अनुक्रमणिका

विभूति महात्म्य

गुरुचरित्र अध्याय 29 – भस्म मुळे ब्रम्हराक्षसाचा उद्धार

गुरुचरित्राच्या २८व्या अध्यायात भस्मधारणेनें शुद्राच्या ज्ञानात बुद्धीत झालेला आमूलाग्र बदल आपण पाहिला. *कर्मविपाक सिद्धांत* या शीर्षकाखाली तो लेख लिहिला होता. जमिनीवर सात रेषा काढून प्रत्येक रेषा ओलांडताना त्या त्या जन्मातील कहाणी तो जीव सांगत होता. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद ऐकवले. त्याही वेळेला सात रेषा ओलांडल्यानंतर तो रेडा वेद म्हणू लागला. या दोन्ही घटना योग क्रीयेच्याच आहेत.

अलीकडच्या काळातही अंतराळातून टीव्हीच्या वा फोनच्या लहरी पकडून बोलणे ऐकणे वा चलचित्र पाहणे ही वैज्ञानिक प्रगती म्हटली पाहिजे. हे मंत्रांचे वास्तविक रूपात स्थित्यंतर करणे झाले. कृत, त्रेता आणि द्वापार युगात यांत्रिकीकरण नव्हते, त्यावेळी योग क्रिया यांनाच महत्व होते.

वामदेव आणि ब्रम्हराक्षस

कृतयुगातली गोष्ट गुरूंनी सांगितली. ते म्हणाले की वामदेव योगी घरदार बायकामुले यांचा त्याग करून संन्यास घेऊन देशाटन करीत होते. फिरत फिरत ते दक्षिण देशातील दंडकारण्यात पोचले. तेथे राक्षसांचा संचार होता. त्यात ब्रम्हराक्षसही होते.

वामदेवांनी, *“माझ्या अंगच्या भस्म स्पर्शाने तुला ज्ञान आले”* असे सांगितले. त्याचा महिमा सांगावा म्हटल्यावर वामदेव म्हणाले—

देवदिकांनाही त्याचे महत्व वर्णन करता येत नाही. महादेवांनीच ज्याला ‘आपला’ म्हणले त्याचे महत्व आणखी कोणत्या शब्दाने वर्णावे?

भस्माच्या महिम्याचा दृष्टांत

वामदेव पुढे म्हणाले:

दक्षिण देशात एक ब्राम्हण होता. स्वतःचा धर्म न पाळता, आचरहीन वागणारा होता. तो एका वेश्येकडे नेहमी पडून असे, त्यामुळे तो जातिबाह्य केला होता. एकदा असेच गैरकृत्य करीत असताना एका शुद्राने राग येऊन त्याचा वध केला आणि गावाबाहेर टाकून दिले.

तेथे एक कुत्रे आधीच भस्मावर बसलेले होते, ते त्या प्रेताजवळ आले आणि त्याला खाण्यासाठी त्याच्या उरावर बसले. त्या श्वानाचे पोटावर असलेले भस्म त्या प्रेताला लागले.

ते पाहून त्या जीवाला शिवपुरी नेण्यासाठी शिवदूत आले. यमदूत त्या जीवाला घेऊन जात होते, ते पाहून शिवदूतांनी यमदूतांना दूर सारले व त्या जीवास घेऊन गेले.

यमदूतांनी यमाला सांगितले. यम म्हणाला:

*“ज्याची भस्मांकीत तनु आहे, त्यांना तुम्ही आणू नका. त्याने कितीही पाप केले तरी तो भस्मधारणेने शुद्ध होतो. जो रुद्राक्ष धारण करतो तोही शिवपुरीचा अधिकारी.”*

हे ऐकताच ब्रम्हराक्षसही ज्ञानी झाला आणि म्हणाला की 25 जन्मापूर्वी केलेल्या पुण्यकर्माचे फळ म्हणून आज तुमचे दर्शन झाले आहे. त्याने विनंती केली—*“भस्म महात्म्य, लावण्याचा विधी सांगा आणि उपकृत करा.”*

भस्माची उत्पत्ती – देवर्षी सनत्कुमारांचा प्रश्न

वामदेव म्हणाले:

पूर्वी ईश्वचराची महासभा भरली होती. गंधर्व, यक्ष, राक्षस, किन्नर, विविध गण उपस्थित होते. पार्वतीमाता सुद्धा उपस्थित होती.

तेवढ्यात देवर्षी सनत्कुमार आले आणि म्हणाले—

*“देवा, ईश्वरप्राप्तीची अनंत साधने आहेत; पण कलियुगातील मानव कष्टाने पिचलेला आहे. सहज धर्म घडेल असा उपाय सांगा.”*

ईश्वर प्रसन्न झाले व म्हणाले:

“वेदशास्त्र संमत असा एक उपाय आहे—भस्मधारण. त्रिपुंड्र कसे लावावे, किती लावावे, कोणत्या मंत्राने लावावे…”

आणि ईश्वरांनी संपूर्ण भस्माधारण विधी सांगितला.

त्यामुळेच त्या ब्रम्हराक्षसाचा उद्धार झाला, असे वामदेवांनी सांगितले.

निष्कर्ष

गुरुचरित्राच्या २९व्या अध्यायात भस्माचे महात्म्य व त्याची मुक्तिदायक शक्ती स्पष्टपणे सांगितली आहे. भस्म हे केवळ पदार्थ नसून ईश्वरसंमत योगतत्त्व आहे.