अन्नदानाच महत्व
नाथपंथामध्ये प्रत्येक नाथांनी अन्नदानाच महत्व सांगितलं आहे आणि तीर्थाटनाचही विशेष महत्त्व सांगितले आहे.
गुरुचरित्रात भगवान दत्तात्रेयांनी समाराधना नावाखाली अन्नदानाचे महत्त्व सांगितलं
आहे तसेच तीर्थांचे महत्त्व देखील सांगितले आहे. तीर्थस्थानी जाऊन यात्रा करावी अस
आग्रहाचं प्रतिपादन गुरुचरित्रातून केल आहे. आज देखील नाथ पंथांमध्ये अन्नदान
आणि तीर्थयात्रा विशेषेकरून सांगितल्या जातात आणि स्वतः नाथ महाराज अन्नदान आणि
तीर्थयात्रा करीत असतात.
अन्नदाना मध्ये सर्वच प्रकारच्या लोकांना अन्नाच्या माध्यमातून प्रसादाचा लाभ घ्यावा तसेच
तीर्थाटनातून त्यांच्या चित्तवृत्ती प्रवृत्ती मध्ये फरक पाडण्याचा प्रयत्न असतो.
म्हणून असे सांगितले आहे कि गुरूंबरोबर तीर्थयात्रा करावी गुरूंच्या प्रसादाने कृपेने ,झेपेल तेवढे अन्नदान करीत राहावे असा संदेश त्यांच्या प्रकाशनातून आम्हाला स्पष्ट होतो गोमुखला आम्ही गेले होतो