पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 152

आपण आपल्या जीवनाकडे  शोध-बोध बुद्धीने पाहणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजन्मीच्या कृतीचा, प्राक्तनाचा, विधिलिखिताचा, संचिताचा विचार करून त्याची सांगड सद्यजीवनाशी कशी घालायची, याचा शोधपूर्ण अभ्यास नाथ शक्तिपीठ, अकोला येथून गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे.

10-08-22    जीवनाकडे शोध-बोध बुद्धीने पहा  

आपण आपल्या जीवनाकडे  शोध-बोध बुद्धीने पाहणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजन्मीच्या कृतीचा, प्राक्तनाचा, विधिलिखिताचा, संचिताचा विचार करून त्याची सांगड सद्यजीवनाशी कशी घालायची, याचा शोधपूर्ण अभ्यास नाथ शक्तिपीठ, अकोला येथून गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे. अखंड गुरुपरंपरा लाभलेले योगाभ्यानंद व्यंकटनाथमहाराजांचे अनुग्रहित शिष्य, नरेंद्रनाथ महाराज यांनी गुरुकृपेच्या आधारावर व पंथपरंपरेच्या सिद्धतेवर गुरूकार्याची सुरवात 1993 साली नाथशक्तिपीठाच्या माध्यमातून सुरू झाली.

आध्यात्माचे अनुभूती केंद्र

नाथ शक्तिपीठातून अनुग्रहित झालेले शिष्य, येथे येणारे भक्त व शक्तिपीठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे उपासना करणारा प्रत्येक साधक हा आपल्या साधनेच्या अनुषंगाने सततच अनुभूती घेत असतो. मार्गदर्शनाखाली योग्य उपासना केल्यावर कोणताही जीव हा निश्चितपणे आध्यात्मिक अनुभूती घेणारच. ही सर्व सामान्य अनुभूती आहे. आपल्या जीवनातील खडतर योगांवर कर्माच्या माध्यमातून अनुभूती घेणारे कितीतरी साधक आहेत.

दोष घालविण्याचे प्रयत्न

व्यक्तींच्या जन्मपत्रिकेचा अभ्यास करून त्याच्या जीवनातील त्रासांचा व भोगांचा विचार करून, तसेच त्याच्या कौटुंबिक परिस्थितीचा विचार करून त्याला सद्यजीवनात होणार्‍या क्लेशापासून, त्रासापासून, स्वभावदोषापासून मुक्त करण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे़  नाथ शक्तिपीठातून जीवनातील सर्व प्रकारचे दोष घालविण्याचा प्रयत्न होत आहे. अनेकांनी याचा अनुभव घेतला आहे. असे दोष जर दूर झाले तर आपली कार्यक्षमता, लोकप्रियता वाढून आपला चांगला मित्रपरिवार किंवा व्यावसायिक परिवार वाढू शकतो. जीवन सुखावह होऊ शकते.

विश्वामध्ये एक देखील व्यक्ती अशी नाही, की जिला कोणताच त्रास नाही किंवा ती नास्तिक आहे, वा ती पूर्ण समाधानी आहे. नाथ शक्तिपीठात, व्यक्तीला नुसतेच त्याच्या सुखदु:खा बद्दल मार्गदर्शन केले जात नाही, तर आध्यात्मिक जीवन कसे आणि का आवश्यक आहे, जीवनामध्ये सद्गुरूंचे महत्त्व का आहे, नामस्मरण कोणते आणि का करणे  गरजेचे आहे, दानधर्म आदी प्रत्यक्ष जीवनामध्ये कसे महत्त्वाचे आहे, कोणते कर्म केले असता आपल्या योगामध्ये बदल होऊ शकेल, आदी गोष्टींचे मार्गदर्शन या नाथ शक्तिपीठामधून केले जाते. जन्मपत्रिकेवरून आपल्या जीवनयोगाचा, कर्माचा, जीवनात पुढे घडणार्‍या घटनांचा मागोवा कसा घ्यावा, हे देखील येथून सांगितले जाते.

