श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भगवान विष्णू यांचा ज्ञाननाथ अवतार

भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान दत्तात्रेय आणि नारायणचे पार्षद यांनी नाथपंथाची संपूर्ण योजना केल्यानंतर त्यात ठरल्याप्रमाणे नावनाथांनी अयोनी संबंधातून अवतार धारण करून कार्य केले.

नंतर शंकराने योनि–संबंधातून, म्हणजे सामान्य कुटुंब पद्धतीतून अवतार धारण करून पंथकार्याला आणि पद्धतीला वेगळे वळण दिले. त्यानंतर पूर्वी ठरल्याप्रमाणे आता विष्णूने सामान्य कुटुंब पद्धतीतून अवतार धारण करून ज्ञाननाथ म्हणून नावनाथानंतरच्या कार्याला आणि पंथ पद्धतीला भक्तिमार्गाकडे वळवले.

गहिनीनाथांपर्यंत असलेला हटयोगी पंथ आता स्वतः भगवान शंकरानेच बदलण्याचा निर्णय घेतला होता. निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून ह्या पंथकार्याची दिशा बदलली. हा बदल पुढे वाढविण्यासाठी ज्ञाननाथां शिवाय दुसरा कोणीही योग्य नाही, हे जाणून त्यांनी ज्ञाननाथांना पुढील कार्याची आज्ञा केली.

भगवान विष्णूनी मच्छिंद्रनाथांना म्हटले होते की, ‘‘ह्या पंथाचे महात्म्य लक्षांत घेऊन मी स्वतः तुमच्या शिष्याच्या शिष्याच्या शिष्याचा दास होईल.’’ त्या निवृत्तीनाथांचा म्हणजेच भगवान शंकराचा दास म्हणून गुरू–शिष्यपरंपरा असलेल्या नाथपंथाच्या कार्याची जबाबदारी स्विकारली.

द्वापारयुगात कृष्णाने रणभूमीवर अर्जुनाला गीता सांगितली. जी गीता कृष्णाने सांगितली ती त्या युगातील लोकांना जशीच्या तशी समजली. त्या काळातल्या लोकांची ते समजण्याची पात्रता होती.

परंतु आज द्वापारयुग संपून कलियुग सुरू झाले आहे. युगाच्या बदलामुळे पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश या पाचही तत्त्वांचा जीवावर होणारा परिणाम बदलला. सत्ययुगात माणूस 16 हात उंचीचा, त्रेतायुगात 12 हात, द्वापारयुगात 7 हात आणि आज कलियुगात 4 हातांचा झाला.

युगांतराचा हा परिणाम आपल्याला बरेच ज्ञान देऊन जातो.

त्या प्रमाणे कलियुगातील माणसाची बुद्धिमत्ता कमी झाली आहे. परिणामतः जी गीता द्वापारयुगातील जनतेला सहज समजली, ती समजावून सांगण्याची गरज भासली.

आज गीतेवरील पुस्तके भरपूर लिहिली जातात. लिहिणाऱ्या आणि सांगणाऱ्याला तरीही वाटते की आपण अजून पूर्ण सांगितलेले नाही — म्हणजेच गीता समजण्याची पात्रता कमी झाली आहे.

याच कृष्णाने (विष्णू/नारायण) ज्ञाननाथ म्हणून जन्म घेतला. येणाऱ्या कलियुगात आपली गीता लोकांना समजणार नाही, हे माहीत होते. ती समजावी म्हणून नारायणाने स्वतः अवतार घेतला ज्ञानेश्वर म्हणून, आणि ‘‘ज्ञानेश्वरी’’ लिहिली — जी गीतेवरील भाष्यच आहे.

ज्ञानेश्वर हे नाव मानवी कुटुंबातील वाटते, पण ही योजना कृष्णाचीच होती. द्वापारयुगाच्या शेवटी त्यांनी सांगितले की, ‘‘कलियुगात जनतेला मार्गदर्शन करण्यासाठी आणि भक्तिभाव टिकवण्यासाठी नाथपंथाची योजना केली आहे.’’

या पंथातील मच्छिंद्रनाथांपासून ज्ञाननाथ हे अखंड परंपरेतील पाचवे नाथ आहेत.

