गुरू पौर्णिमा

आपल्या सर्वाचाच अनुभव आहे कि, होऊन गेलेल्या थोर व्यक्ती किंवा संतांचे स्मरण झाले की मन कसे भाराहून जाते आपण त्यावेळी असतो तर …..  किंवा  अशा विभूतींची भेट झाली असती तर …. असे  अनेक विचार तरंग मनात येऊन जातात.

हे विषेश की अशावेळेस आपण आजचे सत्पुरुष जे उद्याच्या पिढीचे आदर्श असतात ह्याच्या कडे  मात्र आपण सहजतेने दुर्लक्ष करतो आणी जीवनातील एक सुवर्ण संधी वाया घालवितो.

खर तर आपण संभ्रमीत झालो असतो आणी आपणच आपली प्रगती खुटवितो.

पूर्व पुण्याई,  सुक्रुत म्हणून आपण गुरू तर करतो पण गुरू विषयी सदा संभ्रमित राहतो, त्या पेक्षा गुरू न करता आपले मन अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा कांही जन्म जास्त लागतील येवढेच काय ते.

गुरू करून सर्व सोपस्कार करीत रहायचे, दर वर्षी नुसतीच गुरूपौर्णीमा  करीत रहायची ह्याने आपले इप्सित कसे साध्य होइल?

गुरुकडून जे साध्य करायचे ते साधण्याचा सतत् प्रयत्न करीत रहा, गुरूंच्या पोटात शिरून जे पाहिजे ते त्यांच्या कडून घ्या, गुरूंशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा.

हे केल्यानेच आपण आपली उन्नती साधुशकाल.

Leave a Reply