‘लिहिले न भाळी त्याने वात्सल्य प्रेम विधीने’ याची जाणीव ज्या वेळी जन्मपत्रिका आपण पाहतो  त्या वेळी विशेष होते. जे काही विधिलिखित आहे ते आपली जन्मपत्रिका समजून घेताना होते. जीवनातील घटनांवरून आणि जन्मपत्रिकेवरून जीवनातील कुयोग कसे कळतात, हे आपणनाथ शक्तिपीठांत समजून घेऊ शकाल, तसेच काय केले म्हणजे जीवनातील हे दोष जाऊ शकतील, हे देखील येथे समजू शकेल. एवढे मोठे कार्य हे केवळ योगाभ्यानंद व्यंकटनाथ महाराजांच्या व परंपरेच्या कृपेमुळे घडत आहे.

वैदिक उपचार केंद्र

नाथ शक्तिपीठाच्या कार्याचा एक भाग म्हणून नाथ शक्ति पीठात नरेंद्रनाथ महाराजांनी अनेक विधानांची निर्मिति केली आहे .

ठराविक विधानांचे आचरण त्यांच्या नियमांनुसार केल्यास अविश्वसनीय गोष्टी घड़तांना येथे नेहमीच पहायला मिळतात व त्यांची तेथे सांख्यिकी पद्धतीने नोंद ही ठेवण्यात येते. या विधानांचा उपयोग धर्म, जात-पात यासारख्या कोणत्याहि मानवनिर्मित बंधनांचा विचार न करता करण्यात येतो.

या विधानांच्या आचरणा मुळे आज रोजी कित्येक जणांना आपले मन: स्वास्थ परत लाभले आहे. नैराश्येमुळे जीवाचा अंत करु पाहणारे अनेक लोक आज स्वत: च्या पायावर समर्थपणे उभे राहून इतरांनाही मार्गदर्शन करत असताना दिसतात.

जीवनात येणार्‍या अडचणी, होणारे आघात, अपयश, दुर्धर रोग, यातना यांच्यावर मात कशी करावयाची या संबंधिचे मार्गदर्शन येथे मिळते.

नाथशक्तिपीठा द्वारे पुरस्कृत विधानांचे आचरण करणार्‍यांमधे साधारणत: आत्मविश्वास वाढणे, नैराश्य जाणे, क्रूरता जाणे, कर्तव्यतत्पर व जवाबदार होणे, इत्यादि फरक झाल्याचे लगेचच जाणउ लागते.

सृष्टीचा नियम आहे की आपण जसे कर्म करतो तसेच फळ मिळते. नाथ शक्तिपीठातुन होणार्‍या कार्याला या सत्याचेही पाठबळ लाभले आहे व म्हणूनच येथून होणार्‍या प्रयोगांमधे यशोप्राप्ति गुणोत्तर हे नव्वद टक्के पेक्षा अधिक दिसून येते.

तीन प्रकारच्या पूजांचे विधींची योजना नाथशक्तिपीठाने केली आहे. या पूजांनी सतेज कर्माचा अनुभव आपण घेऊ शकतो. या तिन्ही पूजांमध्ये प्रभावी व परिणामकारक मंत्रांची योजना केली आहे.

1) श्रीविष्णूची पूजा 2) ग्रहग्रहण पूजा व 3) वैदिक उपचार

ह्या पूजांची माहिती पुढे देत आहे.

1. श्रीविष्णूची पूजा ही केवळ ज्याच्यावर उपचार करायचे आहेत त्याच्यासाठीच असते. ह्याचा प्रत्यक्ष परिणाम हा पूजा करणार्‍यावरच होतो. कोणत्याही प्रकारच्या नातलगाला ह्याचा प्रत्यक्ष फायदा होत नाही.

ही पूजा फक्त अमावस्येलाच होते. प्रत्येक अमावस्येला ही पूजा होत नाही, तर ज्या अमावस्येचे फळ हे प्रकृतिमानाला चांगले असते, अशाच अमावस्या निवडून त्या अमावस्येला ही पूजा करतात.

