Shaktipatacharya P.P. Visit of Shri Moreshwar Maharaj Mayureshwar Peeth 

​नाथशक्तिपीठाचे वतीने विविध संप्रदायांच्या संत सद्गुरूंना एकाच व्यासपीठावर  आणून त्यांचे एकत्रीकरण व  त्यांना प्रबोधनाची संधी देणार्‍या अशा उपक्रमांची  आज आवश्यकता आहे. यामुळे धर्म कार्याला अधिक गतीमान करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सद्गुरूंची तळमळ ही नेहमी  साधकांची  सर्वाथाने शुध्दी व्हावी या साठीच असते. समर्पण भावनेने सद्गुरूंजवळ जे सेवा करतात त्यांना अधिक लाभ मिळतो. शक्तिपात संप्रदाय आणि नाथ संप्रदायाचे स्वरूप एकच आहे. नाथ संप्रदायाचे ज्ञाननाथांनी ज्ञानेश्वरीत या दोहोंचे साम्य व्यक्त केले आहे. प. पू. नरेंद्रनाथ महाराजांसारख्या  महापुरूषांच्या सेवा सान्निध्याने साधना बळकट होते.व धर्म कार्य करण्याची प्रेरणा व उर्जा मिळते. तसा आशीर्वाद त्यांनी मला द्यावा असे विनम्र मागणे शक्तिपाताचार्य प.पू. श्री मोरेश्वर बुवा चर्‍होलीकर महाराज मयुरेश्वर पीठ पुणे यांनी येथे मागगितले. ते नाथशक्तिपीठाच्या वतीने आयोजित संत पूजन सोहळ्यात बोलत होते..या प्रसंगी शक्तिपात संप्रदायाचे आद्यगुरू परमहंस परिव्राजकाचार्य  श्री लोकनाथतीर्थ स्वामी महाराज यांच्या चरण पादुकांचे प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते झाले. नाथशक्तिपीठाच्या वतीने उत्सव समितीचे अध्यक्ष श्री भाउसाहेब मारोडकर व ॐशिक्षण मंडळाचे विश्वस्त श्री अनिरूध्द चौधरी, विदुला चौधरी यांनी प.पू. श्री मोरेश्वरबुवा चर्‍होलीकर महाराजांचे श्रध्दा पूजन केले व त्यांना श्री नरेंद्रनाथ महाराजांची साहित्य संपदा भेट दिली. तसेच मयुरेश्वर पीठाचे वतीने श्री चर्‍होलीकर महाराजांनी प.पू. श्री नरेंद्रनाथ महाराजांचे सहस्रचंद्रदर्शनाचे व कार्याच्या द्वि तपःपूर्ती निमित्ताने श्रध्दा पूजन केले. ह.भ.प.  श्री रामनाथ अय्यर यांनी देखील श्री महाराजांना महावस्त्र अर्पण केले.

व्यासपीठावर ज्ञानमहर्षि पं. वसंतराव गाडगीळ , राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. प्रा.अपामार्जने, विराजमान होते.

अध्यात्म हा स्पर्धेचा विषय नसून जीवाला उन्नत करणार्‍या व चित्त, वृत्ती,व प्रवृत्तीला शुध्द करण्याचा संस्कार आहे.या श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या भूमिकेतून संत पूजनाचा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रारंभी मान्यवरांनी दीप प्रज्वलन केले.व श्री व्यंकटनाथांच्या व लोकनाथतीर्थ स्वामी महाराजांच्या चरण पादुकांचे पूजन केले. प्रास्ताविक व परिचय ह.भ.प. गजानन कुळकर्णी यांनी केले.वेदमूर्ती डाॅ श्रीकांतशास्त्री गदाधर यांनी वेदोक्त मंत्र जागर केला.

en_USEnglish