परिषदेचे चित्तवेधक सत्र
। अस्माकं देवा उभयाय जन्मने शर्म यच्छत द्विपदे चतुष्पदे। । अदत् पिबद् उर्जयमानं आशितं तद् अस्मे शंयोः अरपो दधातन। । ॠग्वेदातील (१०_३७_११) ही ॠचा म्हणते की, “सूर्योपासना आम्हा सर्व मित्र, आप्त, तसेच सरपटणारे, तसेच पक्षांना उर्जा आणि शक्ति प्रदान करते तसेच आरोग्य आणि धन संपदेसोबतच आम्हाला शहाणपणही देते.
वैश्विक परिषदेचा विषयः १ मानवी जीवनावरील प्रभाव —शिक्षण, अन्न, ज्योतिष, सुदृढ प्रकृती, दीर्घारायुरारोग्य, इत्यादींचे संदर्भात 'सूर्योपासनेचा प्रभाव'.
२ मानवाच्या कार्यक्षमतेवर प्रभाव: —मानवी कार्यक्षमता, त्याची क्षमता, उत्तरदायित्व, इच्छा, चारित्र्य निर्माण, स्वतःच्या प्रकृती मधिल दोष निर्मूलन, व्यक्तिमत्वाचा सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक जीवनावर तसेच कार्यपध्दतीवर पडणारा प्रभाव तसेच सभोवतालच्या पर्यावरणावर व कार्यक्षेत्रावर होणारा परिणाम.
कृपया हे लक्षात घ्या की, 'सौर उर्जा उपककरणे आदी' हा या वैश्विक परिषदेचा विषय नाही.