अनेक औषधोपचार करून प्रकृतीत सुधारणा होत नाही किंवा अतिधीम्या गतीने होते. विवाहामध्ये विविध प्रकारचे अडथळे येत असतील, विवाहयोग लवकर जुळून येत नसतील, घरामध्ये कलह असतील, काही व्यक्तिगत बाबी- ज्या खुले आम बोलता येत नसतील, अशा गोष्टींसाठी ही पूजा करण्यात येते. ह्याशिवाय इतरही बाबींसाठी ही पूजा करण्यात येते, परंतु व्यक्तिगत दोष व जन्मपत्रिका ह्याचा विचार करून ती ठरविली जाते.

पूजेचा उद्देश जन्माबरोबर आलेल्या प्राकृतिक दोषांचे निराकरण करण्याकरिता, वंश-परंपरागत आलेल्या रोगांसाठी, असामान्य रोगांसाठी, प्रकृती अस्वास्थ्यासाठी, गतजन्मीच्या कुयोगामुळे, सद्यजीवनामध्ये शरीरस्वास्थ्याला होणारा त्रास दूर करण्यासाठी या पूजेचे प्रयोजन केलेले आहे.

जे आनुवंशिक रोग आहेत. दीर्घ काळ टिकणारे रोग आहेत, काहीही कारण नसताना आपल्यामागे लागलेले रोग आहेत त्यासाठी या पूजांचे आयोजन आम्ही केलेले आहे. जन्मतःच शरीरामध्ये निर्माण झालेल्या व्याधी, तसेच कर्माच्या अभावी निर्माण झालेले व्यंग वा दोष, जीवनातील उत्साह, तसेच नकारात्मक विचार काढण्यासाठी या पूजेची योजना केली जाते.

भूक न लागणे, जेवण न जाणे, वातदोष, कफदोष, पित्तदोष हा जिथे कमी होत नाही तिथे या पूजेची योजना केली जाते. गतजन्मीच्या कुयोगामुळे विवाहसंबंध लवकर न होणे, तसेच विवाह झाल्यावर अकारणच अपत्य न होणे यावर, तसेच सुदृढ आणि चांगल्या शरीरयष्टीचे बालक जन्माला यावे यासाठीदेखील याचा प्रयोग केला जातो.

विवाहानंतर सांसारिक सुखाचा अभाव असेल तरीही या पूजेचा उपयोग केला जातो.

बुद्धिमत्तेचा विकास कमी असणे, मनामध्ये निरुत्साह असणे, शिक्षणामध्ये विविध प्रकारच्या अडचणी येणे, ऐन परीक्षेच्या वेळेला आजारी पडणे, झोप जास्त येणे आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसणे, तसेच अयोग्य पद्धतीने निर्माण होणार्‍या शारीरिक पीडा, तसेच अन्य प्रश्न याच पूजेच्या माध्यमातून हाताळले जातात.

चिडचिडा स्वभाव, स्वभावाची अस्थिरता, मनाची अशांतता घालविण्यासाठी या प्रकारच्या पूजेचा अवलंब नाथ शक्तिपीठात होतो. करणी, बाधा आदी प्रकारांनी त्रस्त असलेल्या जीवासाठी नाथ शक्तिपीठातून पूजा केल्या जातात. या पूजेचा परिणाम सर्वांगीण विकासासाठी केला जातो.

वर उल्लेखिलेल्या समस्यांचा उपद्रव कमी व्हावा म्हणून निरनिराळ्या मंत्रसमुच्चयांचा पूजेमध्ये एक पाठ केला आहे. गुरुकृपा व पंथाची सिद्धता केवळ ह्यांच्या साहाय्याने कार्यभाग चांगल्या तर्‍हेने साधला जातो.

विशेषतः अमावस्येला ज्या वेळेला चंद्र सूर्याने व्यापून टाकलेला असतो, म्हणजे अमावस्येला सूर्यास्तानंतर सर्वत्र अंधकार दिसतो, नंतर कलेकलेने प्रतिपदेपासून एकेक कोर करत चंद्र हा सूर्यकक्षेच्या बाहेर येऊन दिसू लागतो तो पंधरा दिवसांनी पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो. सूर्यस्थितीचा, नक्षत्र तारांगणांचा विशेष परिणाम जीवावर होताना दिसतो. काही गोष्टींना अमावस्येलाच विशेष महत्त्व असते तर काही गोष्टी अवश्य वर्ज्य असतात, ज्या अमावस्या शुद्ध व कर्मयोग्य असतात त्या अमावस्येला विष्णूच्या विशेष मंत्र समुच्चयाचा उपयोग करून मानवी जीवनाला, त्याला मुक्त करण्याचा प्रयत्न असतो.

