आध्यात्मिक सिद्धतेची प्रचिती

पुणे बेळगाव गोवा शृंगेरी या प्रसार दौर्‍यावर असताना  प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज यांनी    रामनाथी येथील (गोवा) सनातनच्या  आश्रमास भेट दिली.

या प्रसंगी सनातनचे श्री प्रकाश मराठे यांनी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज यांचे शाल श्रीफळ व भेटवस्तु देउन श्रध्दा पूजन केले. सनातनच्या साधक कु. प्रिया लोटलीकर, संशोधन प्रमुख यांनी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या उपस्थितीत झालेल्या यज्ञाचेवेळी  यज्ञकुंडातील पवित्र ज्वाळांमधून आपल्या उपस्थितीची साक्ष देणार्‍या देवतांची अनुभूती वे.शा.सं. श्रीकांत शास्त्री यांचे कडून समजवुन घेतली.

प.पू.नरेंद्रनाथ महाराजांना पाहता  क्षणीच” आपले दर्शन होणे हे आमचे भाग्यच म्हटले पाहिजे” असे  शब्द सनातनचे संस्थापक प्रमुख परमपूज्य डाॅ. जयंत आठवले यांच्या मुखातुन  बाहेर पडले.

सनातनचे परात्पर  गुरु डाॅ.जयंत आठवले यांच्या समवेत प.पू. नरेंद्रनाथ महाराजांची सदिच्छा भेट दिडतास पर्यंत चालली. या भेटीत  हींदु धर्म,  सनातन धर्म,  नाथपंथाचे योगदान, त्यांचे  कार्य,  विविध  भाषा,  इत्यादि  विषयांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी श्री श्रीकांत शास्त्री यांनी    प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज  यांच्या कार्याची माहिती डाॅ. जयंत आठवले ह्यांना दीली.  त्याप्रसंगी  देवतांच्या प्रतिमा अग्नी ज्वाळेतुन प्रगट झालेल्या असताना  ची छायाचित्रे पहात असताना ते आपले आश्चर्य लपवु शकले नाहीत व ते उद्गारले “विषेश  आहे.  आध्यात्मिक  सिद्धतेशिवाय हे  होणे  शक्यच नाही.”

नाथशक्तीपीठातुन सुरु असलेले कार्य व उपक्रम यांचा आधार वेद व नाथपंथाची कृपा सिध्दता आहेत. यांच्या माध्यमातुन भाग्याच पुनरुज्जीवन ही नाथपंथाच्या सिध्दतेची व महाराजांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची साक्ष आहे, आम्ही सनातन प्रभात या दैनिकाच्या माध्यमातून नाथशक्तीपीठाच्या प.पू. श्रीनरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या सर्व उपक्रम आणि प्रकल्पांना अग्रक्रमाने प्रसिध्दी देऊ असे प्रतिपादन सनातनचे परात्पर गुरु डाॅ.जयंत आठवले यांनी केले.

हिंदू राष्ट्राच्या निर्मितीच्या प्रयत्नांसाठी श्री नरेंद्रनाथ महाराजांनी मला उत्तम प्रकृती स्वास्थ द्यावे तसेच माझी कार्यक्षमता वाढवावी अशी विनंती करुन त्यांनी प.पू. नरेंद्रनाथ महाराजांकडून विभूतीचा प्रसाद  व त्यांनी सांगितलेला  उपचार  ग्रहण केला आणि महाराजांनी  दिलेला   वैदिक उपचार करुन घेऊ असे आश्वासन दिले.

नाथ पंथामध्ये विभूतीला अनन्य साधारण महत्व आहे. आजही विभूतीचे सामर्थ्य अलौकिक असल्याची प्रचिती सर्वांनाच आली.पू.श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या सामर्थ्याने सिध्द झालेल्या विभूतीमुळे प.पू.डाॅ जयंत आठवलेंना त्याच दिवशी आराम वाटायला लागला.

यावेळी प.पू.श्री नरेंद्रनाथ महाराज  यांनी लिहलेल्या नवनाथ बोधामृत, हा खेळ प्राक्तनाचा की पूर्व संचिताचा आणि वेद मंत्राच्या माध्यमातून भाग्याचे पुनरुज्जीवन ही ग्रंथ संपदा भेट देण्यात आली.

या  प्रसंगी सनातनच्या  आश्रमातील  कार्य  पद्धती पाहून  व तेथील  साधकांची कार्य  तन्मयता  पाहुन प.पू.नरेंद्रनाथ महाराजांनी  समाधान व्यक्त केले.

mrMarathi