श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

वैदिक उपचार केंद्र

नाथशक्तिपीठाच्या कार्याचा एक भाग म्हणून नाथशक्तिपीठात नरेंद्रनाथ महाराजांनी अनेक विधानांची (procedure) निर्मिती केली आहे. ठराविक विधानांचे आचरण त्यांच्या नियमांनुसार केल्यास अविश्वसनीय गोष्टी घडताना येथे नेहमीच पाहायला मिळतात व त्यांची तेथे सांख्यिकी पद्धतीने नोंद ठेवण्यात येते.

या विधानांचा उपयोग धर्म, जात–पात यासारख्या कोणत्याही मानवनिर्मित बंधनांचा विचार न करता करण्यात येतो. या विधानांच्या आचरणामुळे आज अनेकांना आपले मनःस्वास्थ्य परत लाभले आहे. नैराश्यामुळे जीवाचा अंत करु पाहणारे अनेक लोक आज स्वतःच्या पायावर समर्थपणे उभे राहून इतरांनाही मार्गदर्शन करताना दिसतात.

जीवनात येणाऱ्या अडचणी, होणारे आघात, अपयश, दुर्धर रोग, यातना—यांच्यावर मात कशी करावी, यासंबंधीचे मार्गदर्शन येथे मिळते. नाथशक्तिपीठाद्वारे पुरस्कृत विधानांचे आचरण करणाऱ्यांमध्ये साधारणतः आत्मविश्वास वाढणे, नैराश्य जाणे, क्रूरता कमी होणे, कर्तव्यतत्पर व जवाबदार होणे इत्यादी सकारात्मक बदल लगेचच जाणवू लागतात.

सृष्टीचा नियम आहे की आपण जसे कर्म करतो तसेच फळ मिळते. नाथशक्तिपीठातून होणाऱ्या कार्याला या सत्याचेही पाठबळ लाभले आहे आणि म्हणूनच येथून होणाऱ्या प्रयोगांमधील यशोप्राप्ती गुणोत्तर नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक दिसून येते.