अनुक्रमणिका

ब्रह्मांड कसे चालते

ब्रह्मांड कसे चालते हे खरोखरच एका महान गूढासारखे आहे. एवढे विराट, अनंत आणि अवकाशभर पसरलेले ब्रह्मांड कोण चालवते, कसे चालवते आणि तेही अखंड, बेमालूम, निर्विघ्न — हा प्रश्न विचार करणाऱ्या प्रत्येक जीवाला पडतो. युगानुयुगे, दिवस-रात्र, क्षणोक्षणी चालणाऱ्या या व्यवस्थेत कुठेही गोंधळ नाही, विस्कळीतपणा नाही. सर्व काही जणू पूर्वनियोजित, स्वयंचलित आणि नियमबद्ध आहे.

ह्या विश्वयंत्रणेचे रहस्य समजून घेण्यासाठी त्यामागील तत्त्वप्रणाली समजणे अत्यावश्यक आहे.

ब्रह्मांडाची कार्यपद्धती

मानवजीवनाशी संबंधित ब्रह्मांडातील एकत्रित कार्यपद्धती सात प्रमुख घटकांवर आधारित आहे. ह्यालाच सप्तवर्गीय नियंत्रण योजना असे म्हणतात. आधुनिक भाषेत सांगायचे तर ही एक प्रकारची विश्वव्यापी *मॅनेजमेंट सिस्टीम* आहे.

ही सात मूलभूत तत्त्वे अशी:

1. पंचमहाभूते 2. चार वर्ण 3. चार युगे 4. चार निजतत्त्वे 5. चार गुण 6. जन्मकुंडलीतील बारा घरे 7. बारा राशी आणि त्यांचे योग-भोग

ही सर्व तत्त्वे स्वतंत्र असूनही परस्परांशी इतकी सूक्ष्मतेने गुंफलेली आहेत की संपूर्ण ब्रह्मांड एक अखंड, सुसूत्र, स्वयंघडीप्रमाणे कार्यरत राहते.

ब्रह्मांडाची तत्त्वप्रणाली — धर्मनिरपेक्ष सत्य

ब्रह्मांडातील तत्त्वे ही एका धर्मासाठी नाहीत. ती सर्वव्यापक, शाश्वत आणि धर्मनिरपेक्ष आहेत.

सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे, तारांगण, पृथ्वी आणि पंचमहाभूते — यावर कोणत्याही धर्माचा किंवा व्यक्तीचा अधिकार नसतो. जसे डॉक्टराचा धर्म रुग्णाला बरा करण्यात अडथळा आणत नाही, तसेच या तत्त्वांचे कार्यही कोणत्याही धार्मिक सीमांपलीकडे जाऊन सर्वांवर समान रीतीने होते.

ही तत्त्वे हिंदू धर्माने प्रथम मांडली, पण त्यांचा परिणाम संपूर्ण मानवजातीवर सारखाच आहे.

पंचमहाभूतांचा जीवावर परिणाम

प्रत्येक जीव अहोरात्र पाच महातत्त्वांच्या संपर्कात आणि नियंत्रणाखाली असतो. या तत्त्वांचे मूळ गुण सतत जीवाच्या शरीरावर, मनावर, चित्तावर व वृत्तीवर प्रभाव टाकत असतात.

१. पृथ्वी तत्त्व

काम, क्रोध, मद, मोह, मत्सर — हे पृथ्वीचे प्राथमिक गुण. पृथ्वीशी शरीरातील अहंकार, प्राण, गंध, नाक, गुद, हाड, मांस, त्वचा, नाड्या जोडलेल्या आहेत. भूमितत्त्व राशी: वृषभ, मकर, कन्या

२. आप (जल) तत्त्व

आवड, चव, बुद्धीची स्वच्छता — हे विशेष गुण. मूळ गुण: सत्त्व राशी: मीन, वृश्चिक, कर्क

३. तेज / अग्नी तत्त्व

शिस्त, पावित्र्य, प्रकाश, शुद्धता यांसह शरीरातील भूक, तहान, झोप, मैथुन यांचा संबंध. राशी: मेष, सिंह, धनू

४. वायू तत्त्व

वायूतत्त्वाशी मन, बुद्धी, चित्त, स्पर्श, रूप संबंधित. पंचप्राण — प्राण, अपान, व्यान, उदान, समान — हे पूर्णपणे वायूतत्त्वाचे. राशी: कुंभ, तूळ, मिथुन

५. आकाश तत्त्व

अंतःकरण, शब्द, वाणी, भीती, शोक, मोह — हे आकाशतत्त्वाशी जोडलेले. आकाशतत्त्वाची स्वतंत्र रास नाही.

चार वर्ण

मानवातील प्रवृत्ती, कर्तव्ये आणि मनोवृत्तींचे विभागीकरण चार वर्णांत केले आहे — ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे शरीरधर्म नव्हे तर गुणधर्म असल्याचे धर्मग्रंथ स्पष्ट करतात.

चार युगे

सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग — प्रत्येक युगाचे स्वतःचे गुण, स्पंदने आणि परिणाम असतात. त्या त्या युगातील जीवांची जडणघडण त्या युगधर्मानुसार होत असते.

चार निजतत्त्वे

१. भूमीचे निजतत्त्व २. जळाचे निजतत्त्व ३. अग्नीचे निजतत्त्व ४. वायूचे निजतत्त्व

ही निजतत्त्वे प्रत्येक जीवावर सूक्ष्म परिणाम घडवितात.

चार निजगुण

सत्त्व, रज, तम, सम ही चार गुणप्रवृत्ती जीवाच्या स्वभावाचे, निर्णयांचे आणि आध्यात्मिक प्रवासाचे निर्धारण करतात.

जन्मपत्रिका — १२ घरे

जन्मकुंडली बारा घरांची असून, प्रत्येक घराचे स्वत्व आणि महत्त्व आहे. कोणता ग्रह कोणत्या घरात व कोणत्या राशीत आहे यानुसार जीवाचे योग, भोग, सुख-दुःख, प्रगती-अडथळे घडतात.

बारा राशी

मानवजात संपूर्णपणे बारा राशींशी विभागलेली आहे. प्रत्येक राशीचे आयुष्यावर विशिष्ट ब्रह्मांडीय परिणाम होत असतात.

पुढील अभ्यास

या सर्व तत्त्वांचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास “हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वसंचिताचा” या नाथ शक्तिपीठ प्रकाशित ग्रंथात विस्तृतरीत्या दिलेला आहे. या पुस्तकाला श्री जगद्गुरु शंकराचार्य करवीर पीठ यांचे आशिर्वाद लाभले आहेत.

ही मूलभूत माहिती लेखमालेतील विविध लेख समजण्यासाठी उपयुक्त ठरावी, म्हणून ती येथे थोडक्यात दिली आहे.