रीसद्गुरू हे एक तत्त्व आहे. अशा दृष्टीन त्यांच्याकडे बघाव. त्यांना पूजाव. आपण ती देहधारी व्यक्ति आहे अस म्हणून त्यांचेकडे पाहतो. मग आपल्याला त्यांच्या सामर्थ्याची कशी जाणीव होईल. त्यांची पंचमहाभुतांवर असलेली सत्ता कशी समजेल.

सद्गुरू सार्वभौम सत्ताधीश आहेत. ते जीवाचे पूर्वसंचित जाणोनी उचित असे मार्गदर्शन करतात. योग्य कर्म , उपासना करवून घेतात.

आपुले या जन्मीचे कर्म आपला पुढील जन्म ठरविणार आहे.

भ्रमित न होता उपासनेचा नेम चालवावा. सद्गुरूंच्या कृपेन ज्ञान प्राप्त होत. प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात की , “आपल्याला ज्ञान प्राप्त होत आहे. याच पहिल लक्षण म्हणजे व्यावहारिक आणि व्यावसायिक उपजिविकेसाठी मिळालेल ज्ञान हे तुच्छ वाटते.”

श्री सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय ।
लेखक -प्रा. गजानन कुळकर्णी.अकोला.
gajanankulkarni@gmail.com

Leave a Reply