English: Read this page in English
वैश्विक परिषदेचे वेळापत्रक
परिषद कालावधी
वैश्विक परिषद नाथशक्तिपीठ, अकोला येथे १२ जानेवारी ते १६ जानेवारी २०१७ अशी ५ दिवसांची आयोजित करण्यात आली होती.
पहिला दिवस — प्रतिनिधींची नोंदणी, परिषदेचे उद्घाटन, तसेच सूर्योपासनेच्या काही मोजक्या पद्धतींचे प्रात्यक्षिक सादरीकरण.
दैनंदिन कार्यक्रम (दुसरा ते पाचवा दिवस)
दिवसभर प्रतिनिधींना खालीलप्रमाणे व्यस्त कार्यक्रम असेल :
- सकाळी ६.३० ते ७.३० — सूर्योपासना
- सकाळी ७.३० ते ८.१५ — अल्पोपहार व चहापान
- सकाळी ८.१५ ते ८.४५ — दृक्–श्राव्य कार्यक्रम
- सकाळी ९.०० ते १.०० — *४ शोधनिबंधांचे वाचन*
- (प्रत्येकी ४५ मिनिटे)
- दुपारी १.०० ते २.०० — परिषदस्थळी भोजन
- दुपारी २.०० ते ६.०० — *४ शोधनिबंधांचे वाचन*
- (प्रत्येकी ४५ मिनिटे)
- दुपारी ४.०० — चहापान
- सायंकाळी ६.०० ते ६.३० — सौरसूक्त व प्रार्थना
- सायंकाळी ६.३० ते ७.३० — विश्राम
- सायंकाळी ७.३० ते ८.३० — नाथशक्तिपीठाचे कार्यक्रम
- रात्री ८.३० ते ९.३० — भोजन
समारोप दिवस
पाचव्या दिवशी परिषदेच्या व्यासपीठावरून कल्याणकारी निष्कर्षासाठी चर्चा घेण्यात येईल. दुपारच्या भोजनानंतर परिषदेचे कार्य समाप्त होईल.