श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

ज्ञानाचा उलगडा करणारी लेख मालिका

अर्थात वाचकांनी “पदी लागता धन्य होऊनि गेलो” मालिकेचे केलेले स्वागत

आतापर्यंत झालेल्या शंभर लेखांवर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत प्रतिक्रियेत कोणी आपले नाव दिले आहे तर कुणी दिले नाही जे जसे आहे तसेच ते आपणा पर्यंत पोहचवीत आहे

१)संन्यासी योगी शिवराम श्री दत्त गिरनार गढ हे योगी आहेत गिरनरला त्यांचे वास्तव्य असते तसे ते मेकॅनिकल इंजीनियर आहेत त्यांनी काही वर्षे नोकरी करून नंतर संन्यास धर्म स्वीकारला ते अविवाहित असून अनेक वर्षांपासून ते संन्यासी म्हणून साधना करीत असतात. आज त्यांचे वय ७५ वर्षे आहे. त्यांनी फोन करून सांगितले की “ आपने लिखे हुए सारे लेख हमने पढ़ लीए। लेख मराठी मे है फिर भी समज मे आते है। आपने बहुत स्पष्ट शब्द मे अध्यात्म समझाया है। आप ने लिखे हुए कथानको का गुढार्थहर किसिके समज मे नही आयेगा। . लेख बार बार पढ़ने के बाद मे सही ज्ञान होने लगे गा। गुरुचरित्र मे लिखे हुए तत्वो का आपने सही विवरण किया है। गुरुभक्ती आपने अच्छीसमझाई है। आपका हार्दिक अभिनंदन”

२)सौ. शैला फडणवीस. ह्या नागपूरला असतात. त्या रिटायर्ड शिक्षिका आहेत. साहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. त्या म्हणतात “शत शत प्रणाम. पदी लागता धन्य होवून गेलो ही प. पू. श्री नरेंद्र नाथ लिखित लेखमाला मी नित्य नेमाने वाचते. आता शंभरावा लेख. प्रत्येक लेख नवीन जाणवतो, महत्वपूर्ण माहती व अद्भूत शक्तीचा वास, त्याचा सुयोग्य वापर ह्याबाबत छान माहिती दिलीत. एकही भाग चुकवावासा वाटत नाही. खूप खूप धन्यवाद व पुढील लेखना करिता शुभेच्छा. साष्टांग नमस्कार

३)एका वाचकाने म्हंटले आहे “पदी लागताधन्य होऊनी गेलो“ “सद्गुरू श्री नरेन्द्र नाथ महाराज की जय” नाथा, नवीन वर्षाचे उठताक्षणी वाचन! मनाला वाचनातून भगवान दत्तात्रेय भेटीचा आनंद झाला आणि नकळत ओठी आले ते असे पदी लागता धन्य होऊनी गेले नरेंद्र नाथा दारी मी आले मिळेल का मज पदीविसावा? नमस्कार माझा सदोदित. घ्यावा! सद्गुरूनाथ माऊली श्री नरेंद्रनाथमहाराज की जय

४)गुरुचरित्र समजून घेण्याची सुवर्णसंधी महाराजांनी उपलब्ध केली आहे. असे संगत एका वाचकाने म्हंटले आहे “पदी लागता धन्य होऊनी गेलो”. . . आपल्या सद्गुरूंच चरित्र अर्थात श्री गुरुचरित्र. . काका महाराज आपल्यासमोर उलगडत असलेले त्यांचा जीवन प्रवास हा एक आपल्या समोर आपल्या सारख्याच असलेल्या हाडामासाच्या माणसाचा ब्रम्हांडनायक होण्यापर्यंतचा जीवन प्रवास आपल्याला या सध्याच्या युगामध्ये जणू काही लाईव्ह telecast द्वारे रोज नित्य नव्याने या लेखाद्वारे उलगडत आहे. आपल्याच सद्गुरूंचे बाह्य स्वरूप आपण तर जाणतोच आहोत पण याद्वारे त्यांच्या अंतरंगाची काका महाराज देत असलेली ओळख आपल्याला पण कळत नकळत अंतर्मुख बनवत आहे. आपल्याला आणि पुढच्या पिढीला देखील उदाहरणासहीत स्पष्टीकरण लक्ष्यात घेऊन गुरुचरित्र समजून घेण्याची सुवर्णसंधी महाराजांनी उपलब्ध केली आहे. ” सद्गुरु नाथ माऊली श्री नरेंद्र नाथ महाराज की जय.

