प्रार्थना संग्रह
जय जय सुखसदया गुरुराया वंदिते तव चरणा।तव चरणांशी येता देवा संपती भवाच्या विवंचना।चित्तास मिळते समाधान स्वामी,तव मूर्ती सुख देई नयना।श्रीनाथा तव चरण अमूल्य ठेवा, शाश्वत आनंद देई जीवना।।🙏🏻🙏🏻
मावळता सूर्य विचार देऊन जातो, उगवता स्फूर्ती देतो. दृष्य अदृष्य स्वरुपात शक्ती सदैव कार्यरत असते. आपण त्याच्या कडे कसे पाहतो तसे आपल्याला भासते. खर ज्ञान व्हायला अंधारातून जावेच लागते. 🙏🏻🙏🏻
आम्ही मूढ बुद्धी आम्हास सद्बुद्धी देई। हीनदीन आम्ही आम्हास पावन करुनि घेई। तूच गुरुराया अमुचा उद्धार कर्ता। तुझ्याविण आमुच्या जीवनास नसेच पूर्णता।।🙏🏻🙏🏻
कृपासगर तूच नाथा,निर्मळ करी मजसी।तुझ्याच कृपेची किमया नाथा निश्चल जीव जगतो अहर्निशी।तव कृपेने जिवास नाथा कळले नश्वराचे मायाजाल।शाश्वत तव सहवासाची जीवास सदा लागू दे ओढ।।🙏🏻🙏🏻
तुजविण गुरुराया कोणी ना शाश्वत संगी जीवाचे।तूच सुसह्य करीशी नाथा दूषित प्रारब्ध भोगणे भवाचे।प्रेरित करिसी स्वामी सत्कर्माची कास धरण्या पामरासी।निर्मळ करीत जासी जीवा आत्मोन्नत्ती करून मुक्त करण्या जिवासी।।🙏🏻🙏🏻
अळविते तुज नाथा,सदा लाभू दे तव सत्संग।तव संगानेच स्वामी होऊ दे जीवाचा मोहभंग।शाश्वत सत्य नाथा तव कृपेनेच कळले।तव संगानेच समर्था तन-मन भक्ती मार्गाकडे वळले।।🙏🏻🙏🏻
कल्याण करी गुरुराया माझे कल्याण करी गुरुराया।भवतापाच्या तापे तापलो तूच दे शीतलता प्रभुराया।मायेच्या व्यापाने व्यापलो त्यातून काढी मजसी अगाध स्वामी तव किमया।येई येई धावत बारे व्याकुळतेने अळविते तुज तव तनया।।🙏🏻🙏🏻
वाटेवरती तव गुरुराया मनास वायूचा वेग आला।कधी नयनांना दिसेल तव मूर्ती हाच ध्यास मानसी जडला।देई बा झडकरी दर्शन जीव पामराचा व्याकुळ झाला।तव संग मायेचा पदर नाथा तव संगाचा ध्यास जीवास जडला।।🙏🏻🙏🏻
गहन असती कर्माची गती,तयास स्वामी तूच ।तूच सांगसी सत्कर्म कराया,त्याची गोडी तूच लाविसी।प्रारब्ध लिखित दुःखही स्वामी तव कृपेने सुसह्य होती।सत्कर्म जीव घडऊनी नाथा जीवास मुक्तीचा मार्गदाखविसी।।🙏🏻🙏🏻
शरणागत तुजसी नाथा,आधार तूच अमुचा। तुजवाचूनी कोण दाखविल मार्ग जिवाच्या उन्नतीचा। मंतु घालून पोटी धरीसी जीवास हृदयी,माऊली होऊनि नाथा संभाळ करिसी जीवाचा। तव कृपेचीच किमया जीव जगतो निःशंक, होऊनि संगी नाथा संभाळ करिसी जीवाचा।।🙏🏻🙏🏻