कोणत्या प्रकारचा आपल्या जीवनावरचा अनिष्ट परिणाम घालवावयाचा असतो त्याप्रमाणे संकल्प केला जातो. हा संकल्प विविध तर्‍हेच्या ग्रहबाधेसंबंधी असू शकतो किंवा परिवारातील क्षेम, धैर्य, आयुष्य, तसेच ऐश्वर्यवर्धनासाठी, बालग्रह, पीडा, वृद्ध ग्रहपीडा, विविध प्रकारच्या ग्रहपीडांचे निरसन करण्याकरिता संकल्प करून या पूजाविधीचा उपयोग केला जातो. हा पूजाविधी व त्याअंतर्गत विष्णूची आराधना केली जाते.

या पूजेचा विधी हा साधारणतः तीन-चार तासांचा असतो. जारण,  मारण, वशीकरण आदी पीडांसाठीदेखील या पूजांचा विनियोग करता येतो. कुटुंबातील क्षेम, स्थैर्य, आयुरारोग्य याच्या अभिवृद्धीसाठी, तसेच घरातील शुद्धतेसाठी या मंत्राच्या पाठाचा उपयोग केला जातो.

नवीन घरामध्ये गृहप्रवेश करण्याच्या हेतूने वास्तूचे सर्वानुरूप चांगले परिणाम होण्याच्या दृष्टीनेदेखील या पूजांचा विनियोग करता येतो. या प्रकारच्या पूजेसाठी विष्णू, शिव, गणेश आदी देवतांच्या मंत्रांचा, तसेच उपासनेचा उपयोग केला जातो.  

अमावस्येला वाममार्गी लोक तंत्र-मंत्र साध्य करतात किंवा पूजेसाठी त्याचा विनियोग करतात. ज्याच्यामुळे जीवनात निरनिराळ्या प्रकारचा उपद्रव होतो, निरनिराळे  रोग शरीरात निर्माण होतात, निरनिराळ्या प्रकारच्या  निर्मितीमुळे रोग उद्भवतात, तसेच निरनिराळ्या ग्रहांच्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या बाधा अनुभवास येतात. निरनिराळ्या प्रकारचे संसर्गजन्य रोग वा भयानक रोग, मनस्ताप देणार्‍या सर्व प्रकारच्या गोष्टी वा मन अस्थिर करणार्‍या गोष्टी वा मनःशांती ढळवणार्‍या गोष्टी जीवनातून दूर करण्याकरिता काय करायला पाहिजे ह्या विषयाचे संशोधन पुलस्त्य ऋषींनी केले. ते काय केले व कसे केले म्हणजे माणूस ह्या त्रासांपासून मुक्त होऊ शकेल, हे जाणून घेण्यासाठी दाल्भ्य ऋषींनी पुलस्त्य ऋषींना सर्व माहिती देण्यास सांगितले.

2. ग्रहग्रहण पूजा :- मुहूर्त पाहून ही पूजा सोमवार किंवा गुरुवारीच होते. ह्या पूजेचा फायदा पूजा करणार्‍यालाच होतो. संकल्प हा ज्याचा त्यानेच करावा लागतो.

तिथी, वार, नक्षत्र यांचा परस्परयोग, तसाच अग्नीचा या सर्वांशी योग कसा आहे, हे पाहूनच विशिष्ट नक्षत्राला ही पूजा करण्यात येते. पूजाविधीला सात-आठ तास लागतात. साधारणतः सकाळी सातच्या सुमारास सुरू केलेली पूजा दुपारी 2 ते 2.30 पर्यंत संपते. ही पूजा कोणालाही करता येते. वस्तुतः कर्माच्या दृष्टीने कुटुंब किंवा पतिपत्नी हे एक नाहीत, भिन्न आहेत. कुटुंबातील सर्वांसाठी ही एकच पूजा आहे असे होत नाही. तसे सुखदुःख, भोग हे ज्याचे त्याला आहेत. फार काय, पतिपत्नी एक असले, कुटुंबप्रमुख तेच असले तरी प्रत्येकाचे शरीर, आत्मा भिन्न, वेगवेगळे आहेत.

