अनुक्रमणिका

राशींप्रमाणे उपासना व उपाययोजना

सृष्टीवरील सर्व मानवजात ही बारा राशींत विभागली आहे. ह्या बारा राशी चार तत्त्वांमध्ये कशा विभाजल्या आहेत, हे आपण पाहिले आहे. म्हणजे भूमितत्त्वात वृषभ, मकर व कन्या ह्या राशी; जलतत्त्वात मीन, वृश्चिक व कर्क ह्या राशी; अग्नितत्त्वात मेष, सिंह व धनू ह्या राशी; व वायुतत्त्वात मिथुन, तूळ व कुंभ ह्या राशींचा समावेश होतो, असे आपण ह्यापूर्वीच पाहिले आहे.

महातत्त्वानुसार राशींची उपासना

आता ह्या प्रत्येक महातत्त्वामध्ये मोडणार्या राशींच्या लोकांनी काय व कशी उपासना करावी, हे आपण पाहू. म्हणजे वृषभ, मकर व कन्या; मीन, वृश्चिक व कर्क; मेष, सिंह व धनू; व मिथुन, तूळ व कुंभ अशा चार प्रकारांचे गट पद्धतीने विवेचन करू.

सत्ययुगात प्रभावी असलेले भूमितत्त्व – वृषभ, कन्या, मकर राशी

वृषभ, कन्या व मकर राशी भूमितत्त्वाच्या आहेत. सत्ययुगामध्ये भूमितत्त्व प्रभावी होते. ह्या भूमितत्त्वाचा निजगुण सत्य आहे. ह्या तीनही राशींतील विविध लोकांनी आपली उपासना ही पूर्व दिशेकडे तोंड करून करावी.

जीवनातील सर्वच महत्त्वाचे काम हे पूर्व दिशेपासूनच सुरू करावे. ह्या लोकांच्या जीवनातील भरभराटीची दिशा म्हणजे पूर्व. सर्व प्रकारचा अभ्यास, ज्ञानसाधना ही पूर्वेकडूनच सुरू करावी. सर्व प्रकारचे प्रयत्न हे पूर्व दिशेकडूनच करावेत.

भूमीचे जे निजतत्त्व *सत्य*, त्याची सिद्धता प्राप्त करणे हे पूर्व दिशेकडूनच सुलभ आहे. ब्रह्मांडाशी भूमितत्त्वाचा जो काही संबंध आहे, त्यानुसार ह्या राशींच्या लोकांना पूर्व दिशेकडून मिळणारी ऊर्जा जास्त प्रभावी व फलदायी आहे.

उपासनेसाठी शुभ वेळा

ह्या राशींच्या लोकांना महिन्याचे पहिले पंधरा दिवस म्हणजे पंचांगातील शुद्ध पक्ष हा उत्तम फळ देणारा आहे. वद्य पंधरवडा हा त्यामानाने कमी फलदायी असतो. शुद्ध पंधरवड्यात महत्त्वाची कामे करण्यास योग्य काळ आहे.

उपासना ही नित्यनियमाने अखंड चालू राहिली पाहिजे.

दिवसाचे प्रहर व उपासनेचा संबंध

दिवसाचे चार प्रहर:

वृषभ, कन्या, मकर राशींच्या लोकांसाठी तिसरा व चौथा प्रहर — रात्र १०.३० ते पहाटे २ — उपासनेसाठी अतिशय फलदायी आहे.

या वेळेत केलेल्या विविध योजना चांगल्या प्रकारे यशस्वी होतात.

चंद्रनाडीचे महत्त्व

माणसाला दोन नाकपुड्या असतात:

श्वासोच्छ्‍वास हा नाडी बदलत असतो आणि ब्रह्मांडातील ग्रहांशी त्याचा संबंध आहे.

भूमितत्त्वाच्या लोकांनी *चंद्रनाडी सुरू असताना* साधना, अभ्यास, नियोजन व महत्त्वाची कामे करावी. जर चंद्रनाडी सुरू नसेल तर उजवी नाकपुडी बंद करून डावी सुरू करावी.

वासना व नियंत्रण

या तिन्ही राशींच्या लोकांची वासना अन्न, स्वाद, रसना यांत असते. जन्ममरणाच्या भोगांची तीव्रता कमी करण्यासाठी ही वासना नियंत्रित करणे आवश्यक आहे. ह्या लोकांनी अन्नदान करीत राहावे.

उपासना, मंत्र व धाम यात्रा

जन्मनक्षत्र मंत्र रोज सांगितलेल्या वेळेत म्हणावा.

ह्या तिन्ही राशींच्या लोकांनी जगन्मातेची उपासना:

ॐ ऐं र्‍हिं क्लिं चामुंडायै विच्चे (१०८ वेळा रोज)

तसेच जगन्नाथपुरी धाम यात्रेचा या राशींसाठी विशेष लाभ आहे.

ज्ञानदेव महाराजांचे गुण, त्यांचे तत्त्व आणि प्रभाव हे भूमितत्त्वाशी निगडित असल्याने ज्ञानेश्वरीचे वाचन उपयुक्त ठरते.

राशींचे व्यवहार गुण

भूमीचा संबंध जीवनोपयोगी वस्तूंशी असल्याने ह्या लोकांचा व्यावहारिक भाव वाढता असतो. अन्नधान्य, जमीन, शेती, राजकारण, व्यवहार यामध्ये ही माणसे प्रावीण्य मिळवतात.

ह्या राशींचे निजतत्त्व ‘सत्य’ असल्याने खोटे बोलणे, खोट्या व्यवहारांमुळे नेहमी नुकसान होते.

आहार, प्रकृती, वर्ण

ही माणसे रजोगुणी व वातूळ प्रकृतीची असतात. वात वाढविणारे पदार्थ वर्ज्य करावेत.

ही तीनही राशी प्रामुख्याने वैश्य वर्ण दर्शवितात.

वृषभ रास

या राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्राचे चैतन्यस्वरूप पिंपळाच्या वृक्षात आहे. पिंपळाखाली केलेली उपासना फलदायी ठरते.

उपासनेची वेळ — पहाटे ३ ते ६ दिशा — उत्तरेकडे तोंड करून

मंत्र (१०८ वेळा):

कन्या रास

स्वामी: बुध वास्तव्य: आघाडा वृक्षाखाली

उपासनेची वेळ — पहाटे ४ ते ६ दिशा — दक्षिण

मंत्र (१०८ वेळा):

मकर रास

स्वामी: शनी वास्तव्य: शमी वृक्षाखाली

उपासनेची वेळ — सूर्योदयापूर्वी दिशा — दक्षिण

मंत्र (१०८ वेळा):

सारांश

इतर मंत्रांचा शुद्ध उच्चार व अधिक माहिती नाथशक्तिपीठातून घ्यावी.