ब्रह्मांडावर प्रभुत्व असणाऱ्या नाथ पंथाची योजना भगवान श्रीकृष्णांनी केली त्यानुसार पंथस्वामी भगवान दत्तात्रेयांपासून चालू झालेला हा नाथ पंथ आजही दैदीप्यमान कार्य करीत आहे.

आमचे ध्येय 

  • व्याधी, प्रापंचिक, तथा व्यावसायिक अडचणी व कुयोग ह्यावर वैदिक मंत्रांच्या माध्यमातून व नाथ पंथाच्या परंपरागत शक्तींच्या सहायाने मानवास व्याधिमुक्त चिंतामुक्त करून त्याला आध्यात्म मार्गास लावणे।
  • अपारंपारीक शिक्षण पद्धतीने सत्प्रवृत्त, सत्शील सदाचारी व्यक्तिमत्त्व घडवणे।
  • वेदांचे जीवनातील महत्त्व सांगून वेदांचा प्रचार-प्रसार करणे तसेच वैदिक शिक्षण देणे।
  • नाथ पंथाचे पंचमहाभूतांवर असलेले प्रभुत्व व त्यांचे अलौकिक कार्य ह्यांची ओळख करून देत नाथपंथीय तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार करणे।

आमचे तत्व

  • ब्रम्हांड निर्माता देव असला तरी सद्गुरु हे ब्रम्हांडनायक आहेत. 
  • मृत्यू निश्चित असला तरी जगण्यातील आनंद व दुःख हे पूर्वसंचित तथा कर्मा प्रमाणे मिळतात।
  • देवाची आराधना अध्यात्मिक जीवन घडवण्याचं साधन आहे
  • केवळ सद्गुरुच जीवनात आमूलाग्र बदल घडवू शकतात।
  • नाथ पंथात अशक्य काहीच नाही।
  • वेद तथा नाथपंथ हे सर्वव्यापी आहेत, त्यांचे कार्य देश, धर्म, जात ह्यांच्या पलीकडे आहेत।

अभिप्राय 

देव हा कोणी पाहिला नाही व त्याच्या अस्तित्त्वा बद्दल कुणालाही छातीठोक पणे कांहि सांगता येत नाही. हे जरी खरे असले तरी विज्ञानाला न गवसणारे तत्त्व या नाथपंथा मधे दिसत आहे. विश्वशांतीसाठी नाथपंथाच योगदान, तसेच कलियुगातील मानवी जीवनाचा समतोल कसा राखावा हे नरेन्द्रनाथ महाराज नाथशक्तिपिठातून सांगत असतात. — पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण डॉ विजय भटकर

श्री. नरेंद्रनाथ हे तर्क व शास्त्राच्या आधारे आपले प्रारब्ध काय आहे?, त्यावर मात कशी करावयाची, तसेच माणसाचे योग, भोग या विषयांचे शास्त्रोक्त उद्बोधन नाथशक्तिपिठातून करत असतात. — स्वामी शंकराचार्य महाराज करवीर पीठ 

नरेंद्रनाथ महाराज खुद कर्म करते है और दूसरों से भि कर्म करवाते है, और उनके पाप धुलवाते है। खुद साधना करके अपने गुरूके छायामे रहते है और कर्म तथा साधना का आनंद लेते है। हम तो केवल खुदकी साधना कर पाते है ।गुरूकृपा के कारण आप हिमालय से दूर रहकर भी वो कार्य कारते है जो हम हिमालय मे रहकर भी नही कर पाते। — रामबाबा गोमुख हिमालय 

नरेंद्रनाथांच्या नाथपंथ कार्याची, वेद कार्याची व वेदमंत्राच्या माध्यमातून होणार्‍या ‘भाग्याच्या पुनरुज्जीवनाची’ अनुभूतीपूर्ण परीक्षण केले असता असे दिसते की गेल्या १५० वर्षा मधे अशी अनुभुती कुणालाहि घेता आली नाही. — प. पू. महामहोपाध्याय ब्रह्मर्षी यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे

आमचे उपक्रम

वैदिक उपचार

वेदांमध्ये सर्व शाखांचे संपूर्ण ज्ञान आहे। ह्याच वैदिक मंत्रांचा शास्त्रोक्त पद्धतीने उपयोग करून सर्व व्यावसायिक, प्रापंचिक समस्यांवर तसेच व्याधींवर नाथशक्तिपीठ येथून उपचार केल्या जातात। येथून केलेल्या उपचारांची फलश्रुति ९० % हून  अधिक दिसते. 