या पूजेचा उद्देश जीवनातील विविध अडसर त्रासदायक वाटतात, ते दूर करणे हा आहे. याचा त्याकरिता ज्या कर्मदोषांनी जीवनामध्ये अतिशय किंवा क्लेशदायक घटना घडतात ते कर्मदोष हे व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. ते दूर करण्याकरिता या पूजा व्यक्तिगत होणे गरजेचे आहे. तथापि भारतीय पद्धती, तशीच संस्कृती लक्षात घेऊन पतिपत्नी मिळून एकत्र पूजा करण्याचा परिपाठ  आम्ही ठेवला आहे. आई, मुलगा, भाऊ, बहीण आदी सर्वांसाठी वेगवेगळी पूजा करावी लागते.

जीवनातील अप्रिय योग हे कोणत्याही जाती-जमातीच्या व्यक्तीचे असू शकतात. त्यावर जीवनातील अगर पत्रिकेतील कर्मदोष दूर करण्याकरिता ही पूजा कोणीही व्यक्ती करू शकते. मुसलमान, ख्रिश्चन, जैन, गुजराती, सिंधी आदी कोणत्याही प्रकारच्या जातीतल्या व्यक्तीला ही पूजा करता येईल. ज्या जातीतल्या लोकांना ही पूजा करणे त्याच्या धर्मबंधनानुसार योग्य नसेल त्यांनीदेखील ही पूजा करणे त्यांच्याच स्वतःच्या हिताचे राहील. कर्मदोषांचा संबंध हा जातीशी, भोवतालच्या परिस्थितीशी, सामाजिक पद्धतीशी संबंधित नसून हा केवळ त्याच्या पिंडाच्या कर्माशी व स्थितीशी संबंधित आहे. मानवजात ही विशाल संकल्पना जर धरली तर त्या मानवजातीतील कोणत्याही मानवासाठी ही पूजा होऊ शकेल. ही पूजा केवळ व्यक्तिगत स्वरूपाची आहे. त्यामुळे व्यक्ती, व्यक्तीपरत्वे अनेक व्यक्तींची पूजा एकाच वेळी  कर्मदोषांच्या आवश्यकतेप्रमाणे केली जाते.

तिथी, वार, नक्षत्र, अग्नी ह्या काही गोष्टींमुळे जो दिवस निघेल त्याच मुहूर्तावर ही पूजा होईल. या पूजेच्या अंतर्गत एक छोटासा हवनविधी देखील असतो. हा हवनविधी सर्व मिळून एकत्र करायचा असतो. त्याचा पूजाविधी सुरू झाल्यावर संपेपर्यंत इतर काही करायला वाव नसतो. त्यामुळे इतर सांभाळण्यासारखी कोणतीच बंधने नसतात. हा पूजाविधी करण्यापूर्वी आणि केल्यानंतर कोणत्याच प्रकारचे बंधन राहत नाही. पूजा आणि पूजाविधी हा भाग पूर्णपणे संपलेला असतो. त्यामुळे विधी संपल्यावर त्याच्या परिणामाची प्रतीक्षा असते.

नाथ शक्ति पीठ

नव नाथ परंपरेतिल अखंड गुरुपरंपरेने कार्य करणारे 15 वे गुरु, प. पु. योगभ्यानंद श्री व्यंकटनाथ महाराजांच्या प्रेरणेने, प. पु. श्री नरेन्द्र नाथ महाराजांनी एखाद्या पांतस्थाने विसाव्यासाठी जरी या नाथ शक्तिपीठाचा आश्रय घेतला तरी त्याचा जीवना कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलुन त्याच्या पीडा, विवंचना, कष्ट दुर होण्याचा त्याला मार्ग सापडो अश्या उद्दात्त हेतुने नाथ शक्ति पीठाची अकोला येथे स्थापना झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

en_USEnglish