रामबाबांना नरेन्द्रनाथांनी प्रत्यक्ष देवदर्शन करवले
रामबाबा कोण आहेत हे आधीच्या लेखात स्पष्ट केले आहे आम्ही गंगोत्रीला पोहोचल्यावर तेथे मुक्काम केला व दुसर्या दिवशी गोमुखला जाण्याचे ठरविले. पुढील वाट अतिशय अवघड होती. गंगोत्रीपासून तेरा किलोमीटर गोमुख होते. घोडे ठरवून पुढील प्रवास सुरू झाला. गोमुखचा मार्ग अतिशय कठीण आहे. तिथे गेल्यावर जीवनाचा मोह अधिक होतो कारण समोर मृत्यूच दिसत असतो. पाच-दहा फुटांची वाट आहे. एका बाजूने मोठमोठे उंच डोंगर आहे तर दुसर्या बाजूने खोल दरीत भयावह खळाळून वाहणारी गंगा आहे. याच रस्त्याहून घोडे, माणसे, पालखी, कंडी यांचे जाणे-येणे आहे. तसेच पहाडावर खेळणारे जंगली सांबर असतात. त्यांच्या खेळण्यात वरुन मोठमोठे दगड खाली घसरतात. तसेच वातावरणामुळे सुद्धा दरड कोसळण्याची भीती सततच असते. तेथील घोडे हे डोंगराच्या बाजूने न चालता दरीच्या काठावरून किंवा जवळून चालत असतात. त्यामुळे घोड्यावर बसण्याची सुद्धा भीती वाटते. पायी चालण्याचा मार्गही अवघड आहे. वेडीवाकडी चढती उतरती कठीण वळणे त्यामुळे पायाला गोळे येतात. असा अवघड प्रवास वयाच्या 65 व्या वर्षी नरेन्द्रनाथ करीत होते.
भोजबासा येथे अडचण आणि साधूची मदत
सकाळी 10 वाजता गोमुखाकडे जाण्यास सुरुवात केली. होता होता संध्याकाळी 5 वाजता गोमुखाच्या अलीकडे असणार्या भोजभासा या ठिकाणी येऊन पोहोचले. त्याठिकाणी ‘उत्तरांचल प्रवासी निगम’ची (ओटीडीसी) राहण्याची व्यवस्था होती. त्या ठिकाणी खूप गर्दी असल्यामुळे राहण्यास खोल्या उपलब्ध नव्हत्या. त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी राहण्याची दुसरी व्यवस्था नाही. त्या ठिकाणांहून परत जायचे ठरवले तरीही गंगोत्रीला त्याच दिवशी दिवसा परत जाता येत नाही. दहा अंश सेल्शीयसच्या खाली तापमान होते. रात्रीच्या वेळी हिम वर्षाव होतो. आता कोठे रहायचे व काय करायचे हा मोठा प्रश्न सर्वांसमोर होता. त्यावेळी प्रयत्नांनी व परमेश्वराच्या कृपेने तेथील एका साधूने स्वतः येऊन तेथील अंथरूण पांघरूण व इतर सामान ठेवण्याच्या स्टोअररूमध्ये राहण्याची व्यवस्था केली.
सायं उपासना आणि गंगेचे संकेत
फ्रेश होऊन गंगेच्या काठावर सायं उपासना करण्याचे ठरले व प्रत्येकजण वेगवेगळ्या खडकावर बसून उपासना सुरू झाली. त्यावेळी दुरून एका झोपडीजवळ उभा असणारा एक साधू हे सर्व पाहत होता. उपासनेच्या मध्यात असे लक्षात आले की वाहत्या पाण्याच्या प्रवाहात बदल होत आहे आणि त्यावेळी एकाएकी पाणी उडाले आणि वेगवेगळ्या खडकावर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्याला आणि डोक्यावर पडले. हे पाहून तो साधू विस्मयचकीत झाला. त्या क्षणी कोणार्क येथील समुद्राच्या लाटेप्रमाणेच येथील गंगेच्या पाण्याने स्पर्श केला, परंतु येथे बर्फाचे पाणी असल्याने नरेन्द्रनाथांनी प्रार्थना केली की जर आम्ही पूर्ण ओले झालो तर आम्ही थंडीमुळे जीवंतच राहणार नाही. त्यामुळे गंगेचे पाणी फक्त डोक्यावर आणि डोळ्यावर पडले. हे संकेत आणि कृपाशीर्वाद होते.
