7–4–22
नाथसंप्रदायाचे तत्त्वज्ञान
गुरुचरित्राच्या दुसरऱ्या अध्याया मध्ये युग निर्मितीच जे वर्णन केलं आहे त्यामध्ये ब्रह्मदेवा कलियुगा बद्दल चिंता व्यक्त केली आहे याचे मूळ कारण म्हणजे ज्याप्रमाणे सत्य त्रेता द्वापार युग घडलं त्याप्रमाणे कलियुग घडलं नाही
युग निर्मिती झाल्यापासून सत्य त्रेता द्वापार आणि कलियुग असे चार युग ९८ वेळा पूर्ण झाली आहेत सध्या चालू असलेले कलियुग हे युग निर्मिती पासून 99 वा वे आहे.
चारी युगे मिळून 43 लाख वीस हजार वर्षे होतात याला एक मन्वंतर म्हणतात असे हे 99 वा वे मनवंतर सुरू आहे
सृष्टी निर्मितीनंतर तीन युगे ओलांडल्यावर भगवान कृष्णाने निर्मितीतले दोष घालवण्याच्या उद्देशाने नाथपंथाची योजना केली आहे.
म्हणजे कलियुगाचे वाईट परिणाम (कलियुग 4 लाख 32 हजार वर्षाचे आहे ) घालवण्याच्या दृष्टीने किंवा सौम्य करण्याच्या दृष्टीने नवनाथांनी नाथ पंथ स्थापन करून हे कार्य केल आहे. ह्या पंथाचे स्वामी स्वतः भगवान दत्तात्रेय आहेत.
गुरु शिष्य प्रणाली प्रमाणे हा पंथ कार्य करीत आहे. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे भगवान दत्तात्रेय हे देवादिकांचे आणि ब्रह्मांडाचे अध्यात्मिक मार्गदर्शक आहेत ब्रम्हांडाच्या नियमा विरुद्ध कार्य करण्याचे सामर्थ्य आणि अधिकार हा केवळ भगवान दत्तात्रेयां मध्ये आहे व त्यांनी ते नाथ पंथाच्या मार्गातून पुढे सुरू ठेवला आहे.
थोडक्यात कलियुगातील मानवी जीवन, इतर युगांच्या तुलनेमध्ये आणण्यासाठी जे काही स्थित्यंतर युगांतर्गत करायचे आहे ते या पंथातील अधिकारी आजही करीत असतात.
म्हणजे खरेतर नाथपंथाला पंथ म्हणून ओळखण्या पेक्षा युग निर्मितीचा एक भाग किंवा एक पंथ जो कलियुगात, युग निर्मितीचे दोष घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी निर्माण झालेला पंथ आहे असे समजावे.
श्रीकृष्णाची नीती, नाथ पंथाची भूमिका, कलियुगाचे स्वरूप हे लक्षात घेतल्यानंतर कलियुगाच्या अंतर्गत काळात योग्य ते स्थित्यंतर करण्याच्या दृष्टीने नवनारायणांचे सामर्थ्य आणि नाथ संप्रदायाचे तत्त्वज्ञान हे लक्षात घेणे आवश्यक आहे
माणसाच्या जीवनातील आधिदैविक, आधिभौतिक, आध्यत्मिक हे त्रिविधताप नाथपंथाच्या सिध्दतेनुसार सहजतेने घालविता येतील. जन्मतः कुंडलीत असलेले हरतर्हेचे ग्रहदोष, अरिष्ट तिथी, वार, नक्षत्र दोष वा अन्य प्रकारचे कोणतेही दोष, प्रत्यक्षपणे जीवनात भोगत असलेले हरतर्हेचे दोष घालविण्याचे सामर्थ्य या पंथामध्ये राहील.
शरीरात उत्पन्न झालेले साध्य, असाध्य हर तर्हेचे रोग, पीडा आदी घालविण्याचे सामर्थ्य या पंथात राहील. मृत्यू, अपमृत्यू घालविण्याचे, दीर्घायुरारोग्य देणे, अपमृत्यू वा मृत्यूवर विजय मिळविणे हे या पंथीयांना सहज साध्य राहील. कोणालाही असणारे शत्रू, गुप्तशत्रू, हितशत्रू, मित्ररूप शत्रू, व्यावसायिक शत्रू, ज्ञात असलेले अज्ञात असलेले, दुरून त्रास देत असलेल्या सर्वच प्रकारच्या शत्रूंचे निवारण नाथपंथीय करू शकतील. जे तंत्रमंत्र, जारणमारण, परविद्या आदींचा उपयोग करून त्रास देतात त्यावर प्रभावी उपाय हा पंथ करू शकेल.
