श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

माहुरगडावर नाथपंथिय हवन

या देवी सर्वभूतेषु बुद्धि रुपेण संस्थित: | या देवी सर्वभूतेषु बुद्धि रुपेण संस्थित: | नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||

सप्तशतीचा हा श्लोक अनेकांना मुखोद्गत आहे सप्तशती वाचतांना भरभर हा वाचलाही जातो याबद्दल कोणी काही सांगण्याचा प्रयत्न केला तर हे आम्हाला माहित आहे असेच ऐकायला मिळते नुकतेच आम्ही माहूर गडावर देवीच्या समोर तीन दिवस प्रत्यक्षपणे अखंड हवन केले. हे हवन नाथ शक्तीपीठाने सर्वांच्याच कल्याणासाठी, सर्वांमध्ये भक्तिभाव निर्माण होण्यासाठी, ज्याप्रमाणे सत्य युगामध्ये लोक सज्जन होते त्याप्रमाणे कलियुगात सज्जन व्हावे या हेतूने अनुष्ठान योजले होते. नाथ पंथाची स्थापना मुळात याच हेतूने केली गेली आहे. हा उद्देश साध्य व्हावा म्हणून दर महिन्याला नाथ शक्तिपीठा मध्ये नाथपंथाचे कार्य सुरळीत चालावे व नाथपंथाचे गुरु कार्य सुरळीत चालावे हा उद्देश साध्य व्हावा या हेतूने अनुष्ठान हवन करण्यात येते.

माहूरची रेणुका माता व भक्तभाव

माहूरची रेणुका माता ही अनेकांची कुलदैवत आहे. ज्यांची ती कुलदैवत नाही त्यांच्यावर देखील ती सहजरीत्या कृपा करते आणि पावते. रोजच तिच्या दर्शनासाठी भक्तांची भाविकांची खूप भीड असते. असंख्य लोक तिच्या दर्शनासाठी माहूरला पहाटेपासून रात्रीपर्यंत रोजच दिवसभर येत राहतात. या दर्शनार्थींची व्यवस्था करण्यासाठी तेथील विश्वस्थांची, व्यवस्थापक वर्गाची, आणि पोलीस विभागाचे शक्ती वापरावी लागते. माहूरची देवीचे हे ठिकाण खूप उंच गडावर आहे. या देवीच्या पायथ्याशी जाण्यासाठी उत्तम रस्ता आहे परंतु पायथ्यापासून दोन अडीचशे पायऱ्या चढून वर जावे लागतात. व्यवस्थापकांनी, पायर्‍या चढून जाताना लागणारी व्यवस्था आणि सुविधा निर्माण केली आहे. वर जाण्यासाठी डोलीची व्यवस्था देखील आहे. आम्हाला असे सांगण्यात आले की दीड-दोन महिन्यातच येथे पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी लिफ्टची योजना होणार आहे.

माहूरगडावर अनुष्ठान करण्याची देवीची आज्ञा

या माहूर गडावर आजपर्यंतच्या इतिहासात संस्थांतर्फे होणाऱ्या हवना व्यतिरिक्त कोणतेही हवन वा अनुष्ठान कोणीही केले नाही. जानेवारी २०२२ मध्ये नाथ शक्तिपीठाधिश नरेंद्रनाथ महाराज देवीच्या दर्शनासाठी गेले असता देवीने त्यांना विचार दिला म्हणजे बुद्धी दिली की या परिसरात नाथ शक्तिपीठाचे पारंपारिक हवन करावे. नाथ शक्तिपीठाचे पारंपारिक हवन, जे गेल्या ३० वर्षांपासून अकोला येथून होत आहे, ते करावे. हे हवन म्हणजे कलियुगाचे जे विपरीत परिणाम मनुष्य जातीवर होत आहेत, ते विपरीत परिणाम सौम्य करण्याकरता आणि वेळप्रसंगी ते घालवण्या करता या पारंपारिक हवनांची योजना होत असते. नाथशक्तिपीठाच्या कार्यकाळा पूर्वी अशा प्रकारचे हवन, जेव्हापासून नाथपंथ निर्माण झाला आहे तेव्हापासून नियमित स्वरूपाने होत असते. ही बुद्धी जरी भगवतीने दिली असली तरी ती देव आणि गुरुसंस्था या स्थरावर होती. प्रत्यक्षात ती अमलात आणण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या.

समाज, शासन आणि परवानग्यांची आव्हाने

सामाजिक बंधने, विश्वस्थांकडून परवानगी, पोलीस डिपार्टमेंट कडून परवानगी, शासनाकडून परवानगी आणि सामाजिक मान्यता या सर्व गोष्टी झाल्याशिवाय तिथे हवन अनुष्ठान होणे शक्यच नाही. हे सर्व घडणे मनुष्याच्या स्वाधीन नाही. कोणाच्याही मनात आलं आणि तिथे जाऊन हवन केलं अशी आज पर्यंतची प्रथा किंवा पद्धत नव्हती आणि तशी परवानगी भगवती कडून कोणालाही मिळाली असे आजपर्यंत झालेच नाही. तेथे संस्थान व्यतिरिक्त अन्य कोणीही अनुष्ठान हवन केलेच नाही. त्यातून नाथपंथाचे हवन तेथे आज तागायत झालेच नाही. सर्व संबंधित लोकांच्या—विश्वस्थ, शासन, पोलीस, पुजारी—या सर्वांच्या मनामध्ये, विचारांमध्ये बदल करून तेथे अनुष्ठान होऊ देणे हे केवळ भगवतीच्या मर्जीवर आणि आज्ञेवर अवलंबून होते. म्हणूनच म्हटले आहे — या देवी सर्वभूतेषु बुद्धि रुपेण संस्थित: |

