श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

भेट दिलेली पृष्ठे: राशीप्रमाणे करावयाची दाने

राशीप्रमाणे करावयाची दाने

जीवनामध्ये दानाला खूप महत्त्व आहे, तरी दान हे सहजतेने केले जात नाही. परंतु आपल्याला कल्पना असल्यास योजनाबद्ध दान करता येऊ शकते. दान हे नेहमी सत्पात्री असावे.

सात्त्विक, सच्छील, नित्यनियमित कर्माचरण करणारा, वेदांची जोपासना करणारा, आपल्या संस्कृतीवर विश्वास असणारा ‘ब्राह्मण’ असावा. दानाची ही संकल्पना अतिप्राचीन आहे.

कोणत्याही व्यक्तीच्या किंवा दान घेणाऱ्याच्या इच्छेचा वा लोभाचा ह्या संकल्पनेशी तिळमात्र संबंध नाही. दानाच्या महत्त्वाला शास्त्राधार आहे.

राशीप्रमाणे दान

रास दानाचा प्रकार
मेष व वृश्चिक मसूरडाळ, गूळ, तांबे, निळे वस्त्र
वृषभ व तूळ ज्वारी, बाजरी, दूध, सुवर्ण, हिरवे वस्त्र
मिथुन व कन्या मूग, फळे, सुवर्ण, पिवळे वस्त्र
कर्क तांदूळ, साखर, रूपे, पांढरे वस्त्र
सिंह गहू, गूळ, तांबे, लाल वस्त्र
धनू व मीन हळद, मीठ, सुवर्ण, पिवळे वस्त्र
मकर व कुंभ तीळ, तेल, उडीद, लोखंड, काळे वस्त्र

ग्रहांचे वैशिष्ट्य व मानवी जीवन

प्रत्येक जीवावर ग्रहांचा स्वतःचा परिणाम असतो. ग्रह कोणत्या अंशावर व कोणत्या राशीला आहेत त्यानुसार स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि जीवनातील घटनांचे परिणाम दिसून येतात.

१) रवी (सूर्य)

  • * ग्रहमालिकेचा राजा
  • * मान–मरातब, द्वेष, अधिकार, पराक्रम, कीर्ती
  • * निर्भयता, प्रामाणिकपणा, न्याय्य वृत्ती

उपाय: रवी अनिष्ट असल्यास —

  • - रवीचा जप
  • - ११ रविवारी दुपारी १२–१ दरम्यान दहीभात ओवाळणे
  • - पिंपळ/वडाच्या झाडाखाली ठेवणे
  • - वजनाएवढा गहू वेदपठणस्थळी अर्पण करणे

२) चंद्र

  • * मनाचा कारक
  • * मानसिक ताणतणाव, जलप्रवास, उदर, स्तन, मेंदू
  • * ऐश्वर्य, सुगंध, संपत्ती

उपाय:

  • - चंद्र जप
  • - लघुरुद्र
  • - वजनाएवढा तांदूळ दान

३) मंगळ

  • * लहान भावंडांचे सुख-दुःख
  • * युद्ध, धरणीकंप, अग्निप्रलय
  • * फौजदारी प्रकरणे, तुरुंगवास
  • * रक्तस्राव, मूत्राशय, साथीचे रोग

उपाय:

  • - मंगळ जप
  • - सप्तशती पठण
  • - वजनाएवढा गूळ दान
  • - मंगळवार उपवास
  • - गणपती उपासना

४) बुध

  • * बुद्धिमत्ता, लेखन, गणित, न्याय
  • * मज्जातंतू, फुफ्फुसे, जीभ

उपाय:

  • - बुध जप
  • - निळ्या वस्तूंचे दान
  • - वजनाएवढा मूग दान
  • - बुधवार उपवास
  • - कृष्ण उपासना

५) गुरू

  • * आनंद, समाधान, वेदान्त, ज्ञान
  • * यश, कीर्ती, शांती
  • * कावीळ, मधुमेह, रक्तदाब

उपाय:

  • - गुरू जप
  • - पिवळ्या वस्तूंचे दान
  • - वजनाएवढी हरभराडाळ अर्पण
  • - गुरुवार उपवास
  • - दत्त आराधना

६) शुक्र

  • * स्त्री, विलास, सौंदर्य, कलावंत
  • * वाहनसौख्य, अमली पदार्थ, उधळपट्टी
  • * वीर्यविकार, मासिक पाळी

उपाय:

  • - शुक्र जप
  • - पांढऱ्या वस्तूंचे दान
  • - वजनाएवढा तांदूळ
  • - शुक्रवार उपवास
  • - देवी उपासना

७) शनी

  • * व्यवहारदक्षता, गंभीरता, चिकाटी
  • * वकील, वैज्ञानिक, गणित, गूढविद्या
  • * सांधेदुखी, दमा, अर्धांगवायू, हृदयविकार

उपाय:

  • - शनी जप
  • - काळ्या वस्तूंचे दान
  • - वजनाएवढा उडीद/तेल
  • - शनिवार उपवास
  • - पंचमुखी हनुमान उपासना

८) राहू

  • * ग्रह नव्हे, छेदनबिंदू
  • * विषारी प्राणी, अघोरी विद्या
  • * स्मृतिनाश, अंधत्व, नैराश्य, भूतबाधा

उपाय:

  • - राहू जप
  • - वजनाएवढे सप्तधान्य दान
  • - पंचमुखी हनुमान उपासना
  • - लघुरुद्र

९) केतू

  • सूक्ष्म, रहस्यमय परिणाम
  • पंगुत्व, विषप्रयोग, आत्महत्या, वेडेपणा

उपाय:

  • - केतू जप
  • - सप्तधान्य दान
  • - पंचमुखी हनुमान उपासना
  • - लघुरुद्र


समस्या-आणि-समाधान/जोतिष-शास्त्र/राशीप्रमाणे-करावयाची-दाने.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)