सर्व तर्हेच्या कृत्यांमध्ये, विद्यार्जनामध्ये, कार्यामध्ये जो बाधा निर्माण करील त्याला नाथपंथीय बाधामुक्त करू शकतील. सर्व प्रकारच्या व्यावहारिक, व्यावसायिक तथा आध्यात्मिक उन्नतीत जो विघ्ने निर्माण करेल ते त्रास सहजतेने दूर करता येतील. मनस्थैर्य, सामाजिक स्थैर्य, जीवन स्थैर्य आध्यात्मिक उन्नती ते सहजतेने साध्य करून देवू शकतील.
आपल्या कुलामध्ये कोणत्याही प्रकारची कोणतीही बाधा कोणी निर्माण करत असेल तर त्यापासून हे निवृत्ती देऊ शकतील. सर्व प्रकारचे पितृदोष, कालसर्पदोष, ग्रहग्रहण दोष, चांडाल दोष वा अन्य कोणत्याही प्रकारचे दोष नाथपंथीय दूर करू शकतात. विवाह आदी मंगल कार्ये तथा यश, कीर्ति, विपूल धनधान्य हा पंथ देऊ शकेल.
हर प्रकारचे वास्तुदोष दूर करून सुखनिवास, स्वर्निवास हा पंथ देऊ शकेल. परस्पर मतैक्य, सुसंवाद, मैत्रीप्रवण संबंध घरातील व इतर कोणाशीही प्रस्थापित करून देऊ शकतील. असे काहीच नाही की जे जीवनात कुणाला आवश्यक आहे आणि ते हा पंथ देऊ शकणार नाही. फक्त्त त्याला योग्य कर्माची जोड पाहिजे.
कोणते योग्य कर्म केले असता हे प्राप्त होवू शकते हे आपल्याला नाथपंथीयांकडूनच समजू शकेल. देवावर विश्वास आहे किंवा नाही, नित्य पूजापाठ, उपासना होते किंवा नाही, यावर जीवनाचे सुख किंवा आनंद अवलंबून नसतो, तर माणसाच्या सच्छिलतेवर, सज्जनतेवर व यथायोग्य नित्यकमार्ंवर, त्याच्या संस्कृतीवर, जीवनाच्या दैनंदिन कृतींवर, दातृत्वावर, त्याच्या चारित्र्यावर जीवनाचा आनंद अवलंबून असतो. आर्थिक सुबत्ता वा सर्व तर्हेचे स्वर्गोपभोग हे आत्मिक आनंद केव्हाही देऊ शकत नाहीत. हे कलियुगातील लोकांना आवर्जून सांगण्याची गरज आहे.
वरील उद्देश आपल्याला गाठायचे आहेत. हे केवळ नाथ संप्रदायालाच शक्य होणार आहे. हे कार्य अन्य कुणालाही साध्य होणार नाही कारण काळ आणि वेळ यावर वा त्यांच्यामुळे होणार्या परिणामावर कुणाचाच इलाज चालत नाही. हे खरे असले तरी नाथपंथ हा युगाच्या घडणेत बदल करू शकणार नाही. युग निर्मीती जी झाली त्यात कुणालाही कोणताही बदल करता येणार नाही हेच ते तत्त्व आहे.
नवनारायणांचे कार्य व नाथपंथाचे सामर्थ्य
याच योगेश्वरानंद सदगुरूंची व पुढे त्यांच्या परंपरेतील सदगुरूंची शिकवणुक, त्यांचे कार्य व त्यांच्या सान्निध्यातली अनुभूतीपूर्ण कथा मी आता सांगणार आहे.
हे नवनारायण मुळातले कोण होते त्यांचा परिचय काय व त्यांचे वैशिष्ट्य काय आणि पंथ कार्यासाठी कृष्णाने त्यांचीच निवड कां केली हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
हे व्यक्त-अव्यक्त जग, सृष्टी भगवद्रुपी कशी आहे याची आत्मानुभूती घेऊन संपूर्ण सृष्टीवरील चेतन व अचेतन शक्ती आणि आपण सारे हे एकच आहोत. ब्रह्मांड आपल्याहून वेगळे नाही असा अनुभव सतत घेत असणारे हे नवनारायण, पृथ्वीवर अखंड विहार करीत असतात. ते नेहमी दिगंबर अवस्थेत राहतात.ते नऊही योगेश्वर आपल्या अंगकांतीने सनकादिकासारखे तळपत होते.