व्यक्तिमत्व विकास

माणसाचे व्यक्तिमत्वास बाधा निर्माण झाल्यावर जेव्हा आजचे प्रगत विद्यान त्यावर उपाय देउ शकत नाही त्या वेळेस मनूष्य जीवनातील सर्वच आघाडीवर खचत जातो अन अपयशी ठरतो. विविध प्रयोगाद्वारे नाथशक्तिपीठ येथून श्री नरेंद्रनाथ महाराजांच्या मार्गदर्शनात व्यक्तिमत्व विकास साधल्या जातो।

आध्यात्मिक मार्गदर्शन

मानव जन्म हे मुक्तीचे द्वार आहे। आत्म्याचे परमात्म्याशी मिलन म्हणजे मुक्ती। अत्यंत सहज व सोप्या पद्धतीने आत्मिक उन्नती साधण्यासाठी व गुरुकृपा संपादन करण्यासाठी श्री नरेंद्रनाथ महाराज नाथशक्तीपीठ येथून मार्गदर्शन करतात। ह्याचा लाभ लाखों लोक घेत आहेत.

वैदिक अध्ययन

नाथशक्तीपीठ येथे संपूर्णतः निशुल्क वैदिक अध्यापन केले जाते। येथे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह वैदिक मंत्रांच्या उपयोगा बद्दल पण ज्ञान दिले जाते.  वैदिक अध्यापनाचे हे कार्य १९९७ पासून अखंड चालू आहे। आजवर येथून ५,०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घेतला आहे।

वैदिक शोधकार्य

वेद हे आजच्या प्रगत विज्ञानाचे मूळ आहे. सांकेतिक स्वरूपातील वेदांचे अध्ययन करून त्यातून मानवाच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग निर्माण करून शास्त्रीय दृष्ट्या अनुभव सिद्ध करण्याचे शास्त्रोक्त शोध कार्य नाथशक्तिपीठ येथून नरेंद्रनाथांच्या मार्गदर्शनात केल्या जाते।

प्रचार व प्रसार

नाथपंथ व वेद दोन्हीही धर्म जात-पात ह्या पलीकडचे असूनही ह्या बद्दल समाजात काही चुकीचे तत्व मध्य युगात रुजवल्या गेलेत. ह्या दोहोंबद्दल आस्था निर्माण करण्याचे व त्यांच्या सहायाने मानवास सुखी कसे होता येईल ह्याचे मार्गदर्शन करत विविध उपक्रमांद्वारे प्रचार प्रसार कार्य केले जाते.  

नाथशक्तिपीठ 

चराचरांवर सत्ता असलेल्या नाथपंथाच्या व पंथाला साहाय्यभूत असणार्‍या सर्वप्रकारच्या शक्तिंचे अधिष्ठान  म्हणजेच श्री नाथशक्तिपीठ. नाथशक्तिपीठ हे नवनाथ परंपरेचे आध्यात्मिक अनुभूतिचे केन्द्र आहे. चैतन्य श्री मच्छीँद्रनाथांपासून सुरु झालेल्या अखंड नाथपंथ परंपरेतील प. पू. श्री व्यंकटनाथ महाराज हे पंधरावे नाथ आहेत.  त्यांच्या प्रेरणेने व संकेतानुसार त्यांचे उत्तराधिकारी प. पू. श्री नरेन्द्रनाथ महाराज यांनी अकोला यॆथे नाथशक्तिपीठाची स्थापना केली आहे. येथे  वेदांची  उपासना अव्याहत चालू असते. 