५)काका महाराजआज आपल्या लेखा मध्ये तुम्ही तुमचा अनुभव कथन करत होता आणि मी मात्र मला तुम्ही दिलेल्या अनुभवा मध्ये गढुन गेले. माझा मुलगा वीरेंद्र जो BE in Civil झाला आणि पुढे काय करायचे यासाठी विवंचनेत मी असताना तुम्ही मला सांगितले की वीरेंद्रला एम एस साठी अमेरिकेला शिक्षणासाठी पाठव. खरंतर दोन्हीही कुटुंबामध्ये उच्च शिक्षणासाठी परदेशी कोणीही गेलं नव्हते अशी पार्श्वभूमी असताना विरेंद्रला पण काही कळत नव्हते. फक्त काकांनी सांगितले ना मग बाकी काही नाही. सर्व सोपस्कार पार पाडून अगदी तेथील काही अंशी स्क़ालरशिप मिळेपर्यंतचेव्यवस्थित पार पडले आणि विरेंद्र अमेरिकेला शिक्षणासाठी गेला. सध्याच्या कोरोनाच्या अवघड काळात देखील काका महाराजांनी इथुन त्याची काळजी घेतली आणि त्याच्या कडून कर्म करुनघेत घेत त्याला MS in Construction Managementची डिग्री पणमिळाली. . . . कोणाच्याही ध्यानीमनी काही नसताना केवळसद्गुरु माऊली मुळे हे घडले. हेच तर परम सत्य असे गुरुतत्व केवळ अवर्णनीय व अविश्वसनीय असेच आहे. पहिल्या दोन लेखात काका महाराज आपल्याला जणू काहीआपलाच आरसा दाखवत आहे असे वाटते. पण असे असताना देखील आपले आधीचे विचारआणि सद्गुरु भेटीनंतर चे आपलेविचार, विचारांमधील पारदर्शकता, अनुकरण प्रिय असण्यापेक्षा अनुभूती पूर्ण आलेली निर्णय क्षमता, सद्गुरुमुळे घडतअसलेल्या बदलाची by force नाही तर मनापासूनचीमान्यता किती महत्त्वाची आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला याद्वारेहोत आहे. ” असे पुण्याच्या वाचकाने कळवले आहे.

६)नवनाथांच्या अखंड परंपरेतील नवनाथांचे तेजधारक नरेंद्रनाथ ही ईश्वरीय नियोजना आहे असे म्हणत वाचक लिहितात “गुरुपदी लागता धन्य झालो या लेखमालेतील सर्व लेखाचे लिखाण वाचतानां तुमच्या आणि व्यकंटनाथ महाराजांच्या पहिल्याच भेटीतच तुमचे नाव विचारुन नाव माहीत आहे तुमचीच वाट पाहताहेत या संवादात नवनाथांच्या अखंड परंपरेतील नवनाथांचे तेजधारक नरेंद्रनाथ ही ईश्वरीय नियोजन. या युगातील सर्वांना अनुरूप science च्या प्रभावित जीवन प्रवाहात सर्वव्यापी दैवी चैतन्याचांपंचमहाभूतातील शुभ योगातील दैवी शुभस्पंदनांने अरिष्टाचे निवारण करून शाश्वत सुखदायी कल्याणदायी आध्यात्मिक कर्मपथदर्शक योगीयांचे योगिराज नरेंद्रनाथराजांच्या धर्मकार्याचां युगानू युगे धर्मध्वज लहरो गगनी. गुरुचरणी साष्टांग नमस्कार.