नाथा तव चरणी शरण येता, धरीशी छत्र शिरी,देसी बुडत्यासी हात। राहसी उभा तू पाठी संकटात भक्तांच्या, दृश्य अदृश्य रूपे स्वामी देशी जीवास साथ। भय व्याकुळ जीव होता देशी अभय तूच नाथा,बळ देऊनी जीवाला दाखविसी मुक्तीचे द्वार। तव महिमा अगम्य नाथा,अगाध तव कृपा,आत्म्यास उन्नत करुनि देशी जीवास शाश्वत आधार।।🙏🏻🙏🏻
अक्षय तव कृपा गुरुराया, अक्षय तव संग। अक्षय राहो भक्ती माझी,श्रद्धा राहो अभंग। माया सारी विरून जाओ,राहावा भक्तीचाच चंदनी गंध। अक्षय राहावा मम जीवनी श्रीनाथा तव सत्संगाचा सुगंध।।🙏🏻🙏🏻
जननी जीवनी तूच नाथा,तूच दाखविशी मार्ग। तूच होऊनि पिता जीवाचा मायेने धरीशी हात। होऊनि बंधू राखीशी स्वामी जगति जीवाची लाज। शरणागत तव चरणी होता श्रीनाथा देसी पामर जीवनास अर्थ।।🙏🏻🙏🏻
तूचि दिनकर,दिनमणी,तव तेजाने उजळू दे तमस सारा। उजळुनी दाही दिशा गुरुराया, तव कृपेचा वाहू दे वारा। तव कृपेच्या संजीवणीने प्रभू,दूर होऊ दे विकार सारे। प्रार्थना तव चरणी श्रीनाथा तव कृपेने निरामय होऊ दे जन हे सारे।।🙏🏻🙏🏻
तव चरणांची सेवा घडावी हीच आस सदा मनी वसते। तव सत्संगाचा लाभ मज व्हावा हीच तुजपाशी प्रार्थना करिते। तव आधार आम्हासी स्वामी आनंदाने जगण्यास शिकविते। तव कृपेची किमयाच ही नाथा, खरे मर्म जीवनाचे कळते।।🙏🏻🙏🏻
नाम तुझे घेता स्वामी मिळे चित्तास आनंद। तव सहवास गुरुराया जणू शीतल चंदनाचा गंध। शाश्वताचे देणे नाथा दिधलेस तू पामर जीवाला। श्रीनाथा तुजसी ध्याता , जन्म जन्मीचे दूषित प्रारब्ध भोगण्याचे बळ येते जीवाला।।🙏🏻🙏🏻
नाथ नाम जपता वैखरीने,आनंदित होई अवघे जगणे। नाथांच्या चरणी होता लीन, नाथ देती शाश्वत सुखाचे देणे। श्रीनाथ असे चैतन्याची खान,ब्रम्हांडाचे नाथ संजीवन। सदा करावा नाथांचा संग, समर्पित होऊनि व्हावे नाथ चरणी लीन।।🙏🏻🙏🏻
गुरुराया तव चरणांची माया जडू दे मजसी जन्मोजन्मी। वाणी माझी सदा रंगू दे श्रीनाथा तुझीया नामी। जन्म मिळाला पुनरपि तरी नाथा,तुझ्या सेवेतच तो जन्म जावा। याचना माझी तव चरणांशी स्वामी,मम शिरी सदा तव वरद हस्त असावा।।🙏🏻🙏🏻
वंदिते तव चरण नाथा, कृपादृष्टी ठेवी। तव आधारेच स्वामी जीवाची आत्मोन्नत्ती होई। अवतीभोवतीचे पाश मोहाचे बांधीती जिवासी। पाश तोडून मायेचे सारे मुक्ती दे श्रीनाथा या पमरासी।।🙏🏻🙏🏻
चालविता धनी तूच गुरुनाथा। तव चरणी आम्ही ठेवितो माथा। शरणागत स्वामी तव चरणांशी येता। भार संभाळीशी पामर जीवाचा घडवीशी जीवा सत्संगि अनंत।।🙏🏻🙏🏻
अक्षय तव कृपा गुरुराया, अक्षय तव संग। अक्षय राहो भक्ती माझी,श्रद्धा राहो अभंग। माया सारी विरून जाओ,राहावा भक्तीचाच चंदनी गंध। अक्षय राहावा मम जीवनी श्रीनाथा तव सत्संगाचा सुगंध।।🙏🏻🙏🏻