कोणत्याही धर्म अथवा जातीच्या एखाद्या वाटसरु ने विसाव्यासाठी जरी या नाथशक्तिपीठाचा आश्रय घेतला तरी त्याच्या जीवनात बदल घडेल व त्याचा आपल्या जीवना कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलून त्याच्या पीडा, विवंचना, कष्ट दूर होण्याचा त्याला मार्ग सापडेल असे वचन प. पू. श्री नरेन्द्रनाथ महाराजांनी नाथशक्तिपीठाची स्थापना करताना दिले आहे.

काही नवीन 

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 152

आपण आपल्या जीवनाकडे  शोध-बोध बुद्धीने पाहणे गरजेचे आहे. आपल्या पूर्वजन्मीच्या कृतीचा, प्राक्तनाचा, विधिलिखिताचा, संचिताचा विचार करून त्याची सांगड सद्यजीवनाशी कशी घालायची, याचा शोधपूर्ण अभ्यास नाथ शक्तिपीठ, अकोला येथून गेल्या 30 वर्षांपासून सुरू आहे.

पुढे वाचा

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 151

ब्रम्हांडामध्ये फक्त जीव सृष्टी आहे आणि जीव सृष्टीवरच नाथांच प्रभुत्व आहे ही कल्पना करणे चुकीचे आहे. नद्या पर्वत वनस्पती  चल अचल अशा अनेक गोष्टींचा समावेश ब्रम्हांडात आहे.त्या सर्वांवर नाथांच प्रभुत्व आहे. निसर्ग, ज्यामध्ये नद्या पर्वत,अचल गोष्टी येतात त्यावर देखील नाथांचे प्रभुत्व आहे हे नाथांनी आपल्या कृतींनी  दाखवले आहे. यत पिंडे तद ब्रम्हांडे हे त्यांनी दाखवून दिले आहे.

पुढे वाचा

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 150

व्यंकटनाथ महाराजांनी केवळ नरेंद्रच्या इच्छेसाठी  त्याच्या आजोबाला सर्वांसमोर जिवंत उभे दाखवले. जालिंदर नाथांनी देखील आपला शिष्य राजा गोपीचंद यांच्या इच्छे खातर,त्याच्या बहिणीला अग्निसंस्कार  झाल्यावर,पुन्हा त्याच देहानिशी जिवंत केले आणि  ती तिचा  उर्वरित संसार करू लागली 

पुढे वाचा

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 149

ब्रम्हांडाच्या नियमाप्रमाणे एकदा जीव गेल्यावर तो  पुन्हा त्याच देहाने आणि त्याच कुटुंबात लगेचच  जन्माला येत नाही.तो आपल्या कर्म बंधनानुसार कोणत्यातरी योनीमध्ये जन्म घेऊन आपल्या जीवाचा जीवनप्रवास करीत असतो. मेल्यावर त्याच देहाने पुन्हा जीवंत करण्याचे सामर्थ्य नाथपंथात दिसून येते.

पुढे वाचा

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 148

रेवणनाथांनी आपल्या शिष्यांच्या मेलेल्या मुलांना जिवंत केले ज्यावेळेला शंकराशी युद्ध केल्यानंतर विष्णूशी युद्ध करायला गेला तेव्हा विष्णूने सांगितले की तुला ते जीव देतो परंतु त्यांना देहरुप देऊन त्याच प्रारब्ध बनवणं हे काम तुला करावे लागेल. यावरून हे लक्षात येतं की मरण…

पुढे वाचा

पदी लागता धन्य होऊन गेलो भाग 147

जर गुरूंचे मार्गदर्शन लाभले असेल तर गुरु सांगतील त्याप्रमाणे साधना उपासना करावी व जीवनांत पुढील तत्वांचा अंमल करावा. जर गुरु लाभले नसतील तर आपल्या आवडीच्या देवतेचे नामस्मरण करावे व पुढील पथ्य पाळावेत, सद्गुरूंची भेट होईल व जीवन आपोआप सन्मार्गी लागेल

पुढे वाचा

mrMarathi