अध्यात्मिक वाटचाल

नाथ शक्तीपीठ आणि नरेंद्र नाथ महाराजांच्या कार्याचे संदर्भ ‘मासिक पत्रक’ ह्या शिर्षकाअंतर्गत आम्ही प्रकाशित करीत असतो. वाचकांनी ह्याचा अवश्य लाभ घ्यावा आणि काही समस्या असल्यास संपर्क करावा.

आत्मोन्नती साधना- लेख-४८

"इंद्रिय भक्तिमार्गाकडे वळली की , मनाच विषयात लोळण बंद होत. ते ईशचरणी धाव घेत.मन स्थिर झाल की बुध्दि स्वतंत्र होते. कामाच वसतीस्थान स्वतंत्र होतात. आपली वाटचाल परब्रह्म प्राप्तीसाठी निर्धोक होते. सद्गुरूंच्या मार्गदर्शनान हे शक्य होते. "

आत्मोन्नती साधना- लेख – ४७.

"अनुग्रहितानी निरपराध नामधारक झाल पाहिजे. यासाठी पहिले नामाच माहात्म्य जाणल पाहिजे.महत्त्वाच म्हणजे नामाचे अपराध समजुन घेतले पाहिजे. ते कसोशिन टाळले म्हणजे नाम साधना फलद्रुप होते. "

आत्मोन्नती साधना – लेख ४५.

प.पू. नाथशक्तिपीठाधीश श्री नरेंद्रनाथ महाराज विरचित "आत्मोन्नती साधना सांगते की , श्री गुरूंच्या कृपाकटाक्षाने भवरोगाची सारी लक्षण नाहीशी होतात. दुर्मती सुमती होते. जो मुढ आहे तो ज्ञानी म्हणून सर्वांच्या प्रशंसेस पात्र होतो."

आत्मोन्नती साधना. लेख- ४४ .

"संतही श्रीमंत असतात. त्यांच्या संगतीला आलेल्या प्रत्येकास ते श्रीमंत बनवितात. आपण श्रीमंत कस झालो याची युक्ति ते सांगतात. आपल्या जवळच महाधन ते खुशाल लुटतात".

आत्मोन्नती साधना लेख -४३.

"गुरूमार्गी जीवाचा त्रिविध ताप नाहीसा होतो. नाही तरी त्याची तीव्रता तरी बोथट होते. जशा व्याधी नाहीशा व्हायला लागतात तसा गुरूमार्गी जीव संपन्न होत जातो."

आत्मोन्नती साधना लेख-४२.

"अखिल ब्रह्नांडा मध्ये ज्ञान देण्याचा सर्वाधिकार श्री सद्गुरूंचाच आहे. ईश्वरान ब्रह्मांडाची निर्मिती केली. मात्र त्यानींही हा अधिकार आपल्याकडे ठेवला नाही."

आत्मोन्नती साधना लेख -४१.

"या तनाच्या यातना चूकवायच्या आहेत का , मग संत संग धरा. संत हेच सद्गुरू. त्यांना शरण जाव. ते आपल्या पदरात सुखाच माप भरभरून ओततात. आपल्या वासनेचा विषय नारायण करतात".

आत्मोन्नती साधना- लेख ४० .

"जस अन्नरस हा शरीराला पुष्ट , संतुष्ट करतो. तस श्री सद्गुरूंनी दिलेल नाम हे आत्म्याला पुष्ट , संतुष्ट, करत. कर्म उपासनेन शरीर व आत्मशुध्दी होते. आत्मोन्नती साधण्यासाठीचा हा गुरूमार्ग आहे."

आत्मोन्नती साधना- लेख ३९ .

"आपले शरीरच पंचमहाभुतांची देण आहे. या तत्त्वांना कसे आनंदित करावे. यांची नेमकी पुजा कशी करावी. या पाच तत्त्वांची कृपा कशी संपादन करावी. कोणते उचित कर्म करावे. या बाबत प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज मार्गदर्शन करतात."
mrMarathi