व्यंकटनाथांचा जन्म आणि कार्य सिद्धता
अनुसया व दत्तावताराची कथा
गुरुचरित्राच्या चौथ्या अध्यायात सांगितले आहे की ब्रम्हा-विष्णू-महेश ते तिघे अनुसया च्या पुठे समोर प्रगट होतात व तिला इच्छाभोजन मागून तिचे सत्वर पाहण्याच्या दृष्टीने ते तिची परीक्षा घेतात. शेवटी तिचे बालक होऊन विष्णू तिचा मुलगा म्हणून राहतात आणि बाकी दोघे आपल्या कार्यासाठी निघून जातात. नरसिंह सरस्वती म्हणून विष्णू आपलं दत्तावतारी कार्य करतात.
कृष्णाबाई समोर यतीचे प्रगटीकरण
देवगावला कृष्णाबाई पुरुषोत्तम यांचे सात्वीक जीवन पाहून एक यती कृष्णाबाई समोर प्रगट होतो आणि सांगतो की तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होऊन तुझ्या उदरी बालाजी म्हणजे व्यंकटेश नावाचा मुलगा अवतरेल. एवढे सांगून तो अदृश्य होतो. विष्णूनेच यतीचे रूप घेऊन हे सर्व सांगितले. गुरुचरित्रातही विष्णूनेच दत्ताचा अवतार घेऊन नरसिंह सरस्वती म्हणून कार्य सुरू केले. त्याचप्रमाणे देवगाव रंगारी येथे विष्णूने व्यंकटनाथांचे रूप घेऊन कार्याला प्रारंभ केला.
नाथपंथाची परंपरा
भगवान दत्तात्रेयांनी मच्छिंद्रनाथांना मंत्र सांगून अनुग्रह दिला आणि नाथ परंपरा पुढे नेण्याचे संकेत दिले. मच्छिंद्रनाथांनी नाथपंथाची योजना केली आणि पहिले नऊ नाथ हे विष्णूचे पार्शद होते. त्यांनी अयोनी संबंधातून प्रगट होऊन पंथाचा विस्तार केला.
या अखंड परंपरेने कार्य करणारे माधवनाथ महाराज हे चौदावे नाथ होते. त्यानंतर त्यांच्या आज्ञेवरून व्यंकटनाथांनी हे कार्य पुढे सुरू केले. ते पंधरावे नाथ होते. माधवनाथांच्या सूचनेप्रमाणे व्यंकटनाथांनी कार्याला प्रारंभ केला.