श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header श्री नाथशक्तिपीठ, आकोला Header

माझी प्रार्थना

माझी अवस्था, माझी स्थिती, हीच माझी प्रार्थना आहे मौनाने अंतर्मुख होऊन काही न म्हणता काही न मागता परमेश्वरासमोर बसले तर त्याला सर्वच समजते मला काय हवे हे सांगायची गरज पडत नाही तो सर्वज्ञ आहे. जे माझ्या सद्य जीवनाला आवश्यक आहे ते तो देत राहील. मला काय पाहिजे हे सांगून आपण आपले क्लेश वाढवून घेत आहोत. जसे आपले कर्म तशी आपली स्थिती तशी आपली अवस्था एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले, “गुरुजी, प्रार्थनेचे अनंत प्रकार आहेत. कोणी वाद्य वाजवूनकोणी गाऊन, ओरडूनकोणी करूणा भाकूनकोणी डोळे मिटूनतर कोणी मौन प्रार्थनाकरतात. पण प्रार्थना मौन असली तरी ओठ हलतात, चर्येवर भाव उमटतात, आपण मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता, असे का? “रामदास स्वामी हसले, म्हणाले, ” एकदा मी असा प्रसंग पाहिला की, एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता. अत्यंत कृश, पोट खपाटीला गेलेलं, अंगावर चिंध्या, आत्ता पडेल की मग पडेल अशी स्थिती. डोळे आशाळभूतासारखे सर्वांवरून फिरत होते. थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले. विचारले, “बोल काय पाहिजे तुला? ”“माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर समजत नसेल, तर मला काहीच मागायचे नाही. मी तुमच्या द्वारी उभा आहे! माझ्याकडे नीट पहा, माझं असं असणं, माझी अवस्था, हीच माझी प्रार्थना आहे. या वेगळं शब्दात काय सांगू? “समर्थ म्हणाले, “त्या दिवसापासून मी प्रार्थना बंद केली. मी परमेश्वराच्या दारी उभा आहे. तो अंतर्यामी आहे, माझ्या मनात काय आहे ते तो जाणतो. या परते शब्दात काय मागू? 'तो' बघून घेईल. जर माझी 'स्थिती' काही सांगू शकत नसेल तर शब्द काय सांगणार? जर माझी 'अवस्था' त्याला समजत नसेल, तर शब्द काय समजणार? म्हणून अंतःकरणातले भाव आणि दृढ विश्वास हेच खर्‍या परमेश्वर प्रार्थनेचे लक्षण आहे. तिथे 'मागणं' काही उरत नाही. तुम्ही प्रार्थनेत 'असणं' हेच पुरेसं असतं. शरिर धर्म त्याचे काम करतो परंतु मुक प्रार्थनेत अपरिमित शक्ती असते असे मानुन मनांत व चराचरात व्याप्त प. पु. सद्गुरूंना उत्तम आरोग्य प्राप्त असावे ही त्यांच्याच चरणी प्रार्थना