७)सद्गुरुंनी सुरू केलेली लेख मालिका म्हणजे आपल्या सारख्या भक्तांसाठी पर्वणीच आहे। आपण नेहमी अखंड गुरू परंपरा असा उल्लेख ऐकत आलो। त्याची प्रचिती या लेखांमधून येत आहे। गुरू शिष्याला कसं घडवतात, त्यापेक्षाही शिष्याने निष्ठेने स्वतः मध्ये बदल करत रहावे लागतात। टाकीचे घाव सोसण्याचा जो उल्लेख लेखामध्ये आला आहे तो यासाठीच। यामुळे आंतरिक, मानसिक, वैचारिक बदल घडत जातो आणि आपण परिपक्व होत जातो। सद्गुरू देत असलेल्या या ज्ञानाबद्दल त्यांचे सदैव ऋणी राहू। त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत। “सद्गुरू नरेंद्र नाथ महाराज की जय” अश्या शब्दात आपले विचार व्यक्त केले आहेत.

८) लेखमालिका वाचन म्हणजे अमृततुल्य प्राशन! असे म्हणत एकाने आपले विचार अश्या पद्धतीने कळवले आहेत “ पदी लागता धन्य होऊनी गेलो” लेखमालिका वाचन म्हणजे अमृततुल्य प्राशन! एकदा वाचून मन भरतच नाही. मात्र मन बुध्दी आणि अंत: करणं याचा कस लागतो. वाईट कोणीच नसतं दुसऱ्याला आपल्यासारखे बनवता येत नाही म्हणून दुसरा वाईट! असतात ते फक्त मतभेद, पण इथे तर कुठल्याच चांगल्या वाईटाचा विचार मनात नव्हता नरेन्द्र चां नरेन्द्र नाथ घडविताना! “गुरुतत्व” एक आहे. मग ते कोणत्याही पंथाचे असोत. प्रत्येक गुरूंचा निश्चित कार्य काल ठरलेला असतो. जसे व्यंकट नाथांनी ५७ वर्ष गुरुकार्य केले. कोणी किती वर्ष आपल्या आयूष्याचे गुरुकार्याला द्यायचे, केव्हा पासून द्यायचे हे विधी लिखत आहे. गुरू आज्ञेनुसार कार्य सुरू असते ते करता करविते गुरूच असतात. गुरु आज्ञेनुसार आपले फक्तं शरीर सोडायचे आत्म शोध घेत घेत. म्हणून आत्मा अमर! जसे _सद्गुरू माधवनाथ महाराज, सद्गुरू व्यंकट नाथ महाराज, सद्गुरू नरेन्द्र नाथ महाराज परंपरे नुसार नाथ परंपरा पुढे नेत आहेत. गुरुकर्याची धुरा नियोजित वेळेपर्यंत आपल्या गुरंच्या आज्ञे नुसार चालूच असते फक्त प्रत्येकाच्या कार्य पद्धतीची पद्धत वेगवेगळी असते. सद्गुरू सेवाकार्य करवून घेत घेत शिष्याला गुरुपदी पोहोचिण्यासाठी जन्मोजन्मी कष्ट घेत असतात. गुरुशिष्य परंपरेचे अमृततुल्य विवेचन आपण प्रत्येक भागातून घेत आहोत. हे आम्हा शिष्यांचे महत भाग्याचं आहे हे निर्विवाद सत्य नाकारता येत नाही.

९)महेंद्र कवीश्वर हे नावाजलेले अकोल्याचे पत्रकार आहेत. तरूण भारताचे ते संपादक होते. अनेकांच्या परिचयाचे ते आहेत ते म्हणतात “पु नरेंद्रनाथ महाराजांनी भगवंत अगदी जे गुरुपदी पोहचले त्यांची देखील परीक्षा पाहतात हे पु व्यंकटनाथ महाराजांच्या जीवनातील एका अद्भुत प्रसंगाचा दाखला देऊन स्पष्ट केले आहे। भक्तांच्या मनात सद्गुरू विषयी कधीही किंतु परंतु असू नये हे या उद्बोधनातून स्पष्ट झाले आहे। श्री गुरुदेव दत्त। “ नाथपंथाचे गुरु कार्य ही सृष्टि निर्मितीचाच एक भाग आहे हे मी लेखातून सांगितले होते. त्यामुळे सर्वच शक्ति गुरुकार्य करणाऱ्या नाथांकडे बारीक लक्ष ठेऊन असतात.

