English: Read this page in English
नक्षत्रांचे महत्त्व
नक्षत्रांना अतिशय जास्त महत्त्व आहे. जन्मवेळेनुसार नक्षत्र प्रथम कळते. नक्षत्र कळल्यानंतरच ग्रहांची मांडणी केली जाते. म्हणजे सर्व गोष्टींचे मूळ नक्षत्र आहे.
ज्या नक्षत्रावर माणूस जन्माला येतो त्या नक्षत्राला खूप महत्त्व आहे. पंचांगामध्ये नक्षत्रावरून त्या जीवाची योनी कोणती आहे ते समजते. एकूण १४ योनी आहेत आणि प्रत्येक योनीचे स्वतःचे गुणधर्म आहेत.
प्रत्येक नक्षत्राला चार चरण असतात. त्या चरणांवरून जीवनातील त्रास, योग, आणि विविध परिणाम दिसतात. जन्मपत्रिकेपूर्वी जन्म नक्षत्रावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
२७ नक्षत्रांचे गुणविशेष
अश्विनी
- - घोड्याच्या डोक्यासारखा आकार
- - बौद्धिक, चपळ, नेतृत्वगुण, उष्ण प्रकृती
भरणी
- - योनीसारखा आकार
- - स्वार्थी, परावलंबी, स्थित्यंतरदर्शक
कृत्तिका
- - तीक्ष्ण हत्यारासारखा आकार
- - चिडखोर, उग्र, साहसी, अपघातकारक
रोहिणी
- - चार पाकळ्यांच्या फुलासारखा
- - आकर्षक, कलाप्रिय, भौतिकवादी
मृगशीर्ष
- - हरणाच्या शिंगासारखा
- - वृषभात सामान्य, मिथुनात बौद्धिक व भोगप्रधान
आर्द्रा
- - हिर्यासारखी किंवा पावसाच्या थेंबासारखी
- - उग्र, चंचल, संशयी, त्रासातून उन्नती
पुनर्वसू
- - पुन्हा चांगले होणे दर्शविते
- - सत्त्वगुणी, सर्जनशील, कलाप्रेमी
पुष्य
- - कमळ किंवा नारळासारखे
- - परोपकारी, प्रसिद्ध, ईश्वरभक्त
आश्लेषा
- - गुंतलेल्या साखळीसारखी
- - बुद्धिमान पण दुष्टगुणी, हट्टी, गुप्त
मघा
- - मुकुटासारखा आकार
- - स्वाभिमानी, जबरदस्त, कर्तृत्ववान
पूर्वाफाल्गुनी
- - आनंद, आल्हाद द्योतक
- - भोगप्रिय, धनलालसा, कलाभिरुची
उत्तराफाल्गुनी
- - तेजस्वी
- - विद्वत्ता, नम्रता, धार्मिक प्रवृत्ती
हस्त
- - हाताच्या आकाराचा
- - हस्तकला, वक्तृत्व, शांत स्वभाव
चित्रा
- - हिरा/तारा
- - कलावंत, सौंदर्यप्रिय, गणिती
स्वाती
- - तलवारीसारखा आकार
- - लवचिक, धूर्त, सामंजस्यप्रिय
विशाखा
- - ध्येयवादी पण अपूर्णता
- - लोभी, घातक, कठोर
अनुराधा
- - विचारशील, प्रवासप्रिय
- - गोड बोलणारे, सांसारिक
ज्येष्ठा
- - तीन रेघा — भूत-वर्तमान-भविष्य
- - खुनशी, हट्टी, सूडप्रिय
मूळ
- - मुळाशी जाणारी प्रवृत्ती
- - महत्त्वाकांक्षी, तेजस्वी, अपघातयोग
पूर्वाषाढा
- - आनंदी, उत्साही
- - संथ, संपन्न
उत्तराषाढा
- - सत्यप्रिय, इच्छाशक्तीवान
- - धार्मिक, नम्र
श्रवण
- - सदाचारी, ईश्वरभक्त, विद्वान
धनिष्ठा
- - दुष्टगुणी, शूर, अविचारी
शततारका
- - धूर्त, व्यसनी, विषयप्रधान
पूर्वाभाद्रपदा
- - विद्वान, शोधक, चतुर
उत्तराभाद्रपदा
- - अस्थिर पण विद्वान
रेवती
- - धनवान, बुद्धिवान, निःस्वार्थी
नक्षत्र योनी (१४ प्रकार)
- घोडा – शौर्य, कार्यतत्परता
- कुत्रा – स्वामिनिष्ठ
- मांजर – एकलकोंडे, स्वार्थी
- सर्प – सूडप्रिय
- हत्ती – उदार, दीर्घद्वेषी
- हरिण – कुटुंबवत्सल
- वानर – खोडकर, भटके
- वाघ – साहसी, क्रूर
- सिंह – अधिकारप्रिय
- गाय – ममताळू, स्वच्छ
- मेंढा – अविचारी
- म्हैस – आळशी
- उंदीर – भेकड, विध्वंसक
- मुंगूस – चपळ, भित्रे
त्रासदायक नक्षत्रांचे परिणाम
अश्विनी
- 1. वडिलांना त्रास
- 2. बालक ऐश्वर्यवान
- 3. उच्च पद
- 4. राजसन्मान
आश्लेषा
- 1. बालकाला शुभ
- 2. धनहानी
- 3. आई/सासूस त्रास
- 4. वडिलांना त्रास
मघा
- 1. आईस दु:ख
- 2. वडिलांना दु:ख
- 3. सुखसमृद्धी
- 4. शुभफलदायी
ज्येष्ठा
- 1. मोठ्या भावास त्रास
- 2. लहान भावास त्रास
- 3. आईस दु:ख
- 4. आत्मघात, कष्ट
मूळ
- 1. वडील/सासऱ्यांना दु:ख
- 2. आईस दु:ख
- 3. धनहानी
- 4. बालकास शुभ
रेवती
- 1. पराक्रम वाढ
- 2. राज्यसुख
- 3. बालक सुखी
- 4. आर्थिक–मानसिक त्रास
नक्षत्र दोष कमी करण्यासाठी उपाय
- आपल्या जन्मनक्षत्राचा मंत्र जपणे आवश्यक.
- मंत्रसंख्या, उपासना पद्धती — *हा खेळ प्राक्तनाचा की पूर्वसंचितांचा* पुस्तक पहावे.
- नक्षत्राची योग्य उपासना केल्यास जीवनातील दुष्परिणाम कमी किंवा नष्ट होतात.