Narendra Nath

Narendra Nath

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 142

भजनाचा स्वर्ण महोत्सव कार्यक्रम आणि वेद प्रचार प्रसार आणि शिक्षणाचा रजत महोत्सव कार्यक्रम पूर्वनियोजनाप्रमाणे पार पडला. कार्यक्रम उत्साहात आणि निर्विघ्नपणे पार पडला. सर्वांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येवर कार्यक्रमात, विपरीत परिस्थितीत हजर राहिले यातूनच कार्यक्रमाची महती लक्षात येते.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 141

गुरूंचे कोणत्याही करणांनी मूल्यांकन करणे हे शिष्याला अथवा भक्तांना शोभत नाही शिष्यांनी व भक्तांनी निसंदेह पणे आपल्या गुरुंची सेवा करावी व गुरूंनी सांगितलेल्या उपासनेत मग्न असावे गुरूंचे मूल्यांकन करण्याची योग्यता शिष्यामधे वा भक्तांमध्ये नसते आणि असे करण्याने ते आपले मन कमकुवत करीत असतात.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 140

नाथपंथ हा जाती-जमातीच्या पलीकडे जाऊन लोककल्याणार्थ कार्य करणारा पंथ आहे. हा पंथ सृष्टि निर्मितीचाच एक भाग आहे. हा पंथ ब्रह्मांडचेच कार्य करतो. मानव जातीच्या उद्धारार्थ कार्य करतो. हे अखंड परंपरागत गुरूकार्य आहे. त्यामुळे केवळ हिंदूंसाठी कार्य करणे हे पंथ शिस्तिच्या आणि योजनेच्या बाहेर आहे.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 139

निवृत्तीनाथांना कुठे तपःश्चर्येला बसावे लागले नाही, की काहीच करावे लागले नाही. पंथाची सर्व सिद्धता पूर्व नियोजनाप्रमाणे त्यांना मिळाली आणि गुरू गहिनीनाथांच्या आज्ञेनुसार हा पंथ पुढे कार्य दिशा देऊन,वाढविण्याची व पंथ कार्यरत ठेवण्याची जबाबदारी निवृत्तीनाथांवर आली. पंथाच्या सर्व पद्धती, शिस्त, चालिरिती, धोरण व पंथ विकासाची कार्याची दिशा गुरू गोरक्षनाथांनी निवृत्तीनाथांना सांगितली.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 138

अयोनी संबंधातून प्रगट झालेल्या सर्वनाथांनी आपल्या सर्व शक्ती, सामर्थ्य देवतांनी दिलेले वचन आणि वाम शक्तींनी दिलेले वचन आणि स्वतः निर्माण केलेले काव्य मंत्र हे गहिनीनाथांकडे सोपवून गोरक्षनाथांच्या योजनेप्रमाणे गहिनीनाथांनी ते सर्व, निवृत्तीनाथांकडे सोपविले.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 137

दत्तात्रेयांच्या जन्मभूमितील अनुभूती कायम स्फुरण देणाऱ्या आहेत. मास्टर बाबा एक साधू म्हणाले, ‘महाराजजी अनसूया माता ने बताया हैं की आनेवाले नजिकके समय में आप ऐसा भवन बनाने जा रहे है जिसकी दुनियामे कोई मिसाल नही हैं । सभी देव देवतायें वहाँ पर निवास के लिये आऐंगी।’ नाथ शक्तीपिठाची स्थापना ह्या घटनेनंतर ३ वर्षांनी झाली.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 136

गुरुचरित्राचे सात दिवसात पारायण केल्यास कोणतीही इच्छा पूर्ण होते. सिद्ध सांगतात असे गुरु ओळखण्यासाठी आधी आपला आचार शुद्ध मनात दृढ भक्ती असावी लागते. मनात संशय नसावा .माया मोह क्रोधलोभ अशा षड्विकारांमुळे चिंता क्लेषादी विविध तापही त्रास देतात त्यामुळे श्रीगुरु कृपेचा लाभ मिळत नाही.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 135

आपल्या भक्ताला आपल्या शिष्याला अंतर्बाह्य घडवताना त्या शिष्याच्या अवतीभवती सातत्याने राहून त्याची कठीण परीक्षा घेऊन त्याला साहाय्यभूत व्हायचं आणि परीक्षेत नापास न होऊ देता त्याचं धारिष्ट्य वाढवायचं हे कार्य गुरु सतत करीत असतात

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 134

कुठल्याही प्रकारच्या वेद मंत्रांचे अध्ययन नरेन्द्रनाथांनी केले नाही, पण गुरुकृपेने वेदाच्या कुठल्याही मंत्राची अनुभूती ते कोणालाही देऊ शकतात. दुसर्‍याला कर्म सांगून स्वतःच्या कर्माची जोड देऊन पाहिजे त्या समस्यांचे निराकरण ते करु शकतात. बरेचदा ते करीत असताना यजमानाच्या ग्रहदोषांचा त्रास त्यांना स्वतःवर ओढून घ्यावा लागतो. परिणामतः प्रकृती ठीक असूनही विज्ञानाला न उलगडणारे कोडे पडते.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 133

375 वर्षा पूर्वीचे योगी व नरेन्द्रनाथांची भेट ही सर्व लोकांच्या आकर्षणाचा विषय होता. दोघांमधे नजरेतून गुप्त चर्चा सुरू असल्याचे इतरांना भासत होते. नरेन्द्रनाथांच्या भेटीचा त्यांना खूप आनंद झाल्याचे दिसत होते. त्यांच्या कडून सुरू असलेल्या कार्याचे त्यांनी त्यांच्या कृतीतून खूप कौतुक केले होते. त्यांनी सांकेतिक रूपाने एक वस्तू आणि ५००० रुपये दिले.
mrMarathi