भगवतीचा प्रसाद: सर्वांना अनुकूल बुद्धी

संपूर्ण यंत्रणेमध्ये पॉझिटिव्ह–निगेटिव्ह विचारांच्या लोकांना, शासनाला, पोलीस विभागाला, पुजाऱ्यांना, व इतर कोणालाही विरोध न होता अनुष्ठान हवन निर्विघ्न पार पडावे म्हणून भगवतीने सर्वांच्या बुद्धीत योग्य तो फरक पाडला. ही शक्ती केवळ भगवतीचीच. प्रत्यक्ष भगवतीने सप्तशतीतील — या देवी सर्वभूतेषु बुद्धि रुपेण संस्थित: या मंत्राची अनुभूती सर्वांना दिली.

अनुष्ठान व हवनाची दिव्य दिनचर्या

सात दिवसाचे अनुष्ठान, म्हणजे पहाटे चार वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंतच्या अनुष्ठानाची दिनचर्या आणि तीन दिवस प्रत्यक्ष भगवतीच्या अधिष्ठाना समोर, तिच्याच प्रांगणात, तिच्याच पारंपारिक हवन कुंडाच्या जवळ नाथ शक्तीपीठाधिष नरेंद्रनाथ महाराजांनी, नाथ शक्तीपीठाने प्रशिक्षित केलेल्या विद्वत्जनांकडून नाथपंथाचे पारंपारिक हवन आणि सप्तशतीच्या शतपाठाचे हवन सर्वांच्याच साक्षीने केले. हे हवन म्हणजे माहूरगडच्या इतिहासातली पहिली नोंद म्हटली पाहिजे. या हवनाचा परिणाम म्हणून भक्तांच्या सुखसोयी, भक्तिभाव, विवेक, आणि सत्प्रवृत्ती वाढण्यासाठी प्रयत्न झाले.

नाथपंथाची परंपरा आणि देवराज्याची उपस्थिती

अशा प्रकारचे हवन ही नाथपंथाची परंपराच आहे. नाथपंथाचा मूळ उद्देश हाच, आणि हे कार्य स्वामी मच्छिंद्रनाथ पासून खंड न पडता सुरू आहे.

माहूरला अनुष्ठानाला सुरुवात झाली त्या वेळी नरेंद्रनाथ महाराजांनी सर्वांना कल्पना दिली होती की माहूर गडावर फक्त मा रेणुका देवीच नाही तर देवीबरोबर — भगवान शंकर, भगवान विष्णू, ब्रह्मदेव, भगवान दत्तात्रेय, विघ्नहर्ता गणपती, नवनाथ, परमगुरु माधवनाथ, सद्गुरु व्यंकटनाथ महाराज — या सर्व शक्ती उपस्थित आहेत. या सर्वांचा जणू दरबार तेथे भरला आहे आणि ते सर्व या कार्याकडे लक्ष देत आहेत.

देवालयातील दैवी यंत्रणा

दर्शनार्थीच्या नकळत प्रत्येकाचे स्कॅनिंग होते आणि त्यांच्या जन्मोजन्मीच्या व्यवहारांवर भगवतीची दृष्टी असते. माधवनाथ महाराज चित्रकूटहून बालाजीच्या दर्शनाला गेले तेव्हा बालाजीने प्रत्यक्ष दर्शन देऊन संभाषण केले होते. म्हणून देवमूर्ती केवळ दगड नसते — देव प्रत्यक्ष वास करीत असतो.

भक्तांना संदेश: भक्तिभाव आणि नियमित दर्शन

माहूरची मा रेणुकामाता आजही सर्वांवर कृपाळूपणे पाहते आहे आणि जोपर्यंत चंद्र, सूर्य, नक्षत्रे आहेत, तोपर्यंत ती भक्तांवर कृपा करत राहणार आहे. प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी तिच्या दर्शनासाठी जावे, यथाशक्ती अर्पण करावे, आणि भगवत्भाव व गुरुभक्ती वाढवण्याची प्रार्थना करावी. अनुष्ठानाच्या कालावधीमध्ये हवनाचा परिणाम गडावर जाणवत असल्याचे तेथील अध्यक्ष व विश्वस्त यांनी सांगितले. म्हणून म्हणणे भाग पडते — या देवी सर्वभूतेषु बुद्धि रुपेण संस्थित: | नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः||


अध्यात्मिक-वाटचाल/गुरूमहिमा/नरेंद्रनाथ/माहुरगडावर-नाथपंथिय-हवन.txt was सर्वात शेवटचा बदल: on 18-Dec-2025 (13:50)