अनुक्रमणिका

अतिसौरी महायाग २०१७

सहस्त्रचंद्र दर्शन व द्वितपःपूर्ती सोहळा

श्री नाथशक्तिपीठाधीश प. पू. सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराजांनी १९९३ साली सुरू केलेल्या नाथपंथाची सिद्धता, व्यापकता, व उपयुक्तता या त्रिवेणीवर आधारित कार्याचा द्वितपःपूर्ती सोहळा आणि प. पू. सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराजांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा श्रीनाथशक्तिपीठ परिवाराच्या वतीने, अनुग्रहीत शिष्य, भाविक भक्त आणि नाथशक्तिपीठाकडून लाभ घेतलेल्या सर्वांनी मिळून आयोजित केला आहे.

हा सोहळा दि. २१ जानेवारी ते दि. २७ जानेवारी २०१७ दरम्यान संपन्न होत आहे.

अतिसौरी महायाग आणि विविध कार्यक्रम

या निमित्ताने खालील विविध आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे — अतिसौरी महायाग, चारही वेदांचे पारायण, विदर्भात प्रथमच होणारे भाष्यपठण, कीर्तन महोत्सव, विशेषांक प्रकाशन, लक्ष अन्नदान संकल्प, हसत-हसत संस्कृत बोलायला शिका, आरोग्यम् धनसंपदा ही व्याख्यानमाला इत्यादी.

हे पुढील वर्षभर चालणाऱ्या विस्तृत कार्यक्रमांचे पहिले चरण असून या वर्षात नामस्मरण, ग्रंथवाचन, अनुष्ठान-हवन, प्रवचन, व्याख्यानमाला, कीर्तन महोत्सव, ग्रंथ प्रकाशन, विशेषांक प्रकाशन, वृत्तपत्र पुरवणी, संत संमेलन, स्वच्छता अभियान, कीर्तन (शिबीर) कार्यशाळा अशा बहुविध कार्यक्रमांचे आयोजन श्री नाथशक्तिपीठ करणार आहे.

हवन, कीर्तन महोत्सव आणि विशेषांक प्रकाशन

या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचा श्रीगणेशा दि. २१ जानेवारी २०१७ पासून होत आहे. या निमित्ताने दि. २१ ते दि. २७ जानेवारी २०१७ पर्यंत ९ कुंडी हवन अनुष्ठान होईल.

तसेच दि. २१ ते दि. २५ जानेवारी २०१७ पर्यंत श्री नाथशक्तिपीठ येथे रोज सायंकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत नारदीय कीर्तन महोत्सव होणार आहे.

या महोत्सवाचे निमित्त साधून कीर्तन विशेषांकाचे प्रकाशन देखील केले जाईल. या कार्यक्रमाची दखल वृत्तपत्रांनीही घेतली आहे.