आत्मोन्नती साधना-शरीर माहात्म्य- लेख -२५

"नाथशक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथ महाराज विरचित आत्मोन्नती साधना गुरूकृपांजन आहे. या कृपांजनामुळे डोळ्यास नुसती दृष्टी लाभत नाही. दृष्टीचा डोळा लाभतो."

देह असे पाचा भुतांचा कर्ता आत्मा तेथिचा । देह असला जरी माझा , स्वामित्व नसे माझे ।।

प.पू. श्री नाथशक्तिपीठाधीश नरेंद्रनाथ महाराज विरचित आत्मोन्नती साधना हे गुरूकृपांजन आहे. या कृपांजनामुळे डोळ्यास नुसती दृष्टी लाभत नाही. दृष्टीचा डोळा लाभतो. आत्मोन्नती साधण्याची गुरूकिल्ली या साधनेतून त्यांनी दिली आहे. ही श्री नरेंद्रनाथांची गुरूकृपा. साधनेतुन परखडपणे आमचा दृष्टीदोष घालविला म्हणून झणझणीत अंजन . असे हे गुरूकृपांजन आहे. देह असे पाचा भुतांचा कर्ता आत्मा तेथिचा । देह असला जरी माझा , स्वामित्व नसे माझे ।। आत्मोन्नती साधनेतील या ओव्या आमच्या डोळ्यावरील झापड काढून टाकतात. धुंदीही उतरवतात. गर्भावस्थेपासूनच आमचेवर देहाचेच संस्कार होत असतात. देह कसा असावा. कसा जोपासावा. कसा सजवावा. याचीच चर्चा आम्ही ऐकत असतो.सर्व संस्कार कुडीचेच. केशभूषा , वेशभूषा या बाबत आम्ही नेहमीच काळजी घेतो. चांगल दिसण यावर सारा भर. चांगल असण हे दुय्यम ठरते. देह हा सच्चिदानंद ही पदवी घेण्यासाठी मिळालेल साधन आहे. याचा आम्हाला विसर पडतो. यामुळे साधन असलेल हे शरीर साध्य होत. प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज म्हणतात , देह पाचा भूतांचा बनलेला. या सृष्टीतील सर्व जीवांमध्ये पृथ्वी , आप , तेज , वायु व आकाश हे पाच तत्त्व असतात. कोणताही सजीव याला अपवाद नाही. आत्मा याचा कर्ता . या आत्म्यावर कर्माचे जे संस्कार कोरल्या जाणार आहेत ते कोरण्याच साधन म्हणजे देह. सर्व कर्म हे शरीर करेल. परंतु आम्ही कर्ता असलेल्या आत्म्यापेक्षा कर्माच साधन असलेल्या शरीराच्या कौतुकात रममाण होतो. शरीराच पोषण -तोषण करण्यात आपली सारी शक्ती , बुध्दी , युक्ती पणाला लावतो. आपल्या हे लक्षात येत नाही. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी या ओव्यातून नेमकी चूक अधोरेखित केली आहे. हा देह माझा असला तरी त्यावर माझे स्वामित्व नाही.” हे सूत्र समजवून घेण्यासाठी आपण नित्याची उदाहरणं पाहू या. व्यावहारिक दृष्ट्या आपण असे म्हणतो की , हे घर माझे आहे. याचा मालक मी आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की , घर माझे आहे , पण मी म्हणजे घर नाही. मी जेव्हा हे जग सोडून जाईल तेव्हा ते सोबत घेऊन जाता येणार नाही. घरच काय ज्याही व्यक्ति व वस्तु आपण माझ्या आहेत , मी त्याचा मालक आहे म्हणून सांगत असतो त्या सर्व इथेच माघारी राहतात. इथेच आपण सांगत आलेला मालकी हक्क खारिज होतो. खर तर आपण आयुष्यभर या चीजवस्तुंची फुकट राखणदारी करित असतो. आणि त्या चीजवस्तु म्हणजे मीही नसतो. तसेच देहाचे आहे. आत्मोन्नती साधना या वस्तुस्थितीची जाणीव करून देते. मुळात शरीर ही पाचाभुतांची उसनवारी. जे पंच महाभूतांकडून घेतले ते आपल्यातील चैतन्य संपल की पंचतत्त्वात विलिन होत. अविनाशी आत्मा हा आकाश मार्गे भ्रमण करीत राहतो. भ्रमण करीत असलेला हा आत्मा त्यावर कोरल्या गेलेल्या संस्काराला अनुरूप अशा शरीराच्या ठाव ठिकाणा शोधत राहतो. भ्रमण करित करित आत्मा मातेच्या उदरी जाई ।पुनरपि जन्मा येई नवमास पूर्ण होता. जन्म घेत रहा. जन्म घेत रहा. तेव्हा कुठे तरी कुठल्या जन्मात शरीर शुध्द होईल आणि आत्मा उन्नत होईल.

देह त्यागा उपरी तो चि आत्मा , भ्रमीत राहे जन्मोजन्मी । लिहित राही केले कर्म , शुध्द आत्मा होई पर्यंत ।। आत्म्याच्या या भ्रमण यात्रेला केव्हा विराम मिळतो ? या प्रश्नाच उत्तर साधनेच्या या ओव्या देतात.
आत्मा शुध्द झाल्याशिवाय या भटकंतीला विराम नाही. तर मग चला मिळालेला हा जन्म अपूर्व संधी प्रत्येक जीव परमात्म्याचा अंश आहे. त्या मुळे जीवाला त्याचा जीवन प्रवास माहित आहे. असे असूनही जीवाची भटकंती होते. जीवन नौका भरकटते. परमात्याशी अनुसंधान तुटण्यानी अस होते. जीवाने परमात्म्याशी अनुसंधानात असलेच पाहिजे. अनुसंधानासाठी कर्म केल पाहिजे. कर्मानी परमात्म्याशी एकरूपता साधल्या जाते.

भटकंतीमुळे जीव योग-भोगाच्या फेर्‍यात अडकून राहतो. जो पर्यंत शरीर शुध्द होऊन आत्मा उन्नत होत नाही तोवर पुनरपि जननम् पुनरपि मरणम् पुनरपि जननी जठरे शयनम् । आलाच. जन्म मृत्यूच रहाट गाडग फिरतच राहणार. ब्रह्मांडाची हीच योजना आहे. या योजनेमध्ये किती जन्म घ्यायचे , किती भटकंती करायची हे ज्याच त्यानी ठरवायच आहे.
मानु या. श्री गुरूमार्गी होऊ या.आत्मा उन्नत करणारे कर्म करू या.
श्री नरेंद्रनाथ महाराज की जय!

लेखक – प्रा. गजानन कुळकर्णी.gajanankulkarni19@gmail.com

Leave a Reply