वयाच्या 85 व्या वर्षी मंगलानाथ महाराजांचे काल संध्याकाळी निधन झाले
नाथ परंपरेच्या कुटुंबामध्ये 1936 साली त्यांचा जन्म झाला व्यंकटनाथ महाराजांचे ते ज्येष्ठ पुत्र होते
माधवनाथ महाराज नागपूर मुक्कामी असताना देवगावला अशी घटना घडली की महाराजांच्या घरापुढे एक साधू बैरागी उभा राहिला व त्याने ॐ भवती भिक्षांदेही असे म्हटले आवाज ऐकून आमच्या मातोश्री गुरु माता त्यांना भीक्षा घालण्यासाठी घराबाहेर आल्या त्या साधूला भिक्षा घालणार एवढ्यात ते साधू म्हणाले बाळ तुझ्या पोटी पुत्ररत्न जन्माला येणार आहे तो आमचा अंश असेल एवढे बोलून तो साधु अंतर्धान पावला आपले सासरे साधू चे रूप घेऊन आले होते हे त्यांच्या नंतर लक्षात आले
त्यानंतर बाबांचा सुधाकर रत्नपारखी यांचा जन्म झाला तो नाथांच्या कुळातच
बाबांचं महाविद्यालयीन शिक्षण नागपूरला झालं नागपूरला व्यंकटनाथ महाराजांच वास्तव्य असायचं देवगांवनंतरच कार्यक्षेत्र हे नागपुरच होतं
बाबांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात अनेक तऱ्हेचे चमत्कार अनुभव अनेक लोकांनी अनुभवले आहेत
नागपूरहूनच ते पदवी घेऊन बाहेर पडले
बाबांचा आणि माझा संबंध हा माझे गुरु व्यंकटनाथ महाराज यांच्यामुळेच आला
एक वेळ होती की ज्या वेळेस माझ्या मनामध्ये आयुर्मर्यादा लक्षात घेऊन बाबांचा अनुग्रह घ्यावा आणि व्यंकटनाथ महाराजांच्या सानिध्यात राहावं असं होतं
एक दिवस व्यंकटनाथ महाराजांनी माझ्याकडे पाहिलं आणि बोलता बोलता म्हणाले परंपरेच्या कार्यात वयाचा संबंध नसतो ही आमची गादी आहे ही कार्यकरते हीच कार्य करत राहील हे ऐकून माझ्या मनात असलेल्या प्रश्नाला उत्तर मिळालं आणि व्यंकटनाथांचा अनुग्रह घ्यायचा निश्चित केलं
व्यंकटनाथ महाराजांचा अनुग्रह घेतल्यानंतर बाबांशी बराच जवळचा संबंध आला जसजसा काळ पुढे जाऊ लागला तसतसे आमचे संबंध अत्यंत घनिष्ट झाले माझ्या घरी ते येऊन राहत असे तसंच मीही त्यांच्या कडे जावून राहत असे
बाबांनी त्यांच्या लहानपणीची एक गोष्ट मला सांगितले एकदा देवगावहून नागपूरला जाण्यासाठी ते व्यंकटनाथ महाराजां बरोबर निघाले त्या वेळेला त्यांचं वय आठ-दहा वर्षाचा असेल लातूरहून ट्रेनमध्ये बसून पुढचा प्रवास करायचा होता परंतु बापलेक रेल्वेच्या पुलावरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जात असताना गाडी सुरु झाली आणि हे प्लॅटफॉर्मवर आले त्यावेळेस गाडी बरीच पुढे गेली होती व्यंकटनाथ महाराजांनी एका हातात होल्डाल व दुसऱ्या हातात बाबांना घेऊन चालले होते ज्या वेळेला असं लक्षात आलं की गाडी मिळू शकत नाही त्यावेळेला व्यंकटनाथ महाराजांनी बाबांना आणि होल्डाल दोघांनाही गोल फिरून ट्रेनच्या दिशेकडे फेकले आणि आश्चर्याची गोष्ट की फर्स्ट क्लासच्या कंपार्टमेंट मध्ये दारात उभे राहून ज्यांनी फेकले त्यांनीच ते झेलले केवढी आश्चर्यकारक घटना आहे
बाबांच कार्य बरंच वाढल्यानंतर एकदा त्यांनी विचार व्यक्त केला की व्यंकटनाथ महाराजांना घेऊन सर्वजण मिळून चित्र कुटला जाऊ चित्रकूट ला बाबांच्या अध्यात्मिक कार्यांचा श्री गणेशा झाला होता परंतु व्यंकटनाथ महाराज व इतर सर्वांन बरोबर यांचे चित्रकूटला या निमित्ताने जाण्याचा योग घडला नाही
बाबांचे अध्यात्मिक कार्य स्वतंत्रपणे सुरू होते
एकदा देवगावहून कार्यक्रमानंतर बाबांच्या घरी औरंगाबादला गेलो असता बाबांची आणि रामबाबा, एका वयोवृद्ध तपासव्याचे भेट घालून देण्याचा योग मला आला
जीवनातल्या निरनिराळ्या प्रसंगाने बाबांच्या आणि माझ्या कार्याला वेगवेगळ्या दिशा मिळाल्या आणि आम्ही आपाआपल्या दिशेने कार्याला लागलो
बाबांनी आयुष्यभर नाथ संप्रदायाचे कार्य केलं
अहोरात्र कार्य करून त्यांनी नाथपंथ प्रचार-प्रसार केला
आज समाजाला कलियुगाच्या प्रभावातून परावृत्त करण्यासाठी नाथपंथ कार्याची नितांत आवश्यकता आहे
ज्या भाग्यवानांना बाबांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला त्यांनी व्यक्तिनिष्ठ न रहाता नाथपंथ परंपरेच्या महात्म्या कडे लक्ष देऊन पंथाच्या आश्रयात राहावं आणि गुरूंनी सांगितलेल्या साधनेत उपासनेत एकदिलाने राहावे हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली राहील
नरेंद्रनाथ महाराज नाथ शक्ति पीठ अकोला