स्टोअररूममधील रात्र आणि रामबाबाची उपस्थिती
त्या दिवशी तापमान अत्यंत कमी होते. थंडी प्रचंड वाढली होती, चार-चार कपडे घातले तरीही थंडी जात नव्हती. पण देवकृपेने मिळालेली खोली अतिशय गरम होती. रजई आणि गाद्या भरपूर होत्या. थोड्या वेळाने तो साधू खोलीत आला व म्हणाला — ‘महाराजजी हम लाल बाबा के शिष्य राम बाबा है।’ तो सांगू लागला की 45 वर्षे तो गोमुखात राहतो, आठ महिने येथे कोणालाही राहण्याची परवानगी नसते तेव्हा तो गुफेत राहतो, आणि पूर्वी देवता येथे उपस्थित असत. मानवांची ये-जा वाढल्यावर देवतांनी नंदनवन येथे स्थान केले. अनेक वर्षे त्यांना देवदर्शन झाले नव्हते. रामबाबा म्हणाले की — ‘हम आपके साथ गोमुख आएंगे और हमें हमारे गुरूं और सभी देवतायें आपकी कृपा से दर्शन देंगे।’ नरेन्द्रनाथांनी त्याला टाळण्यासाठी — ‘हम शहरी लोग है… पत्नी और स्त्री मोह बहुत है…’ असे म्हणून थोडासा भ्रम निर्माण केला. त्यावर रामबाबा — ‘हमने आपको पहचान लिया है… आप नाथ पंथसे है…’ नरेन्द्रनाथ म्हणाले — ‘सुबह पाँच बजे निकलेंगे।’ रामबाबा — ‘हम चार बजेसेही तैयार रहेंगे।’
मध्यरात्रीचा प्रसंग — गंगा तुलसी
अर्ध्या रात्री सर्वांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवला. बाहेर येताच रामबाबा हातात ‘गंगा तुलसी’ घेऊन उभा होता. तो म्हणाला — ‘यह ऑक्सिजनका काम करती है… इसे रजईके अंदर लगाईये।’ आणि खरोखरच सर्वांना गाढ झोप लागली.
गोमुखाच्या वाटेवरचा चमत्कार
सकाळी रामबाबा 4 वाजल्यापासून दारात बसलेले होते. घोडेवाल्याने सांगितले की घोडे पळून गेले, पण रामबाबाने लगेच व्यवस्था केली. भोजबासापासून गोमुख तीन किलोमीटर. रामबाबा पायी चालत होता, पण आम्ही पोहोचेपर्यंत तो अर्धा तास आधीच गोमुखात पोहोचला होता.
देवदर्शन प्राप्त झालेला क्षण
काही अंतर चालल्यावर एका मोठ्या खडकावर सर्वजण उपासनेला बसले. नरेन्द्रनाथांच्या मागे मांडी घालून रामबाबा बसले होते. उपासना संपताच रामबाबा उठले, नरेन्द्रनाथांच्या पायावर डोके ठेवून साष्टांग नमस्कार करून म्हणाले — ‘चालीस साल पहले महादेव, गणेशजी, दुर्गामाता आदी सभी देवताओंके दर्शन हुए थे वैसेही आज हमे सारे देवतायोंके प्रत्यक्ष दर्शन हुवे।’
‘आपके साथ आए तो हमे दर्शन हुवा। हमारे गुरुजीने आपके मध्यमसे देवताओका प्रत्यक्ष दर्शन करवाया।’ असे म्हणून नमस्कार करून आम्ही सर्वजण परत राहण्याच्या ठिकाणी आलो.