१०)अकोल्याचे इंजिनियर दातिर कळवतात Padi lagata dhanya hovoni gelo, this malika is very very nice n spiritual one, for every one who connected this spiritual knowledge. Thanks a lot. Datir

११) औरंगाबादचे रुपेश कुलकर्णी उर्फ (बाप्पा) कळवतात “मला महिन्याभरा पूर्वी पांढऱ्या पेशी कमी झाल्या व थायरॉईड आहे असे कळले त्या नंतर 3, 4 डॉक्टर झाले पण गुण येत नव्हता त्या नंतर मी महाराजांकडे धावा केला रात्रंदिवस महाराजांच्या मंत्राचा जप सुरूच ठेवला त्या नंतर मार्ग भेटत गेला व मी बरा झालो आणि डॉक्टरांनी पण सांगितले तुम्हाला थायरॉईड नाही व्हायरल इन्फेक्शन आहे सद्गुरू मधवनाथ महाराज की जय सद्गुरू व्यंकटनाथ महाराज की जय सद्गुरू नरेंद्रनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त आणि मी महाराजांच्या फोटो समोर नवस बोललो आणि मी बरा झालो मी मरतो की काय असेच वाटत होते पण सद्गुरूंनी वाचवले सद्गुरु नाथ महाराज की जय.

१२)वैशाली बुटेपतील पुणे यांनी आपले मनोगत असे व्यक्त केले आहे “स्वतःचे मुल सांभाळताना लायकी नसताना आई झालेली स्त्री असा काही प्रसंगाने शिक्का बसलेली ती आई. . ते आज दोन्ही कुटुंबात कोणीही इतका शिकला नाही असा परदेशी शिकलेला उच्चशिक्षित मुलगा त्याच मुलाची ती नशीबवान आई. . . सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेला हा प्रवास जसा त्या मुलाचा होता तसा तो त्या आईचा पण होता. या प्रवासदरम्यान सद्गुरूमाऊलीआपल्या हातुन कर्म उपासना करून घेताना कळत नकळतपणे तो बदल त्या मुलावर नाही. . आईवर नाही तर इतर वेगवेगळ्या लोकांवर आणि गोष्टींवर सुद्धा बदल करत होते ह्याची अनुभूती घेतली. ते आपल्या पूर्वसंचित कर्मदोषाची तीव्रता कमी करत होते. हे आज मला कळते. हे खर आहे. सद्गुरूनाथांच्या सर्वच शिष्यांचा प्रवास साधारणपणे असाच थक्क करणारा आहे. अनुग्रह होण्याआधी मी कोण होतो, कसा होतो ते आज मी कोण आहे आणि कसा आहे ह्याचा जर विचार केला तर खरच जीवाला घडवणे काय असते आणि सद्गुरू कसे जीवाला घडवतात हे सहज लक्षात येते. सद्गुरू नरेन्द्रनाथ महाराज की जय

१३) काका, गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायातील दाखला देऊन आपण जे लिखाण करता आहात ते खुप सुंदर आहे. अस कोणाच्या डोक्यात ही आल नसेल की अश्या प्रकारे लेखमाला चालवल्या जाऊ शकते. पण तुमच्यामुळे ते खूप सोप्या पद्धतीने कळतंय, उमगतय, या सगळ्याची अनुभूती मी २००२ते २००७ या कालावधीत घेतली. . . ! ! काका खरच जर हे पुस्तकरुपी तयार झाल. तर छानच होईल. हे लेख वाचतांना पदोपदी तुमची आठवण होते. काहीवेळा असं ही होत, की परत परत वाचावस वाटत. तसेच शक्तीपीठाचे कार्य कित्ती अखंड परंपरेच आहे. हे माहिती होत आहे. काका ही लेखमाला केल्या बद्दल धन्यवाद. नमस्कार करतो असे नचिकेत काळे नागपूर काळवितात. सद्गुरू नाथ महाराज की जय.

