श्री. सुनील बुवा आष्टीकर यांचे कीर्तन पुष्प चौथे
अकोला येथील सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. महेंद्र ताम्हणे आणि सौ. अल्का ताम्हणे यांनी नाथशक्तिपीठाच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना या कार्याचे विशेष कौतुक केले.
सद्गुरू श्री नरेंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले नाथशक्तिपीठाचे कार्य हे केवळ धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नसून, ते विज्ञानाधिष्ठित ,समाजाभिमुख, विधायक आणि संस्कारक्षम असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भावी पिढीला योग्य संस्कार, जीवनमूल्ये आणि सकारात्मक दिशा देण्यासाठी नाथशक्तिपीठाचे कार्य अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा प्रेरणादायी कार्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असून, प्रत्येकाने नाथशक्तिपीठास अवश्य भेट द्यावी आणि तेथील कार्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
नाथशक्तिपीठाच्या समाजोपयोगी कार्याविषयी व्यक्त केलेले त्यांचे हे गौरवोद्गार संस्थेच्या कार्याला निश्चितच प्रोत्साहन देणारे आहेत.