श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भगवान शंकरानेच नाथपंथाचा प्रवाह बदलला

भगवान शंकर हे नाथपंथाच्या घडण कार्यातील एक प्रमुख घटक होते. त्यामुळे पंथाच्या पुढील कार्याची योजना पुन्हा भगवान शंकराचे पार्शद म्हणजेच निवृत्तीनाथांवर सोपविण्यात आली होती.

गहिनिनाथांनी अवतारी कार्य संपल्यानंतर सर्वच नावनाथांचा अवतारी कार्यकाल संपला होता. कलियुगाच्या अस्तंगत कार्य करण्यासाठी पंथरचनेप्रमाणे शंकराने मच्छिंद्रनाथांच्या शिष्याच्या शिष्याच्या शिष्य म्हणून निवृत्ती म्हणून पंथामध्ये पुढील जबाबदारी स्वीकारली होती.

भगवान विष्णुंनी मच्छिंद्रनाथांना म्हटले होते की ह्या पंथाचे महात्म्य लक्षांत घेऊन *मी स्वतः तुमच्या शिष्याच्या शिष्याच्या शिष्याचा दास होईल.* त्या निवृत्तीनाथांचा म्हणजेच भगवान शंकराचा दास म्हणून गुरू–शिष्य परंपरेत असलेल्या नाथपंथाच्या कार्याची जबाबदारी स्वीकारली.

भगवान विष्णू ज्ञाननाथ म्हणून अवतरले

ज्यावेळी भगवान कृष्णाने नाथपंथाची योजना केली होती, त्यावेळी पंथ योजना, पंथ शिस्त, गुरू–शिष्य प्रणाली, मानवजातीच्या उद्धारार्थ होणारे कार्य आणि युगरचनेला आळा घालण्यासाठी नाथांनी केलेली योजना — हे सर्व लक्षांत घेऊन भगवान शंकर पंथकार्याला पुढील दिशा देतील अशी योजना झाली होती.

*मच्छिंद्रनाथ → गोरक्षनाथ → गहिनीनाथ → निवृत्तीनाथ (भगवान शंकर)* अशी परंपरा तयार झाली.

गोरक्षनाथांनी गहिनीनाथांना सांगितले होते की — “निवृत्ती नावाचा मुलगा तुझ्यासमोर आला की, त्याला सर्वस्व देऊन टाक आणि समाधी घे.

वाघाच्या स्वरूपात गोरक्षनाथ आले व त्यांनी भगवान शंकरांना म्हणजेच निवृत्तीला गहिनीनाथांच्या गुहेपर्यंत नेले आणि स्वतः अलख निरंजन च्या घोषात दरीत विलीन झाले.

निवृत्तीनाथांचा उल्लेख

निवृत्तीनाथांनी म्हटले आहे:

आदिनाथ उमा बीज प्रकटले। मच्छिंद्रा लाधले सहजस्थिती॥ तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली। पूर्णकृपा केली गहिनीनाथा॥ वैराग्ये तापला सप्रेमे निवाला। ठेवा जो लाधला शांतिसुख॥ निद्वंद्व निःसंग विचारता मही। सुखानंद हृदयी स्थिर झाला॥ विरक्ताचे पात्र अन्वयाचे मुख। देऊनि सम्यक अनन्यता॥ निवृत्ती गहिनी कृपा केली असे पूर्ण। कूळ हे पावन कृष्ण नामे॥

या अभंगातून निवृत्तीनाथांनी कृष्णापासून निर्माण झालेल्या संपूर्ण नाथपंथाचा उल्लेख स्वतः केला आहे.

विठ्ठलपंतांचे देहत्यागाचे कारण

त्या काळच्या प्रज्ञावंतांनुसार विठ्ठलपंतांनी संन्यास धर्म सोडला होता म्हणून त्यांना व त्यांच्या कुटुंबाला समाजातून बहिष्कृत केले गेले. त्यांना अस्पृश्यासारखे वागविले जाई.

