श्रीगुरूंची आठ रुपे हे एक विज्ञानच
एकच जीव भक्तांसाठी आठ रूपे घेऊन अवतरला
श्रीगुरूचरित्र अध्याय 46 मध्ये भगवान दत्तात्रेयांनी एकाच वेळी 8 ठिकाणी दिवाळीला भक्तांकडे जाऊन पूजा स्वीकारल्याचा उल्लेख आहे. या अध्यायात नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा.
सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस. तुझी ही श्रीगुरूचरित्र ऐकण्याची तीव्र इच्छा पाहून मला संतोष आहे. या श्रीगुरूचरित्र श्रवणाने तुला पुत्रपौत्र होतील. तुला सर्व प्रकारचे ऐश्वर्य लाभेल. आता तुला पुढची कथा सांगतो. ती श्रवण केली असता महापापीसुद्धा पावन होईल.
दिवाळीचा प्रसंग आणि श्रीगुरूंची करुणा
श्रीगुरू गाणगापुरात असताना एक गमतीदार गोष्ट झाली. एकदा दिवाळीचा सण आला. श्रीगुरूंचे सात शिष्य श्रीगुरूंच्याकडे आले. या मंगल दिनी श्रीगुरूंचे चरण आपल्या घराला लागावेत असे प्रत्येकाला वाटत होते. या दिवाळीच्या दिवशी श्रीगुरूनी आपल्या घरी यावे असे प्रत्येकाला वाटत होते. तशी त्यांनी श्रीगुरूंना विनंती केली.
श्रीगुरूंना त्यांचे मन मोडेना. तेव्हा ते शिष्यांना म्हणाले, तुम्ही सगळेच माझे प्रिय शिष्य आहात. तेव्हा मी एकाच दिवशी तुम्हा सर्वांच्या घरी कसा येणार? तेव्हा मी कुणाच्या घरी येऊ ते आपापसात ठरवा व मला सांगा.
श्रीगुरूंनी आपल्याच घरी यावे असे त्या सातही शिष्यांना वाटत होते. त्यावरून त्यांचे भांडण सुरू झाले. त्यांचे काही केल्या एकमत होईना. मग श्रीगुरूंनी युक्ती केली. त्यांनी एकेका शिष्याला बाजूला बोलाविले व त्याला सांगितले, मी तुझ्याकडेच येईन, पण हे कोणाला सांगू नकोस. आता तू शांतपणे आपल्या घरी जा. अशा रीतीने प्रत्येकाची समजूत काढून सर्वांना वाटेला लावले.
भक्तांचा संभ्रम आणि श्रीगुरूंची लीला
दिवाळीला श्रीगुरू बाहेरगावी आपल्या शिष्यांकडे जाणार ही बातमी मठातील भक्तांना समजली. तेव्हा ते श्रीगुरूंना म्हणाले, स्वामी, दिवाळीसारख्या पवित्र दिवशी तुम्ही बाहेरगावी शिष्याकडे जाणार? मग आम्ही कोणाचे दर्शन घ्यायचे? तुम्ही दिवाळीत आम्हाला सोडून कोठेही जाऊ नये.
त्यांचे मनोगत लक्षात घेऊन श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही चिंता करू नका. आम्ही येथेच राहू. ते ऐकून सर्वांना समाधान वाटले.
श्रीगुरूंची एकाच वेळी आठ ठिकाणी उपस्थिती
दिवाळीच्या दिवशी श्रीगुरूंनी मंगल स्नान केले. आपल्या योगसामर्थ्याने सात रूपे घेतली व एकेका रूपाने ते विविध गावांत राहणाऱ्या आपल्या सातही शिष्यांच्या घरी गेले. त्या सर्वांकडून त्यांनी पूजासेवा घेतली व मठातही राहिले.
कार्तिकी पौर्णिमेला दीपाराधना करण्यासाठी श्रीगुरूंचे ते सातही शिष्य गाणगापुरला मठात आले. त्यावेळी प्रत्येक जण सांगू लागला — दिवाळीला श्रीगुरू फक्त आपल्याच घरी आले होते, आणि आपण दिलेली वस्त्रे श्रीगुरूंच्याकडे असल्याचे दाखवू लागला. ते ऐकून सर्व शिष्य मोठ्या संभ्रमात पडले.
पण गाणगापुरातील लोक म्हणाले, श्रीगुरू तुमच्यापैकी कोणाकडेच आले नव्हते. ते मठातच होते. त्यांनी आमच्याबरोबर दिवाळी साजरी केली.
हे सगळे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. श्रीगुरू साक्षात परमेश्वर आहेत, त्रिमूर्तीचा अवतार आहेत. भक्तांसाठी त्यांनी आठ रूपे घेतली हे रहस्य उघड होताच सर्वांनी श्रीगुरूंचा जयजयकार केला.
व्यंकटनाथ महाराजांचीही अशीच लीला
व्यंकटनाथ महाराज एकाच वेळी चार जणांच्या घरी गेले होते. दिवाळीला घरी यावे असा शिष्यांचा आग्रह होता. कुणीही माघार घेत नव्हते. महाराजांनी एकेकाला जवळ बोलावले आणि काहीतरी सांगितले. चारही जण निवांत निघून गेले.
दिवाळीनंतर बोलताना प्रत्येक जण म्हणू लागला — महाराज माझ्या घरी आले होते. सर्वांनाच खात्री होती कारण प्रत्येकाने महाराजांची पूजा केली होती.
जब ते महाराजांकडे गेले तेव्हा महाराजांनी प्रत्येकाच्या घरचे वर्णन केले. तेव्हा सर्वांच्या लक्षात आले की महाराज एकाच दिवशी, एकाच वेळी, चारही घरी गेले होते.
योगींचे सामर्थ्य : आधुनिक विज्ञानाची साक्ष
योगी हे एकाच वेळी निरनिराळे देह धारण करू शकतात आणि भिन्न ठिकाणी वावरू शकतात. हे शास्त्र quantum physics ने मान्य केले आहे, असे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. विजय भाटकर यांनी सांगितले.
हे मानसिक कल्पना किंवा चमत्कार नसून शुद्ध विज्ञान आहे. व्यंकटनाथ महाराज हे नाथपंथातील फार मोठे योगी होते. 1993 च्या महाशिवरात्रीला त्यांनी 18 वर्षे पूर्वी कल्पना देऊन समाधी घेतली होती.
श्रीगुरूंच्या लीलांचे महात्म्य
श्रीगुरू हेच त्रैमूर्ती आहेत. हा संसारसागर तरून जाण्यास श्रीगुरूंचाच एक आधार आहे. श्रीगुरूंच्या कृपेने अशक्यही शक्य होते आणि साधकाचा उद्धार घडतो.