आपल्या इतिहासाप्रमाणे ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे झाला आणि त्यांनी आपले विहित कार्य आळंदी येथे केले. त्यांच्या जीवनातील संघर्ष, समाजाचा विरोध, दारिद्र्य — सर्व सहन करूनही त्यांनी जनमानसाला दिशा दिली.

त्यांनी समाजाला ज्ञान, भक्ती, उत्साह आणि ईश्वरभाव जागृत केला.


पंथ भक्तिमार्गाकडे का वळला

आज ‘‘अलख निरंजन, आदेश’’ हे शब्द ऐकले की उत्साह जाणवतो. हे नाथपंथाचे शब्द आहेत. नावनाथांच्या कालखंडातील ही परंपरा होती.

ज्ञाननाथांनी पंथाचे कार्य पूर्वसंकेतानुसारच आळंदी येथे केले. मनाला वाटेल तसे नाही — तर शंकर, विष्णू व मच्छिंद्रनाथांच्या सामूहिक योजनेनुसार.

संपूर्ण पंथ योजना झाल्यावर भगवान शंकर म्हणाले: ‘‘मी गुरूंचा दास म्हणून निवृत्तीनाथ नावाने जन्म घेईन.’’

आणि विष्णूंनी सांगितले: ‘‘मी दासाचा दास होऊन ज्ञाननाथ नावाने जन्म घेईन आणि पंथाचे कार्य करीन.’’

हीच अखंड परंपरा निवृत्ती–ज्ञानेश्वरांपासून पुढे चालली.

ज्ञानेश्वरांनी या पंथाला पूर्ण कलाटणी दिली. म्हणजे एका व्यक्तीने नव्हे — तर ज्यांनी सृष्टी निर्माण केली, त्या विष्णूंनीच.

त्यांनी हटयोग सोडून पंथाला भक्तिमार्गाकडे आणले.

आज ज्ञानेश्वरांना लोक *वारकरी* मानतात, पण वास्तविक ते नाथपंथी योजनेचे पाचवे अवतार आहेत.

``ज्ञाननाथांपासून हा पंथ भक्तिमार्गानेच चालला आहे.``

कृष्णाने सांगितलेल्या गीतेवर भाष्य करून ज्ञानेश्वरांनी भक्तिमार्गाची स्थापना केली, आणि वारकरी पंथाची निर्मिती केली. ‘‘हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी’’ — या मंत्राने जनजागृती केली.

त्यांनी मानवता धर्म शिकविला. सत्य, त्रेता, द्वापार युगातील व्यवस्था वेगळी आणि कलियुगातील व्यवस्था वेगळी आहे — हे समजावून सांगितले.

ज्ञानेश्वरांनी शिकविलेली जीवनशैली

* अन्नदान, विद्यादान, वस्त्रदान, आरोग्यदानाचे महत्त्व * यज्ञसंस्कृती व तिचा पिंडावर परिणाम * देव–धर्म–आध्यात्म कसे करावे * योगविद्या, शरीररचना, भोग–योग–नियमन * विविध प्रकारचे गुरू — आणि सद्गुरूंचे महत्त्व * सत्कर्म, मन:शुद्धी, नित्यकर्म, प्रामाणिक जीवन

नवनाथांनी जे कृतीतून दाखविले, तेच ज्ञानेश्वरांनी सोप्या भाषेत जनमानसाला समजावले.

पंथाने पेहराव, वेशभूषा, भाषा, बाह्यांग बदलले, पण:

सिद्धता तीच, शक्ती तीच, दैवी सहाय्य तेच, कार्यपद्धती तीच.

नाथपंथ हा आजही सर्व पंथांचा गुरूस्थान आहे.

ज्ञानेश्वरांनी संपूर्ण आध्यात्म हटयोगापासून भक्तिमार्गाकडे वळवला. समाजाला अनुकूल असा बदल केला — कारण हा बदल ‘‘ज्यांनी पंथ निर्माण केला त्यांच्याच आदेशाने’’ झाला.

ब्रह्मांड निर्मिती ज्यांनी केली, तेच नाथपंथ चालवीत आहेत.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ/भगवान-विष्णू-यांचा-ज्ञाननाथ-अवतार.txt was सर्वात शेवटचा बदल: on 31-Jan-2026 (21:38)