ते भगवंताचे परमभक्त असून सूर्याप्रमाणे तेजस्वी होते. त्रिभुवनातील आध्यात्मीक सामर्थ्य संपन्न अधिकारी संत्पुरुषांना ते आत्मज्ञानाचा उपदेश करीत असत. मनात येईल तिकडे त्रिभुवनात, ते तात्काळ जात असत. देवता, सिध्द, साध्य, गंधर्व, यक्ष, मनुष्य किन्नर, नाग, मुनी, चारण, भुतनाथ, विद्याधर, ब्राह्मण, गोशाळा अशा कोणत्याही जागी ते स्वच्छंदपणे जात. सर्वजण जीवनमुक्तच होते. अशा तर्हेने ते ब्रह्मांडात राहत होते आणि सर्व देवता, सर्व प्रकारची शक्ती आणि आध्यात्मिक कार्य करणारे सर्व गुरू ह्यांना ते मार्ग दर्शन करीत असत. सर्वांनाच त्यांचे म्हणणे ऐकावे लागते. हा त्यांचा अधिकार व हे त्यांचे सामर्थ्य. नवनारायण ज्यांनी नवनाथ म्हणून अवतार घेतला त्यांचे ब्रह्माण्डावर प्रभुत्व होते देवांच्या सभेमध्ये येणारे कलियुग हे फार बिकट व वाईट असणार आहे हे लक्षांत घेऊन विष्णुला व ब्रह्मदेवाला फार मोठाप्रश्न पडला.कृत, त्रेता व द्वापार युगाची घडण चांगली झाली परंतू कलियुग या सर्वांच्या मानाने फारच विचित्र घडले. कलियुगांत ईश्वर भक्तिचा महीमा राहणार नाही सर्वच काही विचित्र घडत राहील सामान्य जीवन हे क्लेशदायक, दु:खदायक व असह्य होईल. सज्जन, सत्प्रवृत्त माणसाला जीवन नको नकोसे होईल.
कलियुगात लोक, काही कवड्यांसाठी सुध्दा मैत्री सोडून आपापसात भांडणे करतील शुद्र तपस्व्याचा वेष घेऊन दान घेऊ लागतील.आणि धर्माचे ज्ञान नसणारे उच्चासनावर बसून धर्माचा उपदेश करु लागतील. दुष्काळामुळे आणि करांमुळे त्रासलेली कलियुकातील प्रजा नेहमी खिन्न राहील. स्त्रिया स्वैराचारी होतील. देशात चोर, लुटारुंची वाढ होईल. पाखंडी लोक वेदांना नावे ठेवतील. राजे प्रजेचे रक्तशोषण करतील.कली सर्वांनाच स्वच्छंदी करून सोडील, निद्रा, परद्रव्य,परस्त्री ह्यांचा अनीतीने वापर करेल. जगामधील सर्व लोकांमध्ये खोटेपणा, कपट, आळस, झोप, हिंसा, खेद, शोक, मोह, भय आणि दीनता यांची प्रधानता असेल, ज्याच्याकडे धन-संपत्ती असेल त्यालाच लोक कुलीन, सदाचारी आणि सद्गुणी मानतील.धर्म आणि न्याय यांच्या बाबतीत शक्ति प्रभावी ठरेल.
म्हणून कलीयुगातील जीवन नियंत्रीत असाव, सामान्य जनजीवनांतील कलीचा प्रभाव कमी करावा ह्यासाठी अवश्यक असणारे कलियुगाचे परिवर्तन करण्यासाठी युगांची फेररचना होणे शक्य नव्हते म्हणून युगांतर्गत परिवर्तन करण्यासाठी, स्वत: विष्णूने नाथपंथाची योजना केली. ही योजना जर केली नसती तर कलीयुगाचे भयानक परिणाम सामान्य माणूस सहन करू शकला नसता.
नवनाथांचा कार्यकाळ संपला असला तरी नाथांनी, नाथपंथ कार्य कलियुगात असेपर्यंत अबाधित सुरू राहील ही योजना केली आहे. त्यामुळे नवनाथांच्या कार्य काळानंतर देखील हा पंथ आज कार्यरत आहे. ज्या उद्देशाने नाथपंथ निर्माण झाला तो मूळ उद्देश नाथपंथी लोक आजही साध्य करण्याच्या दृष्टीने कार्य करीत आहेत. नवनाथांनी नाथपंथ हा युगरचनेचाच एक अविभाज्य भाग असल्याचे कार्य सुरू ठेवले आहे