आपण आपल्या जीवनाकडे शोध-बोध बुद्धीने पाहणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजन्मीच्या कृतीचा, प्राक्तनाचा, विधिलिखिताचा, संचिताचा विचार करून त्याची सांगड सद्यजीवनाशी कशी घालायची, याचा शोधपूर्ण अभ्यास नाथ शक्तिपीठ, अकोला येथून गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे.
गुरूंचे कोणत्याही करणांनी मूल्यांकन करणे हे शिष्याला अथवा भक्तांना शोभत नाही शिष्यांनी व भक्तांनी निसंदेह पणे आपल्या गुरुंची सेवा करावी व गुरूंनी सांगितलेल्या उपासनेत मग्न असावे गुरूंचे मूल्यांकन करण्याची योग्यता शिष्यामधे वा भक्तांमध्ये नसते आणि असे करण्याने ते आपले मन कमकुवत करीत असतात.
अयोनी संबंधातून प्रगट झालेल्या सर्वनाथांनी आपल्या सर्व शक्ती, सामर्थ्य देवतांनी दिलेले वचन आणि वाम शक्तींनी दिलेले वचन आणि स्वतः निर्माण केलेले काव्य मंत्र हे गहिनीनाथांकडे सोपवून गोरक्षनाथांच्या योजनेप्रमाणे गहिनीनाथांनी ते सर्व, निवृत्तीनाथांकडे सोपविले.
नाथपंथाचे कार्य भगवान दत्तात्रेयांच्या तंत्राप्रमाणे आणि देखरेखीखाली चालू असते. देव स्वतः कोणातरी पृथ्वीवरच्या माणसाकडे आपल्या भक्ताला पाठवतो ही कल्पनाच मुळी मानवी मनाला, बुद्धीला मानवत नाही. जे काम देव स्वतः करू शकतो त्यासाठी त्याने आपल्या भक्ताला पृथ्वीवर कार्य करणाऱ्या गुरूकडे का पाठवावे ?
1-4-2022 गुरू सेवा करा गुरूकृपा लाभेल &…