अमरकथा

भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक इतिहासात अमरकथांचे संदर्भ अतिशय महत्वाचे आहेत. नाथ महाराजांच्या प्रवचनातून टिपलेल्या काही अमरकथा येथे दिल्या आहेत. वाचकांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 152

आपण आपल्या जीवनाकडे  शोध-बोध बुद्धीने पाहणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजन्मीच्या कृतीचा, प्राक्तनाचा, विधिलिखिताचा, संचिताचा विचार करून त्याची सांगड सद्यजीवनाशी कशी घालायची, याचा शोधपूर्ण अभ्यास नाथ शक्तिपीठ, अकोला येथून गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 151

ब्रम्हांडामध्ये फक्त जीव सृष्टी आहे आणि जीव सृष्टीवरच नाथांच प्रभुत्व आहे ही कल्पना करणे चुकीचे आहे. नद्या पर्वत वनस्पती  चल अचल अशा अनेक गोष्टींचा समावेश ब्रम्हांडात आहे.त्या सर्वांवर नाथांच प्रभुत्व आहे. निसर्ग, ज्यामध्ये नद्या पर्वत,अचल गोष्टी येतात त्यावर देखील नाथांचे प्रभुत्व आहे हे नाथांनी आपल्या कृतींनी  दाखवले आहे. यत पिंडे तद ब्रम्हांडे हे त्यांनी दाखवून दिले आहे.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 150

व्यंकटनाथ महाराजांनी केवळ नरेंद्रच्या इच्छेसाठी  त्याच्या आजोबाला सर्वांसमोर जिवंत उभे दाखवले. जालिंदर नाथांनी देखील आपला शिष्य राजा गोपीचंद यांच्या इच्छे खातर,त्याच्या बहिणीला अग्निसंस्कार  झाल्यावर,पुन्हा त्याच देहानिशी जिवंत केले आणि  ती तिचा  उर्वरित संसार करू लागली 

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 149

ब्रम्हांडाच्या नियमाप्रमाणे एकदा जीव गेल्यावर तो  पुन्हा त्याच देहाने आणि त्याच कुटुंबात लगेचच  जन्माला येत नाही.तो आपल्या कर्म बंधनानुसार कोणत्यातरी योनीमध्ये जन्म घेऊन आपल्या जीवाचा जीवनप्रवास करीत असतो. मेल्यावर त्याच देहाने पुन्हा जीवंत करण्याचे सामर्थ्य नाथपंथात दिसून येते.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 148

रेवणनाथांनी आपल्या शिष्यांच्या मेलेल्या मुलांना जिवंत केले ज्यावेळेला शंकराशी युद्ध केल्यानंतर विष्णूशी युद्ध करायला गेला तेव्हा विष्णूने सांगितले की तुला ते जीव देतो परंतु त्यांना देहरुप देऊन त्याच प्रारब्ध बनवणं हे काम तुला करावे लागेल. यावरून हे लक्षात येतं की मरण पावल्यावर देखील आत्मा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हजर असतो परंतू त्यात बदल हे केवळ सद्गुरुच करूशकतात.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 147

जर गुरूंचे मार्गदर्शन लाभले असेल तर गुरु सांगतील त्याप्रमाणे साधना उपासना करावी व जीवनांत पुढील तत्वांचा अंमल करावा. जर गुरु लाभले नसतील तर आपल्या आवडीच्या देवतेचे नामस्मरण करावे व पुढील पथ्य पाळावेत, सद्गुरूंची भेट होईल व जीवन आपोआप सन्मार्गी लागेल

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 146

मानवाने जीवनात कोणत्या विचार बुद्धीने वागावे याबाबती ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर मार्गदर्शन केले आहे. आळंदीचे संत ज्ञानेश्वर  कोणाला माहित नाहीत? ज्ञानेश्वरांच जीवन  पाहिलं तर ते अत्यंत खडतर असं होतं. कर्मांनी विचारांनी आणि ज्ञानांनी ते खरोखरच ज्ञानेश्वर होते.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 145

शिष्याला घडवण्यासाठी गुरु सतत प्रयत्न करीत असतात. शिष्याला त्याची जाणीव नंतर होते. समाजात कार्य करण्यासाठी शिष्याला कसे तयार करावे हे सद्गुरूंपेक्षा इतर कोण जाणणार ?

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 144

शुद्ध प्रांजळ अंतःकरणाने विचार केला तर ज्या शुद्धतेने ईश्वर आराधना किंवा गुरुची सेवा व्हायला हवी त्या प्रांजळ  मनाने ही आराधना होत नाही झालेल्या चुकीची क्षमा याचना ही  गुरूंजवळ करणे आवश्यक आहे.

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 143

श्रीपाद श्रीवल्लवांचा अवतार अथवा त्यांचा जन्म आपल्याला हे ज्ञान देतो की ईश्वराची कृपा झाल्यावर ईश्वर आपल पूर्व, संचित व प्रारब्ध बाजूला सारून सुखावह जीवन देऊ शकतो आणि पूर्ण कृपेचा जीव जन्माला घालू शकतो . जे दुःखामध्ये कष्टामध्ये जीवन जगत आहेत त्यांचे, कष्टप्रद जीवन केवळ गुरूंच्या संकल्पनेने दूर होऊन त्यांचे जीवन सुख समृद्धीने भरून येते
en_USEnglish