भूदेवांनी त्यांना प्रायश्चित्त म्हणून देहत्याग करण्यास सुचविले. मुलांची काळजी उरली नाही म्हणून निवृत्तीनाथांच्या आई–वडिलांनी जलसमाधी घेतली.

येथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे — विठ्ठलपंतांनी संन्यास धर्म गुरूंच्या आज्ञेने सोडला होता; परंतु त्या काळच्या धर्मनियमांमध्ये गुरूंपेक्षा भूदेवांचा निर्णय अंतिम मानला जाई.

निवृत्तीनाथांनी पंथाची दिशा ठरविली

निवृत्तीनाथ विठ्ठलपंतांचा ज्येष्ठ मुलगा. त्याला गहिनीनाथांसारखे सिद्ध गुरू लाभल्यामुळे विठ्ठलपंत निश्चिंत होते.

ज्ञानेश्वर हा धाकटा असला तरी त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याची आणि ईश्वरी अवताराची पूर्ण जाणीव निवृत्तीनाथांना होती.

ज्ञानेश्वर:

  • अत्यंत ज्ञानी
  • कर्तबगार
  • सोशिक
  • समाजमन जाणणारा
  • भक्तिभाव जागृत करणारा
  • लोककल्याणासाठी तत्पर

ह्या सर्व गुणांचा विचार करून नाथपंथाची पुढील जबाबदारी निवृत्तीनाथांनी ज्ञाननाथांवर सोपविली.

समाजातील अज्ञान दूर करण्याची गरज

विठ्ठलपंत व चारही भावंडांनी भोगलेल्या यातनांमधून त्यांना हे जाणवले:

  • समाजातील सद्भावना घसरत चालली आहे
  • प्रेमभाव, ईश्वरीभाव, परस्पर आदर कमी होत आहे
  • कर्माविषयी अज्ञान आहे
  • पाप–पुण्य विषयी संभ्रम आहे

म्हणून समाजाला नित्यकर्म, उपासना, भक्तिभाव आणि माणुसकी शिकविण्यासाठी ज्ञाननाथ हा एकमेव योग्य व्यक्ती असल्याचे निवृत्तीनाथांना पटले.

ज्ञाननाथांना दिलेली आज्ञा

कलियुगाचे महत्त्व लक्षात घेऊन भगवान कृष्णाने नाथपंथाची योजना केली. ज्ञाननाथ हे विष्णूचेच भागवत अवतार — हे निवृत्तीनाथांना ठाऊक होते.

गहिनीनाथांच्या अनुग्रहाने निवृत्तीनाथांचे जडत्व गेले होते आणि त्यांना त्यांचा स्वतःचा दिव्य जन्म ओळखता आला होता. त्यांनी:

  • पंथकार्याची दिशा बदलण्याची
  • भक्तिमार्गाकडे नेण्याची
  • समाजाभिमुख पद्धतीने रचना करण्याची
  • सर्व पंथांना गुरूस्थानी असल्याचे सिद्ध करण्याची
  • बदलत्या युगानुसार धोरण आखण्याची

आज्ञा ज्ञाननाथांना केली.

पंथाचा बदल — शंकराचा निर्णय

गहिनीनाथांपर्यंत असलेला हठयोगी पंथ आता स्वतः भगवान शंकरानेच बदलण्याचा निर्णय घेतला होता. निवृत्तीनाथांच्या आज्ञेवरून पंथकार्य भक्तिमार्गाकडे वळविण्यात आले.

हा बदल पुढे नेण्यासाठी ज्ञाननाथांशिवाय दुसरा कोणीही योग्य नाही.


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/निवृत्तीनाथ-ते-विश्वनाथ/भगवान-शंकरानेच-नाथपंथाचा-प्रवाह-बदलला.txt was सर्वात शेवटचा बदल: on 31-Jan-2026 (21:38)