१४)वैशाली म्हणते “ २००९मध्ये माझ्या कानाच्या मागे डोक्यात छोट्या छोट्या अश्या गाठी यायला लागल्या. मला खुप डोकेदुखीचा त्रास पण होत होता. आधी सुरुवातीला एकच आलेली गाठ नंतर हळूहळू निम्म्या डोकं भर पसरत चालल्या होत्या. मला केस विंचरणे देखील त्रासदायक होत होते. डॉक्टरांना दाखवले त्यांनी त्या गाठी dissolved विरघळणाऱ्या गोळ्या दिल्या. महीनाभर घेत होते पण दुखणे काही कमी होईना उलटे वाढतच होते. गाठी पण एक एक करत पसरत चालल्या होत्या. तीन ते चार महिने मी हा त्रास सहन करत होते. काका महाराज अकोल्यात होतें. डॉक्टरांनी एमआरआय आणि तत्सम इतर पुढच्या treatment chiकल्पना सरतेशेवटी दिली. काका महाराज्यांच्या कानावर सर्व घालुयात अणि नंतर मी पुढे ट्रीटमेंट घेणार असे मी घरच्यांना सांगितले. आणि त्याच दिवशी संध्याकाळी काका महाराजांचा मला अचानक फोन आला. ते स्वतः मला म्हणाले की वैशाली तुझी तब्बेत कशी आहे? काही त्रास होतोय का? मी महाराजांच्या कानावर सर्व घातले. त्यांनी मला सांगितले की १५ दिवस तु औदुंबर वृक्षाची खाली पडलेली वाळलेली असली तरी चालेल नऊ पाने घे आणि रात्रभर काचेच्या ग्लासात पाणी घेवुन त्यात खाली देठ आणि वर शेंडा बुडतील अशी ठेव आणि सकाळी ते पाणी अमोश्या पोटी घे. पंधरा दिवस घे आणि मग पुढची ट्रीटमेंट चालु कर. आता काहीही करू नकोस. मी त्यांनी सांगितल्या प्रमाणे केले. आणि माझ्या डोक्यातील गाठी सर्व हळूहळू dissolve झाल्या विरघळून गेले. माझी डोकेदुखी पूर्णपणे बरी झाली. ही सर्व गुरु माऊलींची कृपा. आजही आपण या कल्पवृक्षाची अर्थात औदुंबर वृक्षाची प्रचीती अनुभवत आहोत केवळ आणि केवळ आपल्या दत्त स्वरूप सद्गुरुंच्या मुळे. सद्गुरु माऊली श्री नरेंद्र नाथ महाराज की जय. नमस्कार करते काका

१५)“पदी लागता धन्य होऊनि गेलो” ही मालिका तुम्ही सुरु करून आम्हा सर्वांना उपकृत केले आहे. आम्हाला कळत नाही की खरे ज्ञान म्हणजे काय व ते कसे मिळवावे. आमचेच आम्हाला कळत नाही की आमच्या जवळ काय आहे व त्याचे महत्व काय. पण सद्गुरुंना त्यांच्या शिष्याविषयी कशी तळमळ असते ते आम्ही प्रत्यक्षपणे पाहतो आहे. तुम्ही ज्या ज्या विषयांवर लिखाण करत आहात ते ते विषय आमच्या कल्पने च्या पलीकडले आहेत. At least माझ्या तरी. आम्ही ज्या गोष्टी अगदी सहज समजत होतो, ज्या आम्हाला तुमच्या कृपेने सहज साध्य होत आहेत त्या किती विलक्षण आहेत हे तुम्ही तुमच्या लिखाणातून आम्हाला सांगत आहात. गुरु चरित्र एक पोथी म्हणून मला वाटत होती त्यातील किती तरी गोष्टी ह्या काल्पनिक असतील असे मला वाटत होते पण तुम्ही त्या सर्व गोष्टी आजही कशा अस्तित्वात आहेत हे व्यंकटनाथ महाराजांच्या जीवनातील घटनांवरून आम्हाला दाखवून देत आहात. तुम्ही दिलेली विभूती आमच्या सर्व समस्या निवारण करते हे आम्ही पाहिलेले आहे पण काल च्या भागातून त्या विभूतीचे विशेष महत्व आम्हाला कळले.

अभिप्राय

नरेन्द्रनाथ महाराजांचे सर्वच लिखाण हे मनाला आणि विचारांना चालना देणारे आहे. – *अनेक वाचक*