कालसर्प योग
कालसर्प दोष म्हणजे काय?
- राहू आणि केतूचा प्रभाव: कालसर्प योग हा प्रामुख्याने राहू आणि केतू या दोन ग्रहांच्या स्थितीमुळे निर्माण होतो. पौराणिक कथेनुसार, राहू हे सर्पाचे 'मुख' मानले जाते आणि केतू हे 'शेपूट' मानले जाते.
- ग्रहस्थिती: जेव्हा पत्रिकेत इतर सर्व ग्रह राहू आणि केतूच्या विळख्यात (एकाच बाजूला) येतात, तेव्हा कालसर्प योग तयार होतो.
- स्वरूप्: राहू हा 'वायू' तत्त्वाचा आणि 'तमोगुणी' ग्रह आहे. तो नेहमी वक्र गतीने (उलट) भ्रमण करतो.
कालसर्प दोषाची लक्षणे
या दोषाचा परिणाम मानवी जीवनाच्या विविध अंगांवर होतो जसे कि:
- सूचक स्वप्ने: स्वप्नात वारंवार साप किंवा नाग दिसणे, सापाला मारल्याचे किंवा त्याचे तुकडे झाल्याचे पाहणे हे या दोषाचे प्रमुख लक्षण आहे.
- संतती सुखामध्ये बाधा: ज्यांच्या पत्रिकेत कालसर्प किंवा सर्पशाप असतो, त्यांना पुत्रसंतती होत नाही आणि झाली तरी ती जगत नाही (अल्पायुषी ठरते).
- मानसिक आणि सामाजिक समस्या: स्मरणशक्ती कमी होणे (स्मृतिनाश), समाजात विनाकारण अपकीर्ती होणे, आणि मनात अकारण भीती किंवा भीतीदायक विचार येणे.
- शारीरिक व्याधी: या दोषामुळे कुष्ठरोग, शारीरिक पंगुत्व किंवा विषप्रयोगासारखे धोके संभवतात.
- प्रगतीत अडथळे: नोकरी-व्यवसायात वारंवार अपयश येणे, आर्थिक हानी होणे किंवा कोर्ट-कचेरीच्या कचाट्यात अडकणे ही देखील या दोषाची लक्षणे असू शकतात.
निवारण आणि उपाय
या दोषावर किव्वा योगावर मात करण्यासाठी शास्त्रोक्त आणि वैदिक उपाय आहेत:
- नारायणबली आणि नागबली: संतती सुख प्राप्तीसाठी आणि या दोषाच्या शांततेसाठी 'नारायणबली' आणि 'नागबली' हा एक उपाय आहे.
- हनुमान उपासना: दररोज संध्याकाळी 'पंचमुखी हनुमानाची' उपासना आणि आराधना केल्यास राहू-केतूचा अशुभ प्रभाव कमी होतो.
- विशिष्ट मंत्रजप: राहू आणि केतू या ग्रहांचे शुभ फळ मिळवण्यासाठी त्यांच्या मंत्रांचा शास्त्रोक्त पद्धतीने जप करावा.
- सत्पात्री दान: ज्याला कालसर्प पीडा आहे, त्याने आपल्या वजनाएवढे 'सप्तधान्य' (सात प्रकारचे धान्य) जिथे नित्य वेदाभ्यास चालतो अशा ठिकाणी किंवा गुरुचरणी अर्पण करावे.
- लघुरुद्र विधी: भगवान शंकराचा लघुरुद्र अभिषेक केल्यानेही कालसर्प दोषाची तीव्रता कमी होते.
- नाथशक्तीपीठातील विशेष उपाय: अकोला येथील नाथशक्तीपीठात राहू-केतूच्या प्रतिकूल स्थितीवर मात करण्यासाठी विशेष 'अनुष्ठान-हवन' आणि वैदिक पूजा केल्या जातात.