अमरकथा

भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासात अमरकथांचे संदर्भ अतिशय महत्वाचे आहेत. नाथ महाराजांच्या प्रवचनातून टिपलेल्या काही अमरकथा येथे दिल्या आहेत. वाचकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 131

नाथपंथाचे कार्य भगवान दत्तात्रेयांच्या तंत्राप्रमाणे आणि देखरेखीखाली चालू असते. देव स्वतः  कोणातरी पृथ्वीवरच्या माणसाकडे आपल्या भक्ताला पाठवतो ही कल्पनाच मुळी मानवी मनाला, बुद्धीला मानवत नाही. जे काम देव  स्वतः करू  शकतो त्यासाठी त्याने आपल्या भक्ताला पृथ्वीवर कार्य करणाऱ्या गुरूकडे का पाठवावे ?

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 130

‘महाराजजी मंदिरके सामने एक साधू बैठता है, लेकीन वो लोगोंको बहूत तकलीफ देनेके हेतूसे, करणीबाधा करनेके हेतूसे,तथा लोगोको हैरान करने के लियेही बैठता है| हमने उसे बहुतबार यहॉंसे निकालनेकी कोशीश की, लेकीन वह वाम विद्याओंसे भय दिखाता हैं | उसको रोकना या उसे लोगोसे दूर करना बहूतहि कठीन जाता है | आप कृपा करके लोगोके हितमे उसका कुछ बंदोबस्त किजीएँ |’

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 129

यमाला ताकीद देऊन, शंकराच्या दूतांशी आणि शंकराशी युद्ध करून विष्णू कडून मेलेले सात जीव परत आणले. विष्णूच्या सांगण्याप्रमाणे त्या सात जीवांना पूर्वीचेच देहरूप देऊन जिवंत केले. रेवणनाथांनी पंचमहाभूतांची आणि ब्रह्मांडाची सर्व तत्त्वे बाजूला सारून त्यांनी मुलांना पूर्वीच्याच देहाने व पूर्वीच्या प्रारब्धाने जिवंत केले.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 128

रेवणनाथ म्हणाले ‘‘मी येथे असतांना यमाने हा डाव कसा साधला आता यमाचा समाचार घेऊन त्यालाच नाहीसा करून टाकतो.’’‘‘यमधर्मा मी स्वतः सरस्वती ब्राम्हणाच्या घरी असता तू त्याच्या मुलाचा प्राण कसा घेऊन गेलास.त्यांचे पहिली सहा मुले कोठे ठेवली आहेस, सातही मुले आणून दे नाही तर युद्ध कर.’’

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 127

नाथपंथामध्ये नाथांच्या दर्शनाला जायला कोणत्याही प्रकारच्या मर्यादा अथवा बंधनं नसतात. नाथांचे द्वार हे भक्तांसाठी सदैव उघडे राहायला पाहिजे. नाथांनी आपल्या इच्छेनुरूप पाहिजे तसे नियम ठेवणे योग्य नाही हे मच्छिंद्रनाथांनी दाखवून दिले,

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 126

आपले योग,भोग,प्रारब्ध हे कर्माच्या माध्यमातून सहज बदलता येतात. प्रवाह पतीतासारखे जीवन घालवणे हे कर्महीन माणसाच्या बाबतीत शक्य आहे. मी माझे दैनंदीन जीवन कर्माच्या माध्यमातून उन्नत करू शकतो ह्याची जाणीव झाल्यावर किंवा गुरूंचे मार्गदर्शन मिळाल्यावर जीवनातील योग,भोग,प्रारब्ध हे सर्व बदलू लागतात.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 125

देवाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर मूर्ती, जिची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि प्रदीर्घ काळ लोटलेला आहे त्या मूर्तीच्या घडणेत फरक होण्यासाठी पंचमहाभूतांना क्षणार्धात आपलं कार्य करून हा बदल करावा लागेल हेच या नाथपंथाच गमक आहे.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 124

नाथपंथामध्ये प्रत्येक नाथांनी अन्नदानाच महत्व सांगितलं आहे आणि तीर्थाटनाचही विशेष महत्त्व सांगितले आहे. गुरुचरित्रात भगवान दत्तात्रेयांनी समाराधना नावाखाली अन्नदानाचे महत्त्व सांगितलं आहे तसेच तीर्थांचे महत्त्व देखील सांगितले आहे.ज्या अनुभूती गुरुचरित्राच्या काळात घेतल्या त्या अनुभूती आज देखील येतात.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 123

जालिंदरनाथांनी चांपावतीला प्रेत संस्कार झाल्यानंतर तिच्या चितेच्या राखेतून जीवंत केले, आणि ती पूर्ववत पूर्वीच्याच देहाने जीवन जगू लागली. हे तर आज देखील कुणाला शक्य नाही. हे जालिनदरनाथांचे सामर्थ्य लक्षांत घ्या. हीच ती नाथपंथाची पंचमहाभूतांवरची अबाधित सत्ता. ह्याच आबाधित सत्तेने नाथपंथ कार्य करीत आहे.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 122

गोपीचंदाने नाथांना लिदीत पुरले त्यावेळी नाथांनी कोणताही विरोध केला नाही परंतू त्यांना बाहेर काढतांना गोपीचंदाचे प्राण पणाला लागले होते. खड्ड्यातून बाहेर काढणे जमले नाही म्हणून जालिंदरनाथ स्वतःहून वर आले.कानिफ नाथांमुळे राजाचे प्राण वाचले एवढेच नाही तर जालिंदरनाथांनी राजा गोपीचंदाला अमर केले.