पुणे, बेळगाव, गोवा, शृंगेरी या प्रसार दौर्यावर असताना प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमास भेट दिली.
या प्रसंगी सनातनचे श्री प्रकाश मराठे यांनी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचे शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन श्रद्धापूजन केले.
सनातनच्या साधिका कु. प्रिया लोटलीकर, संशोधन प्रमुख, यांनी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या यज्ञावेळी यज्ञकुंडातील पवित्र ज्वाळांमधून आपल्या उपस्थितीची साक्ष देणाऱ्या देवतांची अनुभूती वे. शा. सं. श्रीकांत शास्त्री यांच्याकडून समजावून घेतली.
प. पू. नरेंद्रनाथ महाराजांना पाहताक्षणीच “आपले दर्शन होणे हे आमचे भाग्यच म्हटले पाहिजे” असे शब्द सनातनचे संस्थापक प्रमुख परमपूज्य डॉ. जयंत आठवले यांच्या मुखातून बाहेर पडले.
सनातनचे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या समवेत प. पू. नरेंद्रनाथ महाराजांची सदिच्छा भेट दीड तासांपर्यंत चालली.
या भेटीत हिंदू धर्म, सनातन धर्म, नाथपंथाचे योगदान, त्यांचे कार्य, विविध भाषा इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी श्री श्रीकांत शास्त्री यांनी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराज यांच्या कार्याची माहिती डॉ. आठवले यांना दिली. देवतांच्या प्रतिमा अग्नीज्वाळेतून प्रगट झालेल्या छायाचित्रे पाहताना ते आपले आश्चर्य लपवू शकले नाहीत आणि उद्गारले — “विशेष आहे. आध्यात्मिक सिद्धतेशिवाय हे होणे शक्यच नाही.”
नाथशक्तीपीठातून सुरू असलेले कार्य व उपक्रम यांचा आधार वेद व नाथपंथाची कृपासिद्धता आहे. यांच्या माध्यमातून भाग्याचे पुनरुज्जीवन ही नाथपंथाच्या सिद्धतेची व महाराजांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची साक्ष आहे.
“सनातन प्रभात” या दैनिकाच्या माध्यमातून, नाथशक्तीपीठाच्या प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या सर्व उपक्रम आणि प्रकल्पांना अग्रक्रमाने प्रसिद्धी देऊ, असे प्रतिपादन परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी केले.
हिंदू राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नांसाठी श्री नरेंद्रनाथ महाराजांनी उत्तम प्रकृती व कार्यक्षमता वाढवावी, अशी विनंती करून त्यांनी प. पू. नरेंद्रनाथ महाराजांकडून विभूतीप्रसाद व सांगितलेला उपचार ग्रहण केला व महाराजांनी दिलेला वैदिक उपचार करणार असल्याचे आश्वासन दिले.
नाथपंथामध्ये विभूतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजही विभूतीचे अलौकिक सामर्थ्य प्रत्यक्ष प्रचितीला आले. प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या सामर्थ्याने सिद्ध झालेल्या विभूतीमुळे प. पू. डॉ. जयंत आठवले यांना त्याच दिवशी आराम जाणवू लागला.
यावेळी प. पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांनी लिहिलेल्या — “नवनाथ बोधामृत”, “हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वसंचिताचा”, “वेद मंत्राच्या माध्यमातून भाग्याचे पुनरुज्जीवन” या ग्रंथसंपदेची भेट देण्यात आली.
सनातनच्या आश्रमातील कार्यपद्धती व तेथील साधकांची कार्यतन्मयता पाहून प. पू. नरेंद्रनाथ महाराजांनी समाधान व्यक्त केले.