वायुतत्त्वाच्या राशींबद्दल विचार
११२ लेखांमध्ये मी आपल्याला माहिती दिली होती की भूमी, आप, तेज आणि वायू या चार महातत्त्वामध्ये बारा राशी विभागल्या गेल्या आहेत. त्या अशा राशींप्रमाणे उपासना व उपाययोजना ठरतात.
सृष्टीवरील सर्व मानवजात ही बारा राशींत विभागली आहे. ह्या बारा राशी चार तत्त्वांमध्ये कशा विभाजल्या आहेत हे आपण पाहिले आहे:
- भूमितत्त्व: वृषभ, मकर, कन्या
- जलतत्त्व: मीन, वृश्चिक, कर्क
- अग्नितत्त्व: मेष, सिंह, धनू
- वायुतत्त्व: मिथुन, तूळ, कुंभ
आज आपण वायुतत्त्वाच्या राशींबद्दल विचार करू.
वायुतत्त्व व कलियुग
कलियुगामध्ये प्रभावी असलेल्या वायुतत्त्वाचा निजगुण समता आहे. मिथुन, तूळ, कुंभ — या तिन्ही राशींनी उत्तर दिशेकडे तोंड करून उपासना करावी.
जीवनातील सर्व महत्त्वाची कामेही उत्तर दिशेपासून सुरू करावीत. या लोकांची भरभराटीची दिशा = उत्तर.
उपासनेसाठी दिशा, चंद्र-सूर्यनाडी
सर्व अभ्यास, ज्ञानसाधना, प्रयत्न हे उत्तर दिशेकडून करावेत. वायुतत्त्वाचे निजतत्त्व *दया* असल्याने या दिशेकडून प्राप्त होणारी ऊर्जा अधिक फलदायी असते.
महिन्याचा वद्य पक्ष (दुसरे १५ दिवस) हा या लोकांसाठी अधिक शुभ.
उपासनेची वेळ
दिवसाचे चार प्रहर असतात. ह्या राशींसाठी प्रभावी प्रहर:
- सकाळी ७:३० ते दुपारी १२:५० → उपासनेची सर्वाधिक फलदायी वेळ
या वेळेत केलेल्या योजनांना यश मिळते.
नाडी — सूर्यनाडीचा प्रभाव
माणसाकडे दोन नाकपुड्या असतात:
- डावी → चंद्रनाडी
- उजवी → सूर्यनाडी
वायुतत्त्वाच्या लोकांसाठी सूर्यनाडी सुरू असताना केलेला प्रत्येक व्यवहार, साधना व काम अधिक अनुकूल ठरते.
जर सूर्यनाडी सुरू नसेल तर:
- डावी नाकपुडी हलकेच बंद करून उजवी (सूर्यनाडी) सक्रिय करावी.
वायुतत्त्वाच्या राशींची वासना
या राशींची वासना कानांत (श्रवणात) असते. त्यांनी दयाभाव, त्यागबुद्धी, भावनिक प्रवृत्ती यावर संयम ठेवणे आवश्यक आहे.
वाद टाळून मौन पाळावे.
उपासना — शंकर व हनुमान
मिथुन, तूळ, कुंभ राशींनी खालील उपासना रोज करावी:
१) ॐ नम: शिवाय २) ॐ नमो भगवते पंचवदनाय ऊर्ध्वदिशे हयग्रीवमुखाय ॐ श्रीवीरहनुमते ॐ रूं रूं रूं रूं रूं रूद्रमूर्तये सकल लोकवशीकरणाय वेदविद्यास्वरूपिणे हुं फट स्वाहा ।
१०८ वेळा जप करणे आवश्यक.
उपासना करावी:
- सकाळी ७:३० — दुपारी १२:५०
- उत्तर दिशेकडे तोंड करून
जीवनातील धर्मस्थळांचा प्रभाव
केदारनाथ धामास एकदा तरी भेट देणे अत्यंत फायद्याचे. धर्मधामांची ऊर्जा राशीनुसार अधिक प्रभावी होते.
युगपुरुषांचा प्रभाव
शंकर आणि हनुमान हे वायुतत्त्वाशी निगडित देवअवतार. त्यांचे तत्त्वज्ञान व उपदेश वायुतत्त्वाच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल.
दासबोध, तुकाराम गाथा — वाचनासाठी उत्तम.
स्वभाव व वर्ण
वायुतत्त्वाच्या राशींचे लोक:
- समतागुणी
- सेवाभावी
- शांत
- व्यवहारतज्ज्ञ
हे अनेकदा शूद्र वर्णाशी संबंधित मानले जातात.
प्रत्येक राशीचा स्वतंत्र विचार
मिथुन रास
स्वामी ग्रह: बुध वस्ती: आघाडा झाडाखाली
जप (१०८ वेळा):
- ॐ ऐं श्रीं स्त्रीं बुधाय नम:
- ॐ सौम्यरूपाय विद्महे | चंद्रसुताय धीमहि | तन्नो बुध: प्रचोदयात्
- ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:
दिशा: दक्षिणेकडे वेळ: पहाटे ४–६
तूळ रास
स्वामी ग्रह: शुक्र वस्ती: पिंपळ
जप:
- ॐ र्हीं श्रीं शुक्राय नम:
- ॐ भृगुसुताय विद्महे | दिव्यदेहाय धीमहि | तन्नो शुक्र: प्रचोदयात्
- ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:
दिशा: उत्तर वेळ: पहाटे ३–६
कुंभ रास
स्वामी ग्रह: शनी वस्ती: शमीचे झाड
जप:
- ॐ ऐं र्हीं श्रीं शनैश्चराय नम:
- ॐ रविनंदनाय विद्महे | दीर्घदेहाय धीमहि | तन्नो शनि: प्रचोदयात्
- ॐ खां खीं खूं स: शनैश्चराय नम:
दिशा: दक्षिण वेळ: सूर्यास्त ते सूर्योदय
सारांश
- उपासना: सकाळी ७:३० ते १२:५०
- दिशा: उत्तर
- देवता: शंकर, हनुमान, स्वतःची आराध्य देवता
- महत्वाची कामे: सूर्यनाडीवर
- शुभ पक्ष: वद्य पंधरवडा
- यात्रा: केदारनाथ
अधिक शास्त्रीय माहिती नाथशक्तिपीठात व “हा खेळ प्राक्तनचा की पूर्वसंचितांचा” या ग्रंथात उपलब्ध.