श्री पराग महराज चातुर्मास्ये यांचे वारकरी कीर्तन पुष्प तिसरे

नाथ संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा, तसेच नाथपंथाची आध्यात्मिक परंपरा, विचारधारा आणि गुरुभक्तीचा वारसा समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचावा, या उदात्त हेतूने नाथ शक्तिपीठाच्या वतीने या भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या तिसऱ्या पुष्पाला प्रमुख पाहुणे म्हणून अकोला-वाशिम-बुलढाणा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. वसंतजी खंडेलवाल यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वृद्धिंगत झाली.

तसेच नागपूर येथून सीए श्री. दिलीप रोडी यांचीही या प्रसंगी विशेष उपस्थिती होती. ते अत्यंत कुशल धोरणी, अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित आहेत. त्यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

नाथ शक्तिपीठाच्या या उपक्रमातून नाथ संप्रदायाची महान परंपरा, अध्यात्मिक विचार आणि संतांच्या शिकवणीचा प्रसार समाजात अधिक व्यापक स्वरूपात होण्यास निश्चितच हातभार लागत आहे.